सामान्यकाळातील तेरावा सप्ताह
बुधवार दि. १ जुलै २०२६
आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले.and coming into the city, told every thing, and concerning them that had been possessed by the devils.
पहिले वाचन : आमोस ५:१४-१५.२१-२४
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या, परंतु धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो."
तुम्ही वाचावे म्हणून चांगल्याच्या मागे लागा; वाइटाच्या मागे लागू नका म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल. वाइटाचा द्वेष करा,चांगल्याची आवड धरा. वेशीत न्याय स्थापित करा; परमेश्वर, सेनाधीश देव योसेफच्या उरलेल्या लोकांवर कदाचित दया करील.
प्रभू परमेश्वर म्हणतोः तुमच्या उत्सवाचा मला तिटकारा आहे, मी तुच्छ मानतो; तुमच्या पवित्र मेळ्यांचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम आणि अन्नार्पणे अर्पिली तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूच्या शांत्यर्पणांकडे मी ढुंकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या, तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे आणि धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो."
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Amos 5: 14-15, 21-24
Seek ye good, and not evil, that you may live: and the Lord the God of hosts will be with you, as you have said. Hate evil, and love good, and establish judgment in the gate: it may be the Lord the God of hosts may have mercy on the remnant of Joseph. I hate, and have rejected your festivities: and I will not receive the odour of your assemblies. And if you offer me holocausts, and your gifts, I will not receive them: neither will I regard the vows of your fat beasts. Take away from me the tumult of thy songs: and I will not hear the canticles of thy harp. But judgment shall be revealed as water, and justice as a mighty torrent.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४९:७,८,९,१०-११,१२-१३,१६-१७
प्रतिसाद : जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.
१ माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे;
हे इस्राएल, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो; मी देव, तुझा देव आहे.
२ तुझ्या यज्ञसंबधांने तर मी तुला बोल लावत नाही,
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच.
तुझ्या घरचा गोऱ्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले
बोकड मला घ्यावयाचे नाहीत.
४ मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही,
कारण जग आणि जगातले सर्वकाही माझे आहे.
बैलांचे मांस मी खाणार काय ?
बोकडाचे रक्त मी पिणार काय ?
५ माझे नियम जाहीर करणारा तू कोण ?
माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण ?
तू तर शिस्तीचा द्वेष करतोस,
माझी वचने मागे झुगारून देतोस.
: Psalms 50: 7, 8-9, 10-11, 12-13, 16bc-17
R. (23b) To the upright I will show the saving power of God.
7 Hear, O my people, and I will speak: O Israel, and I will testify to thee: I am God, thy God.
R. To the upright I will show the saving power of God.
8 I will not reprove thee for thy sacrifices: and thy burnt offerings are always in my sight.
9 I will not take calves out of thy house: nor he goats out of thy flocks.
R. To the upright I will show the saving power of God.
10 For all the beasts of the woods are mine: the cattle on the hills, and the oxen.
11 I know all the fowls of the air: and with me is the beauty of the field.
R. To the upright I will show the saving power of God.
12 If I should be hungry, I would not tell thee: for the world is mine, and the fulness thereof.
13 Shall I eat the flesh of bullocks? or shall I drink the blood of goats?
R. To the upright I will show the saving power of God.
16bc Why dost thou declare my justices, and take my covenant in thy mouth?
17 Seeing thou hast hated discipline: and hast cast my words behind thee.
R. To the upright I will show the saving power of God.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia: James 1: 18
R. Alleluia, alleluia.
18 The Father willed to give us birth by the word of truth that we may be a kind of firstfruits of his creatures.
R. Alleluia, alleluia.
