Marathi Bible Reading | 2nd Week of Easter | Monday 13th April 2026

पुनरुत्थान दुसरा सप्ताह 

सोमवार १३ एप्रिल २०२६

“मी तुम्हाला नक्की सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही."

Amen, amen I say to thee, unless a man be born again of water and the Holy Ghost, he cannot enter into the kingdom of God.




संत मार्टिन पहिले  
पोप, वर्तनसाक्षी (६५५)

पहिले वाचन  प्रे.  कृ.  ४:२३-३१
वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"त्यांनी प्रार्थना केल्यावर ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले व देवाचे वचन धैर्याने बोलू लागले."

पेत्र आणि योहान यांची सुटका झाल्यावर ते आपल्या मित्रमंडळींकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडीलजन त्यांना जे काही म्हणाले होते ते सर्व त्यांनी त्यांना सांगितले. हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, "हे देवा, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा आणि त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने फार पूर्वी तू पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हटले, राष्ट्रे का खवळली आणि लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरूद्ध आणि त्याच्या अभिषिक्तांविरूद्ध लढण्यास पृथ्वीवरील राजे उभे राहिले आणि अधिकारी एकत्र जमले. 

    आज हेच ह्या शहरात घडत आहे. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरूद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय आणि इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद आणि पोन्ती पिलात हे एकत्र झाले आहेत. ह्यासाठी जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते आणि स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे लक्ष दे आणि आरोग्यदान देण्याकरिता तू आपला हात लांब करत असता आपल्या सेवकांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना सामर्थ्य दे. तुझा पवित्र सेवक येशू ह्यांच्या नावाने चिन्हे आणि चमत्कार घडू देत." त्यांनी ही प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये  ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.

प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
: Acts 4: 23-31
 And being let go, they came to their own company, and related all that the chief priests and ancients had said to them. 4 Who having heard it, with one accord lifted up their voice to God, and said: Lord, thou art he that didst make heaven and earth, the sea, and all things that are in them. Who, by the Holy Ghost, by the mouth of our father David, thy servant, hast said: Why did the Gentiles rage, and the people meditate vain things? The kings of the earth stood up, and the princes assembled together against the Lord and his Christ. For of a truth there assembled together in this city against thy holy child Jesus, whom thou hast anointed, Herod, and Pontius Pilate, with the Gentiles and the people of Israel, To do what thy hand and thy counsel decreed to be done. And now, Lord, behold their threatenings, and grant unto thy servants, that with all confidence they may speak thy word, By stretching forth thy hand to cures, and signs, and wonders to be done by the name of thy holy Son Jesus. And when they had prayed, the place was moved wherein they were assembled; and they were all filled with the Holy Ghost, and they spoke the word of God with confidence.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र २:१-९
प्रतिसाद : परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत.

१ राष्ट्रे का दंगल माजवीत आहेत ?
हे लोक व्यर्थ का कारस्थाने रचीत आहेत ? 
प्रभूविरूद्ध आणि त्याच्या अभिषिक्तांविरुद्ध 
पृथ्वीवरील राजे सज्ज झाले आहेत.
 ते म्हणतात, “चला, त्यांनी घातलेली बंधने आपण तोडून टाकू,
त्याचे पाश आपण झुगारून देऊ." 

२)स्वर्गातील सिंहासनारूढ देव हसत आहे,
प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. 
तो संतप्त होऊन त्यांना धमकावील, 
क्रोधाने त्यांच्यावर दरारा बसवील. तो म्हणतो, सियोनवर वर, माझ्या पवित्र डोंगरावर मी माझा राजा प्रस्थापित केला आहे.

३) प्रभूचे निर्णय मी जाहीर करीन. 
प्रभू मला म्हणाला, "तू माझा पुत्र आहेस.
 आज मी तुला जन्म दिला आहे. 
तू मागितलेस तर राष्ट्रांचे स्वामित्व मी तुला देईन,
 थेट सीमेपर्यंत पृथ्वी तुझ्या स्वाधीन करीन. 
लोखंडी गजाने तू त्यांना फोडून काढशील,
 कुंभाराच्या मडक्याप्रमाणे त्यांच्या ठिकऱ्या उडवशील.


Psalms 2: 1-3, 4-6, 7-9
R.  Blessed are all who take refuge in the Lord.

1 Why have the Gentiles raged, 
and the people devised vain things?
2 The kings of the earth stood up, 
and the princes met together, 
against the Lord and against his Christ.

3 Let us break their bonds asunder: 
and let us cast away their yoke from us.
R. Blessed are all who take refuge in the Lord.

4 He that dwelleth in heaven shall laugh at them: 
and the Lord shall deride them.
5 Then shall he speak to them in his anger, 
and trouble them in his rage. 
6 But I am appointed king by him over 
Sion his holy mountain, preaching his commandment.
R. Blessed are all who take refuge in the Lord.

7 The Lord hath said to me: 
Thou art my son, this day have I begotten thee.
8 Ask of me, and I will give thee the Gentiles
 for thy inheritance, and the utmost parts 
of the earth for thy possession.
9 Thou shalt rule them with a rod of iron, 
and shalt break them in pieces like a potter’s vessel.
R. Blessed are all who take refuge in the Lord.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे. 
 आलेलुया!

Acclamation: 
  R. Alleluia, alleluia.
1 If then you were raised with Christ, seek what is above, where Christ is seated at the right hand of God.
R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमानयोहान  ३:१-८
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 परुश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता, तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहा हे आम्हांला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.” येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हाला नक्की सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही." निकदेम त्याला म्हणाला, "म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे आणि जन्म घेणे शक्य होईल काय ?" येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे. असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 3: 1-8
And there was a man of the Pharisees, named Nicodemus, a ruler of the Jews. This man came to Jesus by night, and said to him: Rabbi, we know that thou art come a teacher from God; for no man can do these signs which thou dost, unless God be with him. Jesus answered, and said to him: Amen, amen I say to thee, unless a man be born again, he cannot see the kingdom of God. Nicodemus saith to him: How can a man be born when he is old? can he enter a second time into his mother’s womb, and be born again? Jesus answered: Amen, amen I say to thee, unless a man be born again of water and the Holy Ghost, he cannot enter into the kingdom of God. That which is born of the flesh, is flesh; and that which is born of the Spirit, is spirit.Wonder not, that I said to thee, you must be born again. The Spirit breatheth where he will; and thou hearest his voice, but thou knowest not whence he cometh, and whither he goeth: so is every one that is born of the Spirit.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
 
चिंतनपवित्र आत्म्याद्वारे धैर्यः आज आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी आमंत्रित केले आहे पेत्र आणि योहान यांच्या धैर्याने आणि विश्वासाने. छळ सहन करूनही ते त्यांच्या समुदायात परतले, प्रार्थनेत एकजूट झाले, धैर्याने आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने. आपण त्यांच्या उदाहरणाचे अनुसरण करूया, अपेक्षेने प्रार्थना करूया आणि आपले जीवन देवाच्या इच्छेला समर्पित करूया. या शरणागतीमध्येच आपण येशूने निकदेमला सांगितलेल्या नवीन जन्माचा अनुभव घेऊया आध्यात्मिक परिवर्तन आपल्याला देवाची मुले म्हणून जगण्यास सक्षम करते. पवित्र आत्मा आपल्यामध्ये धैर्याचा अग्नी प्रज्वलित करो आणि आपल्याला देवाचा संदेश धैर्याने आणि दृढनिश्चयाने घोषित करण्यास मार्गदर्शन करो. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान शक्तीचे साक्षीदार म्हणून आपण नव्याने जन्म घेऊया.

प्रार्थना : हे पवित्र आत्म्या, ये आणि आमची अंतःकरणे तुझ्या दानांनी भरून टाक, आमच्या जीवनाचे नुतनीकरण कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या