सामान्यकाळातील ८वा सप्ताह
शनिवार
२९ मे २०२१
✝️
पृथ्वीवरील सर्व ऐहिक सुखापेक्षा प्रभू येशू ख्रिस्तावरच सर्वाधिक प्रेम करण्याची शिकवण सिरील नावाच्या मुलाला अगदी बालपणापासून त्याच्या ख्रिस्ती आईपासून मिळालेली होती. त्यामुळे सदान्कदा त्याच्या मुखात प्रभू येशू ख्रिस्ताचेच नाव असायचे. जेव्हा जेव्हा आपण हे अद्भुत सामर्थ्यशाली नाव घेतो तेव्हा तेव्हा आपल्याला आगळीवेगळी स्पंदने जाणवतात अशी कबुली सिरीलने अनेकदा दिलेली होती.
सिरीलची आई जरी अत्यंत भक्तीमान असली तरी त्याचे वडील नास्तिकवादाकडे झुकलेले मूर्तीपूजक असे होते. तो ख्रिस्ती धर्माचा कट्टर विरोधक होता. आपल्या मुलाने ख्रिस्ताचे नाव घेतल्यास तो त्याला झोडपून काढीत असे. हे सर्व सिरील मोठ्या आनंदाने सहन करी. तरुणपणी सिरीलला त्याच्या वडिलांनी घराबाहेर काढले. तेव्हा आपण महान प्रतिफळासाठी थोडक्या गोष्टींचा त्याग का करू नये? अशा शब्दात त्याने ह्या अपमानाचा स्वीकार केला.
त्यावेळी ख्रिस्ती धर्माचा भयंकर छळ केला जात असे. सिरीलच्या दृढ विश्वासाविषयीची बातमी कैसेरियाच्या गव्हर्नरच्या कानावर गेलेली होती. त्याने सिरीलला आपणासमोर हजर राहण्याचा आदेश दिला. प्रारंभी प्रारंभी त्या तरुण मुलाला आपल्या विश्वासापासून दूर राहण्यासाठी बरीच आमिषे दाखविण्यात आली. शेवटी त्याच्या अढळ निश्चयाकडे पाहून त्याला मरणदंडाच्या शिक्षेच्या जागेकडे नेण्यात आले आणि सर्व प्रकारची तीक्ष्ण हत्यारे दाखविण्यात आली. परंतु त्याचाही परिणाम सिरीलवर झाला नाही.
सिरीलचे कोवळे वय पाहून गव्हर्नरला त्याची दया आली त्याने सिरीलला मुक्त करून घरी जाण्याची सवलत दिली. परंतु त्यावेळी सिरील निर्भयपणे म्हणाला. “मी आनंदाने माझे घरदार सोडलेले आहे. कारण माझ्यासाठी मोठे प्रतिफळ स्वर्गात तयार आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.”
हे ऐकून गव्हर्नरने त्याला अग्नीकुंडात फेकून देण्याची आज्ञा दिली. त्याला धगधगत्या अग्नी कुंडापाशी नेण्यात आले. पुन्हा एकदा त्याला संधी द्यावी आणि त्याची मनस्थिती तपासून पहावी म्हणून त्याला माघारी आणण्यात आले. त्याचे मन तर स्वर्गीय आनंदाने इतके भरून गेलेले होते की आता आणखी उशीर करणाऱ्या आपल्या मारेकऱ्यांना तोच चेतावणी देऊ लागला. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याला मारेकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याला रक्तसाक्षीत्वाचा मुकूट प्राप्त झाला.
प्रभू येशू खरोखर देव आहे, हे सत्य दर्शविणारी वचने पवित्र शास्त्रात आहेत. प्रभू येशूचे सार्वभौमत्व, देवत्व आणि अधिकार ह्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याला आपण सर्वस्वी शरण जाऊ या. त्याच्या सामर्थ्याचा, कृपेचा व दयेचा अनुभव घेण्यासाठी त्याची मनोभावे प्रार्थना करु या.
✝️
"योहानचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसापासून होता ह्याचे मला उत्तर द्या.”
✝️
पहिले वाचन : बेन सिरा ५१:१२-२०
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जो मला ज्ञान देतो त्याचा मी गौरव गाईन."
यास्तव मी तुला धन्यवाद देईन, तुझे स्तवन करीन आणि प्रभूच्या नावाचा महिमा गाईन. मी तरुण असताना प्रवासात निघण्यापूर्वी मी माझ्या प्रार्थनेत उघडपणे ज्ञान मागितले. मंदिरासमोर उभा राहून ज्ञानासाठी प्रार्थना केली आणि शेवटपर्यंत मी ज्ञानाचा शोध घेतला. ज्ञान माझ्यामध्ये फुलत, फळत पिकलेल्या द्राक्षाप्रमाणे विकसित झाले आणि त्याने माझ्या सामान्यकाळातील आठवा सप्ताह शनिवार
मनाला आनंदित केले; मी सरळ मार्गाने चालत राहिलो आणि बालपणापासून ज्ञानमार्गाने चाललो. मी थोडेसे परिश्रम केले आणि मला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा मला असे कळून आले की मला खूप समन आलो आहे.
त्यामुळे माझी खूप प्रगती झाली. जो मला ज्ञान देतो त्याचा मी गौरव गाईन. ज्ञानानुसार वागण्याचा मी निश्चय केला आणि सत्कार्यासाठी मी झटत राहिलो मी कधी निराश होणार नाही. ज्ञानप्राप्तीसाठी मी संघर्ष करीत राहिलो, मी कडक आचरण ठेवले; मी स्वर्गाकडे माझे हात उंचावले आणि माझ्या अज्ञानाबद्दल मी रडलो. मी ज्ञानाकडे माझे लक्ष केंद्रित केले आणि माझ्या पवित्र आचरणामुळे ते मला प्राप्त झाले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १९:८-११
प्रतिसाद : परमेश्वराचे आदेश हृदयाला आनंदित करतात.
१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो असमंजास समंजस करतो.
२) परमेश्वराचे आदेश सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.
३ )परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वचैव न्याय्य आहेत.
४) ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणान्या मधापेक्षा गोड आहेत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझ्या आदेशांचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ११:२७-३३
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता ?”
येशू आणि त्याचे शिष्य पुन्हा येरुशलेमला आले आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री आणि वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?” येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या, म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हाला सांगेन. योहानचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसापासून होता ह्याचे मला उत्तर द्या.” तेव्हा ते आपसात विचार करू लागले: 'स्वर्गापासून होता' असे म्हणावे तर तो म्हणेल की, 'तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही ?' 'माणसापासून होता' असे म्हणावे तर ? त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- देवशब्दाचा अधिकार स्वीकारून तुम्ही देवशब्दाला श्रद्धा आणि आज्ञाधारकपणे शरण येता का? यहुदी धार्मिक अधिकाऱ्यांनी येशूच्या अधिकाराला विरोध केला, कारण येशू हा देवाकडून आला आहे हे सत्य ते स्वीकारू शकले नाही. येशूने मंदिराचे शुद्धीकरण केल्यानंतर यहुदी धर्माधिकारी खूप संतापले होते. येशूला कोंडीत पकडण्यासाठी प्रश्न विचारतात. येशूने सांगितले की, त्याला हा अधिकार देवाकडून मिळाला आहे. मग सांगायचे की, येशू दुर्भाषण करतो. आणि सांगितले की, स्वतःच्या अधिकाऱ्याने तर, येशूला रोमन अधिकाऱ्याला सांगून येशूला अटक करायची. त्यांचे हे कुटकारस्थान ओळखून येशूने त्यांना प्रतिप्रश्न केला. योहानाचे कार्य हे दैवी आहे की, मानवी आहे. जर त्यांनी सांगितले असते की देवाचे कार्य आहे. तर त्यांना येशू हा मसिहा आहे आणि योहान बाप्तिस्ता देवाचा संदेष्टा आहे असे स्वीकारावे लागले असते. त्यांनी योहान बाप्तिस्ताचा स्वीकार केला नाही आणि येशू मसिहा आहे, हे ही त्यांनी स्वीकारले नाही. आपल्याला येशूला आपल्या सोयीनुसार स्वीकारायचे आहे की, येशू हा देवाचा पुत्र, आपल्या तारणासाठी आला आहे या श्रद्धेच्या भावनेने आपल्याला त्याच्यामध्ये परिपूर्ण जीवन मिळवायचे आहे ?.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तूच स्वामी व माझा देव आहेस, मी तुला शरण आलो आहे, मजवर दया कर, आमेन

0 टिप्पण्या