पुनरुत्थान
सहवा सप्ताह
शनिवार
१५ मे २०२१
St. Isidore, the Farmer
St. Isidore was born at Madrid, Spain, in the latter half of the 12th century. For the greater part of his life he was employed as a laborer on a farm outside the city. Many marvelous happenings accompanied his lifelong work in the fields and continued long after his holy death. He was favored with celestial visions and, it is said, the angels sometimes helped him in his work in the fields. St. Isidore died about the year 1130 and was canonized in 1622 by Pope Gregory XV.
Isidore’s wife, Maria Torribia, also called Maria de la Cabeza, who shared Isidore’s humble and laborious life, as well as his great care for the poor, is a Blessed whose feast is assigned to September 9.
PRAYER: Lord, all creation is Yours, and You call us to serve You by carrying for the gifts that surround us. May the example of St. Isidore urge us to share our food with the hungry and to work for the salvation of mankind. Amen.
Isidore’s wife, Maria Torribia, also called Maria de la Cabeza, who shared Isidore’s humble and laborious life, as well as his great care for the poor, is a Blessed whose feast is assigned to September 9.
PRAYER: Lord, all creation is Yours, and You call us to serve You by carrying for the gifts that surround us. May the example of St. Isidore urge us to share our food with the hungry and to work for the salvation of mankind. Amen.
शेतकरी संत ईझीडोर
व
संत पीटर आणि डायनेसिया सण
रक्तसाक्षी
✝️
जागतिक वैभव, क्षणभंगूर गोष्टी किंवा आजार व संकटातून मुक्ति मिळावी म्हणून आपण देवाला विनवितो. मात्र पवित्र आत्म्याठायी वरदाने मिळावीत म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करणे गरजेचे आहे.
आनंद हा परमेश्वराच्या कृपादानाचे फळ आहे. देवाकडे जसे आपण चांगले आरोग्य, सुख, समाधान मागतो त्याचप्रमाणे आध्यामिकतेने भरलेले पवित्र व आनंदमयी जीवन जगायला हवे. प्रभू येशू म्हणत आहे, 'मागा म्हणजे तुम्हास मिळेल ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.' परमेश्वराच्या आनंदात व वैभवात आपण सर्वकाळ असावे म्हणून त्याची मनधरणी करणे गरजेचे आहे.
आपण नक्की देवाकडे काय मागतो ह्यावर सुद्धा चिंतन करणे गरजेचे आहे. सुख आणि दुःख एकत्र नांदू शकत नाही तरीपण दुःख आणि आनंद एकत्र नांदू शकतात. संकटात व दुःखात सुद्धा परमेश्वराचा आनंद जीवनाला नवी उभारी व उमेद देऊ शकतात. असा आनंद हा चिरकाळ टिकणारा परिपूर्ण आनंद असतो.
प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या सर्वांना त्याच्या परिपूर्ण आनंदात सहभागी होण्यासाठी पाचारण करीत आहे. आपण प्रार्थनेद्वारे त्याच्याशी एकरूप होण्यासठी कृपा मागू या.
✝️
"मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही, पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. "
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. १८: २३-२८
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"येशू हाच ख्रिस्त आहे असे अपुल्लोने शास्त्रावरून दाखवले. "
अंत्युखिया येथे काही दिवस राहून पौल निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत आणि फ्रुगिया ह्यातील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.
तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता आणि शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहुदी इफिस येथे आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला केवळ योहानचा बाप्तिस्मा ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले आणि त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले. तो येथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहुद्यांचे खंडण करीत असे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४७:२-३,८-९,१०
प्रतिसाद : परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा आहे.
१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा,
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा.
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे,
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.
२) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे,
तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे,
देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
३) राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत,
आब्राहामच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे.
पृथ्वीवरील सर्व राजे देवाचे आहेत,
तो परमथोर आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १६:२३-२८
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पिता तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि विश्वास धरला आहे. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही, पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यामुळे तुमचा आनंद परिपूर्ण होईल. ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- स्वर्गीय पित्याकडे तुम्ही आत्मविश्वासाने प्रार्थना करता का? येशू आपल्या शिष्यांना वारंवार दाखले दृष्टांत देऊन शिकवतो येशू येथे प्रतिमा व अंक गणिताच्या भाषेत नाही तर साध्या सोप्या भाषेत बोलत आहे. येशू त्यांना स्वर्ग राज्याचा गुप्त खजिना उघड करतो आणि पित्याकडे प्रार्थना कशी करावी हे शिकवितो. आता येशू अंतःकरणापासून सोप्या शब्दात सांगतो. खुद्द स्वर्गीय पिता प्रेम आहे याची शिष्यांना खात्री कशी पटणार संत पौल रोमकरांस पत्रात म्हणतो कारण जितक्यांना यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याद्वारे देवपित्याचे पुत्र व कन्या या नव्या नात्याने जोडतो. येशूने शिष्यांचे देवाशी हे नाते जोडण्यासाठी कोणालाही देवाचा बाप म्हणून कोणीही हिंमत केली नाही. कारण येशूने आपल्या तारणासाठी क्रुसावर बलिदान समर्पित केले आहे. म्हणून धैर्याने आणि आत्मविश्वासाने आपण स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करू शकतो. आपल्यात पवित्र आत्म्याची उपस्थिती व कार्य हे पित्याशी जोडलेल्या नव्या नात्याचा जिवंत पुरावा आहे पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगे आपण आब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्यात बरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत.
प्रार्थना : हे आनंदाच्या उगमा, तुझ्या आनंदात परिपूर्णतेचे जीवन आनुभवण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

0 टिप्पण्या