Marathi Bible Reading | 21st week in ordinary Time | Wednesday 26th August 2026

 सामान्य काळातील एकविसावा  आठवडा

बुधवार २६ ऑगस्ट  २०२ 

तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने आणि अनीतीने भरलेले आहा."but inside you are full of hypocrisy and lawlessness.

संत झेफिरिनस

- परमगुरू, रक्तसाक्षी (-२१७)

संत व्हिक्टर पहिले ह्या पोपमहाशयांच्या मृत्यूनंतर झेफिरिनस हे १९९ साली पंधरावे पोप म्हणून संत पीटरचे वारीस बनले. तीनच वर्षानंतर सम्राट सेप्टिमिअस सेव्हरस ह्यांनी एका जाहीरनाम्याद्वारे ख्रिस्ती धर्मांतराला पूर्णपणे बंदी घातली. इतकेच नव्हे तर ख्रिस्ती लोकांचा छळ करायला सुरुवात केली. खरं पाहता त्याची आई ख्रिस्ती असल्यामुळे प्रारंभी त्याने ख्रिस्ती धर्माविषयी सहिष्णुतेची भावना बाळगलेली होती. आता मात्र चक्रे वेगळ्या दिशेने फिरू लागली.
अशा पार्श्वभूमीवर ख्रिस्ती लोकांना उपासनेत सहभागी होता यावे या हेतूने पोप झेफिरिनस ह्यांनी आपला आर्चडिकन कॅलिस्टस (सण १४ ऑक्टोबर) ह्याच्यावर 'कॅटॅकोम्ब' (प्रार्थना-गुहा) तयार करण्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी अत्यंत कौशल्याने कितीतरी मैल अशा गुहा तयार करून घेतल्या. इ.स.१८४९ साली अशा एका गुहेमध्ये संत कॅलिस्टस आणि पोपमहाशय ह्यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराच्या काही प्रती आढळल्या. पुढे हे आर्चडिकन कॅलिस्टस पोप कॅलिस्टस पहिले म्हणून ख्रिस्ती जगताचे नेतृत्व करू लागले.
संत झेफिरिनस ह्यांना आपल्या कारकीर्दीत बऱ्याच नवपंथियांशी आणि उपपंथांशी सामना करावा लागला. त्यात टर्युलियन सारखा ख्रिस्तसभेचा विद्वानपुरुष 'मॉन्टेनिझम' या पाखंडी विचारसरणीला जाऊन मिळाला. ही मॉन्टेनिझम विचारसरणी त्यावेळी रोम शहरात खूप प्रभावी होती.
पोप झेफिरिनस ह्यांनी मिस्सामध्ये द्राक्षरसासाठी वापरावयाचे 'चॅलिस' (प्याला) लाकडी असू नयेत. जिथे धर्मग्राम अगदीच गरीब असेल आणि धातूंचे चॅलिस वापरणे त्या धर्मग्रामांना परवडणारे नसेल त्यांनी काचेचे चॅलिस वापरावेत असा आदेश दिला. तसेच इस्टरच्या पवित्र दिनी सर्व श्रद्धावंतांनी पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारणे आवश्यक आहे असाही नियम त्यांनी केला.
* पोप झेफिरिनस ह्यांना २६ ऑगस्ट इ.स. २१७ साली रक्तसाक्षीत्वाचा मुकूट मिळाला..... त्यांच्या देहाचे अवशेष रोममधील इंग्लिश कॅथलिकांचे चर्च समजल्या जाणाऱ्या सान सिल्व्हेस्ट्रो चर्चमध्ये ठेवण्यात आलेले आहेत.                                                    ✝️ 

पहिले वाचन : २ थेस्सलनीकरांस पत्र ३:६-१०.१६-१८
वाचन :पौलचे थेस्सलनिकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या आणि आम्हापासून प्राप्त झालल्या संप्रदायाप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे. कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम आणि कष्ट करून काम केले. तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणालाकाम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. ही प्रत्येक पत्रात खूण आहे, मी अशा रीतीने लिहीत असतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :2 Thessalonians 3:6-10, 16-18

In the name of the Lord Jesus Christ, we urge you, brothers, to keep away from any of the brothers who lives an undisciplined life, not in accordance with the tradition you received from us. You know how you should take us as your model: we were not undisciplined when we were with you, nor did we ever accept food from anyone without paying for it; no, we worked with unsparing energy, night and day, so as not to be a burden on any of you. This was not because we had no right to be, but in order to make ourselves a model for you to imitate. We urged you when we were with you not to let anyone eat who refused to work. May the Lord of peace himself give you peace at all times and in every way. The Lord be with you all. This greeting is in my own hand-PAUL. It is the mark of genuineness in every letter; this is my own writing. May the grace of our Lord Jesus Christ be with you all.
This is the word of God 

Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र    १२८:१-२,४-५
प्रतिसाद : जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य !

१ जे परमेश्वराचे भय धरतात जे त्याच्याच मार्गानी चालतात ते धन्य !
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.

२ पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्यांना असा आशीर्वाद मिळेल.
तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देवो.



Psalm 128:1-2, 4-5

Blessed are all who fear the Lord.

1 Blessed are all who fear the LORD, who walk in obedience to him.

2 You will eat the fruit of your labor; blessings and prosperity will be yours.

3 Your wife will be like a fruitful vine within your house; your children will be like olive shoots around your table.

4 Yes, this will be the blessing for the man who fears the LORD.

5 May the LORD bless you from Zion; may you see the prosperity of Jerusalem all the days of your life.


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
 तुहे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
 आलेलुया!


Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
The word of God is living and active, discerning the thoughts and intentions of the heart.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मत्तय  २३:२७-३२
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा."

येशू म्हणाला, "अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहा, त्या बाहेरून खरोखरच सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने आणि अनीतीने भरलेले आहा."
"अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा, अशी स्वतः विरुद्ध साक्ष देता, तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 23:27-32 Jesus said, 'Alas for you, scribes and Pharisees, you hypocrites! You are like whitewashed tombs that look handsome on the outside, but inside are full of the bones of the dead and every kind of corruption. In just the same way, from the outside you look upright, but inside you are full of hypocrisy and lawlessness. Alas for you, scribes and Pharisees, you hypocrites! You build the sepulchers of the prophets and decorate the tombs of the upright, saying, "We would never have joined in shedding the blood of the prophets, had we lived in our ancestors' day." So! Your owrr evidence tells against you! You are the children of those who murdered the prophets! Very well then, finish off the work that your ancestors began.'
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                   
चिंतनयेशू आज धार्मिक नेत्यांच्या ढोंगीपणाची निंदा करतो. त्यांची तुलना रंगवलेल्या कबरीशी करतो. ज्या बाहेरून सुंदर मात्र आतून कुजलेल्या आहेत, ह्यास्तव, येशू खरा पश्चात्ताप व हृदयपरिवर्तनासाठी आवाहन करतो. कारण, आपण कितीही देखावा केला, कितीही मुखवटे धारण केले तरी परमेश्वर आपल्याला पूर्णपणे जाणतो. संदेष्टयांना जिवे मारण्यातील आपण नाहीत असा साळसूद आव आणणाऱ्यांचा खोटा मुखवटा तो फाडतो व तुम्हीही तुमच्या पूर्वजांचे वंशज आहात व अजूनही तसेच वागत आहात ह्याकडे त्यांचे लक्ष वेधतो. आजची उपासना आपल्याला वर्तणुकीची जबाबदारी घेत धैर्याने, प्रामाणिकपणे आणि आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी पाचारण करते.

प्रार्थना : हे प्रभू येशू, प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थीवृत्तीने तुझी शिकवण आचरणात आणण्यास आम्हाला प्रेरणा दे, आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या