सामान्यकाळातील १७ वा सप्ताह
शुक्रवार दि ३१ जुलै २०२६
"हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ? हा सुताराचा मुलगा ना ?'Where did the man get this wisdom and these miraculous powers? This is the carpenter's son, surely?
लोयोलाचे संत इग्नेशिअसचा सण :वर्तनसाक्षी (१४९१-१५५६)
उत्तर स्पेनमधील लोयोला येथल्या राजघराण्यात इनिगो ह्याचा जन्म झाला. पाम्पलोना येथल्या युद्धात जखमी झाल्यानंतर आपल्या बिछान्यात विश्रांती घेत असताना त्याने ख्रिस्ताचे चरित्र आणि संतांची जीवनचरित्रे ह्यांचे वाचन केले. त्यावरून आपले जीवन किती पोकळ आणि अर्थहीन आहे ह्याची जाणीव इग्नेशिअस ह्यांना झाली. त्याने स्वतःशी प्रश्न केला, “जर ही सगळी माणसे संतपदाला जाऊन पोहोचू शकत असतील तर मी का नाही?”आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर इग्नातीने मानरेसा येथील एकांतवासात एक वर्ष घालविले. देवाची आपल्याबाबत काय इच्छा आहे ते त्याने शोधण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पवित्र भूमीची तीर्थयात्रा केली. बार्सेलोना येथील प्रशिक्षण केंद्रात त्याने लॅटीन भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे वय ३३ वर्षे एवढे होते. त्यापुढील ११ वर्षे इग्नाती ह्याने तत्वज्ञान आणि ईशज्ञान या विषयांचा अभ्यास करण्यात खर्ची घातली.
पॅरीस शहरातील विश्वविद्यालयात इ. स. १५३५ साली त्याने पदवी संपादन केली. त्यावेळी आत्मक्लेश, गरिबी आणि आध्यात्मिक साधना या गुणांनी सजविलेल्या जीवनपद्धतीने त्यांनी ६ तरुणांना आपणाकडे आकर्षून घेतले. त्यातील दोघे पुढे संतपदाला पोहोचले. एक होते संत पीटर फेबर आणि दुसरे संत फ्रान्सिस झेवियर (सण ३ डिसेंबर).
ह्या सात जणांनी पोप पॉल दुसरे ह्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगण्याचे ठरविले, ख्रिस्तसभेच्या शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी ह्या जगाच्या आकर्षणात अडकून पडलेल्या भाविकांना शाश्वत सुखाची ओळख करून देण्यासाठी ह्या सात जणांच्या समुहातून परमेश्वर एका नवीन सोसायटीची योजना हळूहळू आपणासमोर साकार करीत आहे ह्याची जाणीव पोपमहाशयांना झाली.
इ. स. १५४० साली पोपमहाशयांनी “द सोसायटी ऑफ जिझस" जेसुईट्स किंवा येशूसंघ, ह्या धार्मिक व्रतस्थांच्या संस्थेला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर इग्नाती लोयोलाकर ह्यांना या संस्थेचे पहिले जनरल म्हणून निवडण्यात आले. त्यांनी लगेच आपल्या संस्थेची आचारसंहिता तयार केली. त्यात कोणत्याही एका विशिष्ट पेहरावाचा समावेश करण्याचे त्यांनी टाळले. दैनंदिन भक्तीच्या प्रार्थना आपल्या आचारसंहितेतून वगळली. त्याऐवजी आपल्या धर्मगुरूंनी आत्मपरीक्षण- चिंतन- ध्यान-साधना करावी, प्रवचने दयावीत, कुमसार ऐकावे, शाळा कॉलेजांतून मुलामुलींना शिक्षण दयावे, यासाठी तपसाधना आयोजित करावी ह्यावर त्यांनी भर दिला.
लवकरच ही संस्था झपाट्याने फोफावत गेली. येशूसंघीय धर्मगुरू इटालीच्या रस्त्यारस्त्यांतून साध्यासोप्या भाषेत प्रभूची सुवार्ता घोषवू लागले. आजारी व गरीब ह्यांची सेवा करू लागले. लोकांना वारंवार संस्कार स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करू लागले. युरोपातील इतर देशांतही त्यांच्या कार्याचा प्रभाव पडला. आफ्रिका, अमेरिका, भारत व जपान इत्यादी देशात येशूसंघीय धर्मगुरूंचे कार्य व संख्या भराभर वाढत गेली.१६ वर्षांनंतर ३१ जुलै १५५६ रोजी जेव्हा इग्नेशिअस लोयोलाकर मरण पावले तेव्हा येशू संघीयामध्ये १,००० धर्मगुरू आणि जगभर संस्थाच्या १०० शाखा इत्यादींचे कार्य सुरू होते. पोप ग्रेगरी पंधरावे ह्यांनी येशूसंघाचे कार्य पाहून इ. स. १६६२ साली इग्नेशियस ह्यांना संतपद बहाल केले.
चिंतन : जितकी परिस्थिती निराशाजनक भासेल तितकी अधिक आशा व भरवसा आपण परमेश्वरावर दाखवला पाहिजे. जेव्हा मानवी श्रम व सहाय्य कमी पडते तेव्हा ईश्वरी कृपा कार्यरत होते. - लोयोलाचे संत इग्नेशिअस
पहिले वाचन : यिर्मया २६:१-९वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन"सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात जमा झाले."
यहुदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी परमेश्वरापासून जे वचन प्राप्त झालेः "परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा आणि यहुदाच्या सर्व नगरातून जे परमेश्वराच्या मंदिरात भजनपूजन करायला येतात त्यांना जे शब्द बोलण्याची मी तुला आज्ञा केली आहे ते सर्व त्यांना सांग; एकही शब्द वगळू नकोस. न जाणो ते कदाचित ऐकतील आणि त्यातला प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्यांच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्यांच्यावर जे अरिष्ट आणण्याचेमी योजले आहे त्याविषयी मला अनुताप होईल. त्यांना सांग की, 'परमेश्वरा असे म्हणतो : तुम्ही माझे ऐकणार नाही, मी तुम्हांपुढे ठेवलेल्या नियमांप्रमाणे तुम्ही चालणार नाही, माझे सेवक जे संदेष्टे त्यांना मी मोठ्या निकडीने तुम्हांकडे पाठवले असता त्यांचे तुम्ही ऐकले नाही, त्यांची वचने आता तुम्ही ऐकणार नाही; तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमुक्त करीन."ही वचने परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाला बोलताना याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सर्व लोकांनी ऐकले. ती वचने सर्व लोकांना कळवावी म्हणून यिर्मयाला परमेश्वराने सांगितले होते; ती सर्व त्याने बोलण्याची संपवल्यावर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सर्व लोकांनी यिर्मयाला पकडून म्हटले, "तू मेलाच पाहिजेस. 'हे मंदिर शिलोप्रमाणे होईल आणि हे नगर उजाड आणि निर्जन होईल,' असा संदेश तू परमेश्वरांच्या नावाने का दिलास ?" मग सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाच्या भोवती जमले. प्रभूचा शब्द आहे सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Jeremiah 26:1-9
In the beginning of the reign of Jehoiakim the son of Josiah, king of Judah, this word came from the Lord: "Thus says the Lord: Stand in the court of the Lord's house, and speak to all the cities of Judah that come to worship in the house of the Lord all the words that I command you to speak to them; do not hold back a word. It may be they will listen, and every one turn from his evil way, that I may relent of the disaster that I intend to do to them because of their evil deeds. You shall say to them, 'Thus says the Lord: If you will not listen to me, to walk in my law that I have set before you, and to listen to the words of my servants the prophets whom I send to you urgently, though you have not listened, then I will make this house like Shiloh, and I will make this city a curse for all the nations of the earth." The priests and the prophets and all the people heard Jeremiah speaking these words in the house of the Lord. And when Jeremiah had finished speaking all that the Lord had commanded him to speak to all the people, then the priests and the prophets and all the people laid hold of him, saying, "You shall die! Why have you prophesied in the name of the Lord, saying, This house shall be like Shiloh, and this city shall be desolate, without inhabitant?" And all the people gathered around Jeremiah in the house of the Lord.This is the word of God Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : ६९:५,८-१०,१४प्रतिसाद : हे देवा, तू मला उत्तर दे.
१ विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक आहेत. अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे, बलिष्ठ आहेत; मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले.
२ तुझ्याकरिता मी निंदा सहन केली आहे, लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे, मी आपल्या भावांना नवखा, माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे. कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे.
३ मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो, हे देवा,तू आपल्या अमाप दयेला अनुसरून आणि आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्याला अनुसरून मला उत्तर दे. Psalm 69:5, 8-10, 14In your great mercy, answer me, O Lord.
More numerous than the hairs on my headare those who hate me without cause. Many are those who attack me, enemies with lies.What I have never stolen, how can I restore? R
It is for you that I suffer taunts, that shame has covered my face.To my own kin I have become an outcast, a stranger to the children of my mother. Zeal for your house consumes me, and taunts against you fall on me. R
But I pray to you, O Lord,for a time of your favour.In your great mercy, answer me, O God, with your salvation that never fails. R
जयघोष आलेलुया, आलेलुया! हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात. आलेलुया!
"हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ? हा सुताराचा मुलगा ना ?'Where did the man get this wisdom and these miraculous powers? This is the carpenter's son, surely?
आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर इग्नातीने मानरेसा येथील एकांतवासात एक वर्ष घालविले. देवाची आपल्याबाबत काय इच्छा आहे ते त्याने शोधण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यानंतर त्याने पवित्र भूमीची तीर्थयात्रा केली. बार्सेलोना येथील प्रशिक्षण केंद्रात त्याने लॅटीन भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे वय ३३ वर्षे एवढे होते. त्यापुढील ११ वर्षे इग्नाती ह्याने तत्वज्ञान आणि ईशज्ञान या विषयांचा अभ्यास करण्यात खर्ची घातली.