Marathi Bible Reading | 14th week in ordinary Time | Monday 6th July 2026 |

 सामान्यकाळातील चौदावा सप्ताह 

सोमवार  दि. ६ जुलै  २०२६

 “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”

"Take heart, daughter; your faith has made you well."

संत मारिया गोरेटी

- कुमारिका, रक्तसाक्षी (१८९०-१९०२) 

अगदी आधुनिक काळातील ही शुद्धतेचा आदर्श असलेली विसाव्या शतकातील  इटालीतील मार्चे प्रांतातील कोरियाल्डो येथे एका शेतमजुराच्या घरात जन्मलेल्या सात भावंडांमध्ये मारियाचा क्रमांक तिसरा होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे ती कधीही शाळेत जाऊ शकली नाही.. तिच्या अशिक्षित आईने मात्र आपल्या माहितीतले सर्व प्रकारचे धर्मशिक्षण घरीच शिकवून तिच्यात ख्रिस्ती सद्गुणांची जोपासना केलेली होती. मारियेचे वडील मरण पावले. त्यामुळे शेतमजुरीच्या कामाचा संपूर्ण भार तिच्या आईवर येऊन पडला. आपल्या लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी मात्र मारियेने पूर्ण मनाने स्वीकारली.
वयाच्या ११ व्या वर्षी प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारला. त्याची पूर्वतयारी म्हणून तिने खास आध्यात्मिक तपसाधना केलेली होती.  आतापर्यंत येशूला कोणत्याही पापाने तिने दुःखविण्याचे कौशल्याने टाळलेले होते. आज्ञाधारकपणा, नेमस्तपणा, शुद्धता आणि देवाचे भय तिच्याठायी ओतप्रोत भरून वाहात होते. परंतु आता तिने आपल्या प्रभूला संतोषविण्याचा आणि सर्वांना मदत करण्याचा जाणीवपूर्वक निश्चय केला.
कुमसाराला जायचे म्हणजे सात मैलांचे अंतर कापायचे आणि येताना तितकेच अंतर चालायचे. परंतु आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तिने तो त्याग सहजरित्या करून दाखविला.
तिच्या घराशेजारी आलेक्झांड्रो नावाचा एक विकृत मनोवृत्तीचा आणि वासनेने होरपळत असलेला तरुण राहात होता. अनैतिक कृत्य करण्यासाठी त्याने ११ वर्षीय मारिया हिला तीन वेळा मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्याने तिच्यावर १४ वेळा वार केले. मारिया रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि ६ जुलै १९०२ साली मरण पावली. मरता मरता तिने आपल्या आईजवळ एक इच्छा व्यक्त केली की, 'ज्या व्यक्तीने हे पापकृत्य केलेले आहे तिचे पूर्णपणे परिवर्तन व्हावे.'
देव नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. आलेक्झांड्रोने हे कृत्य केल्यानंतर तो घरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. २९ वर्षे तुरुंगात राहिला. परंतु त्या कालावधीत कित्येक वेळा त्याला मारिया गोरेटी हिने दर्शने देऊन आपल्या पापांबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त केले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आलेक्झांड्रो एका मठात गेला. तेथे त्याने आपल्या पूर्वायुष्यातील सर्व पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि धर्मगुरूपदाची दीक्षा स्वीकारली.
असे करता करता १९५० साल उजाडले. पोप पायस बारावे ह्यांनी २५ जून रोजी पवित्र वर्षानिमित्ते आयोजित केलेल्या एका सोहळ्यात मारिया गोरेटी हिला संतपद बहाल केले. त्यावेळी इतिहासात नोंदविल्या जाव्यात अशा तीन गोष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे रोमच्या इतिहासात पहिल्यांदाच संत पीटर बॅसिलिकामध्ये भाविकांची एवढी प्रचंड गर्दी जमलेली होती की हा अतिभव्य सोहळा संत पीटरच्या उघड्या मैदानावर घेण्यात आला.
दुसरी गोष्ट ह्या संताच्या संतीकरणासाठी स्वतः तिची वृद्ध, अर्धागवायूने पछाडलेली आई उपस्थित होती आणि तिसरी गोष्ट आलेक्झांड्रो हा धर्मगुरू होऊन या सोहळ्यासाठी उपस्थित होता. मारिया गोरेटीने केलेली प्रार्थना ऐकली गेली होती तर !

चिंतन : मरतेसमयी मारिया गोरेटीने आपल्या आईला सांगितले, “आई, जरी त्याने माझे तुकडे केले असते तरी मी कधीच पाप केले नसते. पापापेक्षा मला मरण आले तरी चालेल.” - संत मारिया गोरेटी
✝️   
पहिले वाचन :होशेय २:१४.१५-१६.१९-२०
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“धर्माने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन."
परमेश्वर म्हणतो : “मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. ती आपल्या तारुण्यातल्या दिवसांतल्याप्रमाणे, आणि इजिप्त देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की तू मला 'इशी' म्हणजे 'माझा पती' म्हणशील; यापुढे कधी मला 'बाली' म्हणजे 'माझा धनी' म्हणणार नाहीस. मी तुला सर्वकाळची आपली वाग्दत्त असे करीन; धर्माने, न्यायाने, ममतेने आणि दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन आणि तू परमेश्वराला ओळखशील.”
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Hosea 2:14-16,19-20

Thus says the Lord: "Behold, I will allure her, and bring her into the wilderness, and speak tenderly to her. And there she shall answer as in the days of her youth, as at the time when she came out of the land of Egypt. "And in that day, declares the Lord, you will call me 'My Husband', and no longer will you call me 'My Baal'. And I will betroth you to me for ever. I will betroth you to me in righteousness and in justice, in steadfast love and in mercy. I will betroth you to me in faithfulness. And you shall know the Lord."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १४५:२-९
प्रतिसाद :   परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.

१) मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन 
आणि सदासर्वकाळ तुझ्या नामाचे स्तवन करीन. 
परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे; 
त्याची थोरवी अगम्य आहे.

२) एक पिढी दुसऱ्या पिढीला तुझ्या 
कृत्यांची प्रशंसा करीत राहील,
 त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. 
तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप 
आणि तुझी अद्भुत कृत्ये यांचे मी मनन करीन.

३) तुझ्या भयावह कृत्यांचे प्राबल्य लोक जाहीर करतील,
 मी तुझे महात्म्य वर्णीन.
ते तुझ्या परमकृपेची आठवण काढतील 
आणि तुझ्या न्याय्यत्वाचे पोवाडे गातील.

४ परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे; 
तो मंदक्रोध आणि अतिदयाळू आहे.
 परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे; 
त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.

Psalm 145:2-3, 4-5, 6-7, 8-9

The Lord is kind and full of compassion. 

I will bless you day after day, 
and praise your name forever and ever. 
The Lord is great and highly to be praised; 
his greatness cannot be measured. R

Age to age shall proclaim your works, 
shall declare your mighty deeds. 
They will tell of your great glory and splendour,
and recount your wonderful works.

They will speak of your awesome deeds, 
recount your greatness and might. 
They will recall your abundant goodness, 
and sing of your just deeds with joy. R

The Lord is kind and full of compassion, 
slow to anger, abounding in mercy. 
How good is the Lord to all, 
compassionate to all his creatures. R. 


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर,
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
 आलेलुया!

Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
 Our Saviour Christ Jesus abolished death and brought life and immortality to light through the gospel.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मत्तय ९:१८-२६
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
"माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण या म्हणजे ती जिवंत होईल."
येशू योहानच्या शिष्यांबरोबर बोलत असताना कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, "माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल." तेव्हा येशू उठला आणि त्याच्यामागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पाहा, बारा वर्षे रक्तस्त्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली; ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन." तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यांस आणि गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला, “वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. हे वर्तमान त्या अखिल देशात पसरले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 

Matthew 9:18-26


At that time while Jesus was speaking, behold, a ruler came in and knelt before him, saying, "My daughter has just died, but come and lay your hand on her, and she will live." And Jesus rose and followed him, with his disciples. And behold, a woman who had suffered from a discharge of blood for twelve years came up behind him and touched the fringe of his garment, for she said to herself, "If I only touch his garment, I will be made well." Jesus turned, and seeing her he said, "Take heart, daughter; your faith has made you well." And instantly the woman was made well. And when Jesus came to the ruler's house and saw the flute players and the crowd making a commotion, he said, "Go away, for the girl is not dead but sleeping." And they laughed at him. But when the crowd had been put outside, he went in and took her by the hand, and the girl arose. And the report of this went through all that district.

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन
होशेया संदेष्टा दाखवतो की देव आपल्या लोकांना प्रेमाने पुन्हा वाळवंटात नेतो- दंडासाठी नव्हे, तर हृदयाशी बोलण्यासाठी. वाळवंट म्हणजे एकांत, जिथे देवाशी नाते नव्याने उभे राहते आणि तुटलेले संबंध पुनस्र्थापित होतात. देव आपल्याला "माझी पत्नी" म्हणून पुन्हा स्वीकारतो- नात्यातील निष्ठा, करुणा आणि प्रेमाची हमी देतो. त्याचे प्रेम तात्पुरते नाही; ते चिरंतन, विश्वसनीय आणि बांधिलकीचे आहे. मत्तयाच्या सुवार्तेत रक्तस्रावाच्या स्त्रीचा स्पर्श आणि प्रमुखाच्या मुलीवरील विश्वास या दोन्ही घटना विश्वासाच्या सामर्थ्याची साक्ष देतात. केवळ येशूच्या वस्त्राला स्पर्श करण्याचा तिचा विश्वास तिला संपूर्ण बरे करतो. आणि अधिकारी दृढ विश्वास मृत मुलीला जीवन देतो-विश्वास मृत अवस्थेलाही पुन्हा उठवतो. दोन्ही जणांची गरज वेगळी होती, पण उत्तर एकच-येशूकडे प्रामाणिक विश्वासाने धाव घेणे. देवाचे प्रेम (होशेया) आणि येशूची करुणा (मत्तय) आपल्याला शिकवतात की विश्वास नातेही बरे करतो आणि शरीरही. देव आपल्याला बोलावतो- संशय नव्हे, तर विश्वासाने त्याच्याकडे यावे, आणि तो आपल्या जीवनात आरोग्य, पुनर्बाधणी आणि नवीनता आणील.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्यावरील आमची श्रध्दा वाढावी म्हणून आम्ही सर्वस्वी  तुला शरण येतो आमचा स्वीकार कर, आमेन.
✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या