पुनरुत्थान तिसरा सप्तह
सोमवार दि. २० एप्रिल २०२६
“ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, हेच देवाचे काम आहे.', "This is the work of God, that you believe in him whom he has sent
मॉन्तेपुल्शिआनोची संत आग्नेस
इटलीतील तुस्कानी येथल्या एका सरदारपुत्राच्या घराण्यात आग्नेस हिचा जन्म झाला. आध्यात्मिक बाबतीत ती बालपणापासूनच चारचौघींमध्ये उठून दिसे. वयाच्या केवळ ९व्या वर्षीच ती फ्रान्सिस्कन सिस्टरांच्या कडक शिस्तीच्या संघामध्ये दाखल झाली. प्रोसेनो येथल्या नवीन डॉमिनिकन कॉन्व्हेंटची प्रमुख अधिकारी म्हणून तिची निवड ती फक्त १५ वर्षाची असतानाच झालेली होती. ह्यावरून तिच्या धार्मिक जीवनाच्या उंचीची कल्पना येईल. ह्याच कॉन्व्हेंटच्या पायाभरणीत पोप निकोलस पाचवे ह्यांच्या आज्ञेवरून तिने दोन वर्षे अथक परिश्रम घेतले होते.
तिचे हे नेत्रदीपक यश पाहून मॉन्टेपुल्शियानोच्या स्थानिक रहिवाश्यांनी आपल्याही गावात डॉमनिकन संघाचे एखादे कॉन्व्हेंट सुरू करावे म्हणून तिच्याकडे तगादा लावला. त्यांच्या प्रेमाखातर व आग्रहास्तव इ.स १२९८ साली तिने एक कॉन्व्हेंट तिथे सुरू केले व तिच्या मृत्यूपर्यंत १९ वर्षे ह्या कॉन्व्हेंटमधून परमेश्वराचे प्रेषितकार्य सुरू ठेवले.
संत आग्रेस हिला अनेक रहस्यमय वरदाने लाभलेली होती. तिला अद्भुत चमत्कारांचेही दान प्राप्त झालेले होते. प्रार्थना, शुद्धता याव्यतिरिक्त देवावरील पूर्ण भरवसा हा तिच्यामधील बालसद्दश सद्गुण होता. ह्याच श्रद्धेपायी तिच्याद्वारे अनेक प्रार्थनांची उत्तरे मिळत गेली.
पहिले वाचन प्रे. कृ. ६:८-१५
वाचक : प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन
"स्तेफान ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्याच्याने तोंड देववेना."
स्तेफान कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुतकृत्य व चिन्हे करीत असे. तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर आलेक्झांड्रेयकर आणि किलिकिया आणि आशिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफानबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्यांच्याने तोंड देववेना. तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, “आम्ही त्याला मोशेविरुद्ध आणि देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले" असे म्हणण्यास पढवले आणि लोकांना, वडिलांना आणि शास्त्रांना चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, “हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या आणि नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडीत नाही.” आम्ही त्याला असे बोलताना ऐकले, "हा नाझरेथकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.” तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 6:8-15
In those days: Stephen, full of grace and power, was doing great wonders and signs among the people. Then some of those who belonged Cyrenians, and to the synagogue of the Freedmen (as it was called), and of the Alexandrians, and of those from Cilicia and Asia, rose up of the and disputed with Stephen. But they could not withstand the wisdom and the Spirit with which he was speaking. Then they secretly instigated men who said, "We have heard him speak blasphemous words against Moses and God." And they stirred up the people and the elders and the scribes, and they came upon him and seized him and brought him before the council, and they set up false witnesses who said, "This man never ceases to speak words against this holy place and the law, for we have heard him say that this Jesus of Nazareth will destroy this place and will change the customs that Moses delivered to us." And gazing at him, all who sat in the council saw that his face was like the face of an angel.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११९:२३-२४,२६-२७,२९-३०
प्रतिसाद : ज्यांचे आचरण शुद्ध आहे ते धन्य होत.
१) सत्ताधीश जमून माझ्याविरुद्ध मसलत करतात,
तरी हा तुझा दास तुझ्या नियमांचे चिंतन करतो.
तुझी शिकवण मला प्रिय आहे.
ती माझी मार्गदर्शिका आहे.
२) मी केलेले सर्व तुला सांगितले, तू माझे ऐकलेस;
आता तुझे नियम मला शिकव.
तुझ्या आदेशाप्रमाणे कसे वागावे ते समजावून सांग.
मग तुझ्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करीन.
३) मला वाममार्गापासून आण
आणि तुझे धर्मशास्त्र मला शिकव.
मी निष्ठेचा मार्ग निवडला आहे.
तुझ्या संकेताकडे माझे लक्ष आहे.
Psalm 119:23-24, 26-27,29-30
Blessed are those who walk in the law of the Lord.
Though princes sit plotting against me,
your servant ponders your statutes.
See, your decrees are my delight
your statutes are my counsellors.
I declared my ways and you answered me,
teach me your statutes
Make me grasp the way of your precepts.
and I will ponder your wonders.
Keep me from the way of falsehood;
grant me mercy by your law.
I have chosen the way of faithfulness;
your decrees I have upheld.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे.
आलेलुया !
Acclamation:
Man shall not live by bread alone, but by every word that proceeds from the mouth of God
शुभवर्तमान योहान ६:२२-२९
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, परंतु सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा."
जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की, ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते. तेथे येशू नाही आणि त्यांचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफर्णहूमास आले.
येशू त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरुजी, येथे कधी आला?" येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न देईल त्यासाठी श्रम करा." ह्यावर ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे ?” येशूने त्यांना उत्तर दिले, “ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, हेच देवाचे काम आहे.'
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 6:22-29
(Alter five thousand men had eaten their fill, the disciples of Jesus saw him walking on the sea. On the next day the crowd that remained on the other side of the sea saw that there had been only one boat there, and that Jesus had not entered the boat with his disciples, but that his disciples had gone away alone. Other boats from Tiberias came near the place where they had eaten the bread after the Lord had given thanks. So when the crowd saw that Jesus was not there, nor his disciples, they themselves got into the bouts and went to Capernaum, seeking Jesus. When they found him on the other side of the ses, they said to him, "Rabbi, when did you come here!" Jesus answered them. Truly Truly. I say to you, you are seeking me, not because you saw signs, but because you at your fill of the loaves. Do not work for the food that perishes, but for the food Phat endures to eternal life, which the Son of Man will give to you. For on him God the father has set his seal" Then they said to him, "What must we do, to be doing the work of God Jeans answered them, "This is the work of God, that you believe in him whom he has sent
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: ख्रिस्ताबद्दलची आवड पुन्हा जागृत कराः आम्ही स्टीफनला भरलेले पाहतो. आत्मा महान चमत्कार आणि चिन्हे करत आहे. त्याचा विश्वास व धैर्य आपल्याला ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जगण्याची प्रेरणा देते.
शुभवर्तमानात, येशू घोषित करतो, मी जीवनाची भाकर आहे; जो कोणी माझ्याकडे येतो त्याला भूक लागणार नाही. तो आपल्याला त्याचा शोध घेण्यास त्याच्या उपस्थितीची तहान भागविण्यासाठी आमंत्रित करतो. आपण ख्रिस्ताबद्दलच्या आपल्या उत्कटतेची ज्योत प्रज्वलित केली पाहिजे! स्टीफनप्रमाणे, आपण ख्रिस्तासाठी जगण्याची आवड बाळगतो, तेव्हा जगासोबत त्याचे प्रेम आणि आनंद वाटण्यापासून आपल्याला काहीही रोखू शकत नाही. परंतु जेव्हा उत्साहाचा अभाव असतो, तेव्हा सर्वात लहान अडचणी देखील आपल्याला अडथळा आणू शकतात. प्रार्थना, सेवा आणि सुवार्तिकरणासाठी आपली उत्कटता पुन्हा जागृत करू या.
प्रार्थना :-हे प्रभू येशू, पूर्ण विश्वासाने तुझी वचने स्वीकारावीत आणि तुझ्या स्वर्गीय अन्नाची आम्हाला ओढ लागावी म्हणून आम्हाला कृपादान दे, आमेन.
0 टिप्पण्या