सामान्य काळातील
बाविसावा सप्ताह
सोमवार
३० ऑगस्ट २०२१
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना
शुभवर्तमान लूक ४:१६-३०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने माझा अभिषेक केला आहे. "
ज्या नाझरेथ येथे येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्यांचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे:
“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.
परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. म्हणून त्याने मला पाठवले आहे, धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे.”
मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, “हा योसेफचा पुत्र ना ?" त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर, कफर्णहूमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, "मी तुम्हांला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, त्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याहीकडे एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्ट्यांच्या काळी इस्राएलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सुरियाचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेथपर्यंत नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेनाची प्रार्थना २०२१
हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील वापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा,त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो . पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आजा-यांना आरोग्य लाभावे,दुःखितांचे सांत्वन व्हावे,पाप्यांना क्षमा मिळावी,
आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर
(इथे आपनी विनंती सांगावी)
आम्हाकडे दया दृष्टीने पहा, आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दें. साधन बनावेततू धन्य कुमारी मरियेसाठी अदभूत कृत्ये केलेली आहेत शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी कॅलेग ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन.
हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर.
हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर.

0 टिप्पण्या