पुनरुत्थानकाळ सहावा सप्ताह
सोमवार दि. ११ मे २०२६
"जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, "When the Helper comes, whom I will send to you from the Father, the Spirit of truth,
इ. स. १७२२ साली इग्नेशिअस ह्याला आपले व्रत घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतरची २० वर्षे एक प्रापंचिक व्रतस्थ बंधू म्हणून जीवन जगत असताना इग्नेशियस देवाच्या व शेजाऱ्यांच्या प्रेमात वाढत गेला.
इ. स. १७४१ साली त्याला भिक्षुक म्हणून जिकडे तिकडे दान मागत फिरण्याची दीक्षा देण्यात आली त्यावेळी त्याचे वय ४० वर्षांचे होते. उरलेल्या ४० वर्षामध्ये इग्नेशियसने ह्या आपल्या पाचारणाला साजेसे असे जीवन व आचरण ह्याकडे बारकाईने लक्ष पुरविले. तो ह्या प्रेषितीय कार्यामध्ये आजाऱ्यांना आवर्जून भेटी द्यायचा. अज्ञानी बांधवांना शिकवायचा, अंधश्रद्धाळू भाविकात खऱ्या श्रद्धेची शिकवण पेरायचा.
अशा प्रकारे दिवसभर श्रम घेतल्यामुळे त्याला प्रार्थनेसाठी अत्यंत कमी वेळ मिळत असे. त्यासाठी रात्री तो तासन्तास प्रार्थनेमध्ये घालवी आणि फक्त एक तास लाकडाचा ओंडका उशाशी घेऊन जिथे कुठे आसरा मिळेल त्याठिकाणी तो विश्रांती घेई. असे असूनही अगदी वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत त्यांना भरभक्कम अशी साथ लाभत गेली. शेवटी ११ मे १७८१ रोजी त्याच्या भटकंतीला पूर्णविराम मिळाला. पोप पायस बारावे ह्यांनी १९५१ साली त्यांना संतमालिकेत सन्मानीत केले.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १६:११-१५
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"लुदियेचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलच्या सांगण्याकडे तिचे लक्ष दिले. "
त्रोवसा पासून हाकारून आम्ही नीट संथारा येथे गेलो आणि दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो, तेथून फिलीपी येथे गेलो, ते माझेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती, ती चुनतीरा नगरची असून जांभळी वस्त्रे विकीत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा आणि तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली, "मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहा तर माझ्या घरी येऊन राहा.' तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 16:11-15
Setting sail from Troas, we made a direct voyage to Samothrace, and the following day to Neapolis, and from there to Philippi, which is a leading city of the district of Macedonia and a Roman colony. We remained in this city some days. And on the Sabbath day we went outside the gale to the riverside, where we supposed there was a place of prayer, and we sat down and spoke to the women who had come together. One who heard us was a woman named Lydia from the city of Thyatira, a seller of purple goods, who was a worshipper of God. The Loed opened her heart to pay attention to what was said by Paul. And after she was baptised and her household as well, she urged us, saying, "If you have judged me to be faithful to the Lord, come to my house and stay. And she prevailed upon us.
This is the word of God
Thanks be to God
