(St Bruno of Cologne)6th October 2020

वर्तनसाक्षी संत ब्रुनो 

गलतीकरांस पत्र १:१३-२४

यहूदी धर्मातील माझ्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्ही ऐकले आहे. आणि हे जाणता की देवाच्या मंडळीचा मी भयंकर छळकेला होता. आणि तिचा नाश करण्याचा ही प्रयत्न केला.माझ्या यहूदी धर्माच्या पालनाबाबत मी माझ्या वयाच्यालोकांपेक्षा कितीतरी पुढे होतो. माझ्या पूर्वजांनी दिलेल्या शिकवणीविषयी मी त्याला पूर्ण वाहिलेला होतो. त्यामुळे मी जन्मण्याअगोदरच देवाने माझ्यासाठी वेगळी योजना आखली होती आणि त्याच्या कृपेत त्याची सेवाकरण्यासाठी त्याने मला बोलावले. आणि जेव्हा देवाने त्याचा पुत्र मला प्रगट करण्याचे ठरविले ते यासाठी की$,विदेशीलोकांमध्ये पुत्राविषयीची सुवार्ता मी सांगावी. मी कोणत्याही मनुष्याबरोबर सल्लामसलत केली नाही. किंवा जे माझ्यापूर्वीप्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी यरुशलेमात वर गेलो नाही. त्याऐवाजी मी ताबडतोब अरबस्तानात गेलो आणि मग दिमिष्कास परत आलो. मग तीन वर्षांनंतर पेत्राबरोबर ओळख करुन घेण्यासाठी यरुशेलमला गेलो. आणि त्याच्याबरोबर मी पंधरा दिवस राहिलो. परंतु प्रेषितांपैकी दुसऱ्यांना मी पाहिले नाही; मी फक्त प्रभु येशूचा भाऊ याकोब यालाच पाहिल. आणि मी देवासमोर शपथ घेऊन सांगतो की जे काही मी तुम्हांला लिहित आहे$ ते खोटे नाही. नंतर मी सूरीया व किलीकिया प्रांतांत गेलो. परंतु यहूदीया येथे विश्वासात ज्या ख्रिस्ताच्या मंडळ्या आहेत त्यांना मी व्यक्तीश: माहीत नव्हतो. त्यांनी फक्त ऐकलेहोते. लोक म्हणतात: “ज्या मनुष्याने ज्या विश्वासासाठी पूर्वी आपला छळ केला,ज्या विश्वासाचा त्याने नाश करण्याचाप्रयत्न केला तो आता त्याचीच घोषणा करीत आहे.” आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचे गौरव केले.

हा प्रभूचा शब्द आहे... 


स्तोत्र १३९:१-२,१३-१५

प्रतिसाद : हे देवा , मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव. 


१)परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.

२)परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते. परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. 

३)तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.


जयगोष                                                                         स्तोत्रे ११८:२७

आलेलूया,आलेलूया !

तुझे नियम मला समजावून दे,
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन .  

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १०:३८-४२


मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता$ तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करुन आदरातिथ्य केले. 39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली.पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.” प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

प्रभूचे हे शुभवर्तमान... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या