पुनरुत्थान दुसरा सप्ताह
मंगळवार १४ एप्रिल २०२६
जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
whoever believes in him may have eternal life.
त्याची हकीगत अशी: व्हेलेरियन हा रोम शहरातील राज्यव्यवस्थे मध्ये सिनेटर ह्या महत्त्वाच्या पदावर कार्य करीत होता. सिसिलिया (सण २२ नोव्हें.) नावाच्या सुंदर, भक्तिमान व सोज्वळ स्त्रीशी त्याची सोयरीक झाली होती. लग्नाचा समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्यानंतर व्हेलेरियन ह्याला समजले की, आपल्या ख्रिस्ती पत्नीने गुप्तपणे आमरण कौमार्यपदाचे व्रत घेतलेले आहे. व्हेलेरियन जरी परधर्मीय असला तरी स्वभावाने अतिशय सृजनशील होता. आपल्या पत्नीने घेतलेला शुद्धतेचा वसा टाकू नये म्हणून त्याने तिला कौमार्यपद अढळ ठेवण्यास प्रोत्साहन दिले. दरम्यानच्या काळात त्याने आपला भाऊ टायबिर्शिअस त्याच्यासह ख्रिस्ती धर्माचा व्यवस्थित अभ्यास केला व बाप्तिस्मा स्वीकारला. इतकेच नव्हे तर सिसिलिया हिला तिची परोपकारकृत्ये व दयाकृत्ये करण्यास त्यांनी भरपूर पाठिंबा व प्रोत्साहन दिले.
ही गोष्ट अमालिखअस नावाच्या प्रांत प्रमुखाला समजली. आपल्याच राजदरबारातील आपले दोन खंदे पुरस्कर्ते उघड उघड ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतात ही गोष्ट त्याला मुळीच पचणारी नव्हती. त्याने त्या दोघांना एकत्र आपल्या भेटीस बोलावले व ख्रिस्ती धर्म सोडून दयावा असा आज्ञावजा हुकूम सोडला.परंतु प्रांतप्रमुखाची कोणतीही धमकी व्हेलेरियन व टायबिर्शिअस ह्यांच्या एकनिष्ठेला पराभूत करू शकली नाही. शेवटी दोघांना नजरकैदेत डांबण्यात आले.
पुढे त्यांना मॅक्सिमस नावाच्या एका मूर्तिपूजक शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. आता मात्र एकंदर प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळाली. मॅक्सिमस ह्याने ह्यांचा छळ करण्याचे सोडून त्यांच्याकडून ख्रिस्ती धर्मश्रद्धेचे धडे घेतले आणि एके दिवशी त्यांच्या हातून ख्रिस्ती धर्माची दीक्षाही घेतली. ही वार्ता सम्राटाच्या कानावर जाताच तिघांनाही कंठस्नान घालण्यात आले. ख्रिस्तसभेने अगदी आरंभीच्या काळातच त्यांना रक्तसाक्षी म्हणून घोषित केले.
पहिले वाचन प्रे. कृ. ४:३२-३७
वाचक : प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन "एकदिलाचा व एकजिवाचा."
तेव्हा विश्वास धरणाच्यांचा समुदाय एकदिलाचा आणि एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ते विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत, मग ज्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.
कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता त्याला प्रेषित बर्णबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती, ती त्याने विकली आणि तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 4:32-37
The full number of those who believed were of one heart and soul, and no one said that any of the things that belonged to him was his own, but they had everything in common. And with great power the apostles were giving their testimony to the resurrection of the Lord Jesus, and great grace was upon them all. There was not a needy person among them, for as many as were owners of lands or houses sold them and brought the proceeds of what was sold and laid it at the apostles' feet, and it was distributed to each as any had need. Thus Joseph, who was also called by the apostles Barnabas (which means son of encouragement), a Levite, a native of Cyprus, sold a field that belonged to him and brought the money and laid it at the apostles' feet.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९३:१-२,५
प्रतिसाद : प्रभू राज्य करतो. तो ऐश्वर्याने मंडित आहे.
१) प्रभू राज्य करतो. तो ऐश्वर्याने मंडित आहे.
त्याने पराक्रमी वस्त्र धारण केले आहे.
आपली कंबर कसली आहे.
२) पृथ्वी स्थिर आहे, ती ढळविता येत नाही.
पुरातन काळापासून तुझे सिंहासन स्थिर आहे.
तू अनादिसिद्ध आहेस.
३) तुझे निबंध शाश्वत टिकणारे आहेत.
हे प्रभू, पावित्र्य हेच तुझ्या मंदिराचे चिरंतन सौंदर्य आहे.
Psalm 93:1abc, 1d-2, 5 (1a)
The Lord is king, with majesty enrobed.
The Lord is king, with majesty enrobed.
The Lord has robed himself with might
he has girded himself with power. R
The world you made firm,
not to be moved:
your throne has stood firm from of old.
From all eternity, O Lord, you are. R
Truly your decrees are to be trusted.
Holiness is fitting to your house.
O Lord, until the end of time. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया!
Acclamation:
The Son of man must be lifted up, that whoever believes in him may have eternal life.
शुभवर्तमान योहान ३:७-१५
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. "
येशू निकदेमला म्हणाला, "तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे." निकदेम त्याला म्हणाला, "ह्या गोष्टी कशा होऊ शकतील ?" येशूने त्याला उत्तर दिले, "तुम्ही इस्राएलचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय ? मी तुम्हांला खात्रीने सांगतो की, आम्हांस ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानीत नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसा मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 3:7b-15
At that time: Jesus said to Nicodemus, 'You must be born anew. The wind blows where it wishes, and you hear its sound, but you do not know where it comes from or where it goes. So it is with everyone who is born of the Spirit." Nicodemus said to him, "How can these things be?" Jesus answered him, "Are you the teacher of Israel and yet you do not understand these things? Truly, truly, I say to you, we speak of what we know, and bear witness to what we have seen, but you do not receive our testimony. If I have told you earthly things and you do not believe, how can you believe if I tell you heavenly things? No one has ascended into heaven except he who descended from heaven, the Son of Man. And as Moses lifted up the serpent in the wilderness, so must the Son of Man be lifted up, that whoever believes in him may have eternal life.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली, सुसंवादाने जगणेः प्रेषितांची कृत्ये मध्ये, आपण साक्षीदार आहोत सुरुवातीचा ख्रिश्चन समुदाय एकोप्याने राहत होता, त्यांची संसाधने वाटून घेत होता आणि एकमेकांची काळजी घेत होता. ते मनाने आणि हृदयाने एकरूप होते आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला. योहानाच्या शुभवर्तमानात, येशू निकदेमला आठवण करून देतो की आत्मा वाऱ्यासारखा आहे, तो हवा तिथे वाहतो. आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु आपण त्याच्या सौम्य प्रवाहाला शरण जाऊ शकतो. आपण स्वतःला विचारू याः आपण इतरांसोबत एकरूपतेने जगतो का? आपण गरजूंसोबत आपली संसाधने वाटून घेत आहोत का? गरजूंचे चेहरे पाहिल्याने आपल्याला आपल्या स्वतःच्या आशीर्वादांची जाणीव होते. आपली संपत्ती ओळखून, आपण वाटून घेण्यास भाग पाडलेजाते. गरीब, उपेक्षित आणि पीडितांचे चेहरे आपल्या हृदयांना उदारतेसाठी प्रवृत्त करोत. आपण, चांगल्या समरिटानप्रमाणे करुणा, दया आणि मूर्त प्रेमाने प्रतिसाद देऊया.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, शांतीने, प्रेमाने व ऐक्याने जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
.
0 टिप्पण्या