सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८०:२-३,१५-१६,१८-१९
प्रतिसाद : हे समर्थ देवा, आम्हाला पूर्वस्थितीवर आण.
१) इस्राएल राष्ट्रांच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे.
करूबासनावर विराजमान झालेल्या,
तुझे तेजस्वी दर्शन आम्हांला घडव.
हे देवा, तुझा पराक्रम गाजव आणि आमचा उद्धार कर.
२) सेनाधीश देवा, इकडे पुन्हा लक्ष दे,
स्वर्गातून नजर टाकून बघ,
या द्राक्षलतेची आपल्या उजव्या हाताने लावलेल्या रोपाची,
स्वत:साठी जोपासलेल्या शाखेची तू काळजी घे.
३) तुझा केवळ उजवा हात अशा तुझ्या प्रजेवर,
तू आपल्या सेवेसाठी समर्थ केलेल्या लोकांवर
तुझा वरदहस्त राहू दे.
पुन्हा काही आम्ही तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही.
आम्हांला नवजीवन दे, म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
दुसरे वाचन इब्री १०:५-१०
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"हे परमेश्वरा, पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे."
बंधूजनहो, येशू ख्रिस्त जगात येतेवेळेस म्हणाला, "यज्ञ आणि अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती. तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमानी आणि पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, “पहा, हे ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे. 'तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ आणि अन्नार्पण होम आणि पापांबद्दलची अर्पणे ह्यांची इच्छा तुला नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता" (ही नियमशास्त्राप्रमाणे अर्पिण्यात येतात) आणि मग तो म्हणाला, “पाहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे." ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो.
हा प्रभूचा शब्द आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
पहा, मी प्रभूची दासी आहे.
आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो.
शुभवर्तमान लूक १:३९-४४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून.'
मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावाला त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशबेला अभिवादन केले. अलिशबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने हालचाल केली व अलिशबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: परमेश्वराची इच्छा व त्याच्या योजना आणि मानवाने त्याला दिलेला प्रतिसाद ह्या घटकांनी तारणाचा संपूर्ण इतिहास घडलेला आहे. ईश्वराची इच्छा जाणून घेणे, त्या इच्छेप्रमाणे वागणे, आज्ञाधारकपणाचे फळ चाखणे, सतत |परमेश्वराच्या मार्गांनी चालणे यामुळे परमेश्वराची |आपल्यासाठी जी योजना आहे ती हळूहळू साकार होत जाते.
१) बेथलेहेमविषयीची योजना : खरे पाहता बेथलेहेम हे दाविदाचे जन्मस्थळ. परंतु कराराचा कोश दाविदाने ने मला आणल्यामुळे व कालांतराने तिथे भव्यदिव्य मंदिर उभारले गेल्यामुळे बेथलेहेम काही काळ इस्राएली लोकांच्या नजरेआड गेले. पुढे इसपू ७२५-७२१ दरम्यान असिरियाने जेव्हा इस्राएलची राजधानी शोमरोन उद्ध्वस्त केली आणि जेरूसलेमवर हल्ला करण्याची योजना आखली तेव्हा जेरूसलेमकरांनी असिरियाला बेथलेहेमवर हल्ला करण्याची सूचना केली. त्यामुळे घाबरलेल्या लोकांना धीर देण्यासाठी देवाने मीखा नावाचा संदेष्टा उद्यास आणला. त्याने केलेले भाकीत (पहिले वाचन) पुढे येशूच्या जन्माच्या वेळी पूर्ण झाले आणि परमेश्वराची योजना साकार झाली.
२) मरिये विषयीची योजना : शुभवर्तमानामध्ये आपल्याला दोन गर्भवती स्त्रियांची भेट होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. येशूचा अग्रदूत आपल्या मातेच्या उदरात आनंदाने उसळी मारून परमेश्वराची मरियेसाठी जी योजना ती सूचित करतो. अलिशिबादेखील 'स्त्रियांमध्ये तू धन्य' अशा शब्दात मरियेचा सन्मान करते. 'सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील' हे मरियावचन अलिशिबेपासून आत्तापर्यंत पूर्णत्वास जात आहे.
३) येशू विषयीची योजना : प्रभू येशू स्वतः परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागून त्याची योजना कशी ह्या पृथ्वीवर साकार करतो ते आपल्याला दुसऱ्या वाचनात ऐकायला मिळते. इब्री लोकांस पत्र हे नव्या कराराचे एकमेव पुस्तक येशूला याजक, प्रमुख याजक, याजक अशा शब्दांत गौरविते. सर्वश्रेष्ठ प्रमुख
आत्मपरीक्षण : परमेश्वराची अखिल मानवजातीसाठी जी योजना आहे ती मला समजलेली आहे का? माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी कोणती योजना आहे? ती पूर्ण करण्यासाठी मी काय काय करतो? त्यात, कोणकोणते अडथळे आहेत ?
प्रार्थना :- नमो कृपापूर्ण मरिये, ........ ही प्रार्थना भक्तिभावाने करावी.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या