वाचन १, यशया ६६ : १०-१४
यरूशलेम, सुखी हो! यरूशलेमवर प्रेम करणारे तुम्ही लोकहो, सुखी व्हा! यरूशलेमला दु:खकारक गोष्टी घडल्या म्हणून तुमच्यातील काही लोकांना दु:ख झाले आहे. पण आता तुम्ही सुखी व्हावे.
का? कारण आईच्या स्तनातून येणाऱ्या दुधासारखी दया तुम्हाला मिळेल, ते “दूध” तुम्हाला खरी तृप्ती देईल. तुम्ही ते दूध प्याल आणि तुम्ही यरूशलेमच्या वैभवाने खरोखरीच आनंदित व्हाल.
परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी तुम्हाला शांती देईन. मोठ्या नदीप्रमाणे ही शांती वाहत वाहत तुमच्याकडे येईल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा ओघ तुमच्याकडे येईल. पुराप्रमाणे हा संपत्तीचा ओघ येईल. तुम्ही लहान मुलासारखे व्हाल. तुम्ही ‘दूध’ प्याल. मी तुम्हाला उचलून कडेवर घेईन. मी तुम्हाला मांडीवर खेळवीन.
तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल. आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”
खरोखरी आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि गवताप्रमाणे वाढाल. परमेश्वराचे सेवक त्याचे सामर्थ्य पाहतील आणि परमेश्वराचे शत्रू त्याचा राग अनुभवतील.
हा प्रभूचा शब्द आहे
स्तोत्रे १३१:१-३
१)परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही. मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही. मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.
२)मी अगदी अविचल आहे. माझा आत्मा शांत आहे.
३)माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या बाळासारख अविचल आणि शांत आहे.4इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.
शुभवर्तमान, मत्तय १८: १-५
त्यावेळस शिष्य आले आणि त्यांनी विचारले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?”
तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले,
आणि म्हटले, ‘मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही.
म्हणून जो कोणी आपणांला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे.
आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.
प्रभूचे हे शुभवर्तमान

0 टिप्पण्या