सामान्य काळातील एकविसावा आठवडा
मंगळवार २५ ऑगस्ट २०२६
रे आंधळ्या परुशा, पहिल्याने वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल."You blind Pharisee! First clean the inside of the cup and the plate, that the outside also may be clean."
चिंतन : “पाप करण्याऐवजी कोणतेही दुःख सहन करण्यास तयार असा.
"-संत लुईस नववे
देवाचे न्यायीपण देवाची दया व देवाचा विश्वासुपणा देव मानवावर करीत असलेल्या निःस्वार्थी प्रेमात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिकवणुकीद्वारे आपल्याला त्याच प्रेमाचा खरा अर्थ सांगितला. मात्र आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू शास्त्री व पुरुश्यांना ढोंगी म्हणत आहे, कारण नियम शास्त्रातील न्याय, दया व विश्वास ह्या संबंधाने त्यांचे आचरण ढोंगीपणाचे होते. धर्माच्या व नियमशास्त्राच्या आधारे शास्त्रीपरुशी सामान्य माणसांवर अन्याय व अत्याचार करीत होते. त्यांचे जीवन स्वार्थी व दांभिकपणाचे होते. त्यांनी लोकांवर दयाभाव दाखविला नाही. प्रभू येशूने त्याच्या शिकवणुकीद्वारे देव दयाळू, कनवाळू व प्रेमळ आहे, हा संदेश दिला.
✝️
पहिले वाचन : : २थेस्सलनि २:१-३, १४-१७
वाचन :पौलचे थेस्सलनिकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“जे संप्रदाय तुम्हांस शिकवले ते बळकट धरून राहा.' "
बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन आणि त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हांला अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका आणि घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने, किंवा जणू काय आम्हांकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका.
परमेश्वराने तुम्हांला आमच्या सुवार्तेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूंनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हांला शिकवले ते बळकट धरून राहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन आणि चांगली आशा कृपेद्वारे दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आणि उक्तीत तुम्हांला स्थिर करो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Thessalonians 2:1-3a, 14-17
Now concerning the coming of our Lord Jesus Christ and our being gathered together to him, we ask you, brothers, not to be quickly shaken in mind or alarmed, either by a spirit or a spoken word, or a letter seeming to be from us, to the effect that the day of the Lord has come.
Let no one deceive you in any way. To this he called you through our gospel, so that you may obtain the glory of our Lord Jesus Christ. So then, brothers, stand firm and hold to the traditions that you were taught by us, either by our spoken word or by our letter. Now may our Lord Jesus Christ himself, and God our Father, who loved us and gave us eternal comfort and good hope through grace, comfort your hearts and establish them in every good work and word.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९६: १०-१३
