पहिले वाचन :मलाखी - ३ : १-४
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद :स्तोत्र २४:७-१०
प्रतिसाद : हा प्रतापशाली राजा कोण? हा प्रभू आहे.
१. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन दारांनो, उंच व्हा. प्रतापशाली राजाला आत येऊ द्या !
२. हा प्रतापशाली राजा कोण ? बलवान आणि पराक्रमी परमेश्वर, युध्दात पराक्रमी परमेश्वर तोच
३. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन दारांनो, उंच व्हा. प्रतापशाली राजाला आत येऊ द्या
४.हा प्रतापशाली राजा कोण ? हा सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशील राजा होय.
किंवा
दुसरे वाचन: इब्री २: १४-१८
वाचक : इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन
ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण, खरे पाहता, तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर आब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते. ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू आणि विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्याअर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दुःख भोगले त्याअर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
ते पराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड आणि तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे हे आहे.
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
(पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बाळ येशू व मरिया ह्यांचे शुध्दीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर येरुशलेमला घेऊन आले. ते अशासाठी की, येशूबाळाचे प्रभूला समर्पण करावे) (म्हणजे "प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा" असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे ") आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले यांचा यज्ञ करावा. तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य येरुशलेममध्ये होता, तो नीतिमान आणि भक्तिमान मनुष्य असून इस्राएलच्या तारणाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले :
“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिध्द केले आहे. ते परराष्टीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड आणि तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे."
त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप आणि त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, पुष्कळ लोकांच्या अंत:करणातील विचार उघडकीस यावे, ह्यासाठी इस्राएलमध्ये अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुध्द लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे (आणि पाहा, तुझ्या स्वत:च्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल)"
हन्ना नावाची एक प्रवक्ती होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती. ती फार वयोवृध्द झाली होती आणि कौमार्यकाल संपल्यापासून ती पतीजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चौऱ्याऐशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास आणि प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.
नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नाझरेथ येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.
प्रभूचे हे शुभवर्तमान...

0 टिप्पण्या