Marathi Bible Reading | Tuesday 24th May 2022 | 6th Week of the Easter |

पुनरुत्थान ६ वा  सप्ताह 

मंगळवार २४ मे  २०२२

मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. 

सण ख्रिस्तीजनांच्या सहाय्या 

ख्रिस्त जणांचीआई पवित्र माता मारिया 

आम्हांसाठी विनंती कर  


 “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताने कैवारी पवित्र आत्मा पाठविण्यासाठी त्याचे पित्याकडे जाणे गरजेचे असल्याचे आपल्या शिष्यांना  सांगितले. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे व दानांमुळे शिष्यांना प्रेरणा व कृपा मिळणार होती. 
प्रभू येशूची सुवार्ता व साक्ष देणाऱ्या संत पौल व सिला ह्यास बंदिवासात शिक्षा भोगित असताना  फटक्यांचा मार खाऊन बंदिवासात असलेल्या त्या दोघांनी सुटकेसाठी प्रार्थना केली| नाही तर, देवाला धन्यवाद देऊन ते मोठ्याने स्तुतिगीते गाऊ लागले. सर्व स्थितीत देवाला धन्यवाद देणे त्यांनी उचित मानले. अत्यंत बिकट प्रसंगात त्यांनी देवाची स्तुति केली आणि देवाने आपले गौरव त्यांना प्रकट केले. 
संत पौलाने ह्यावेळी म्हटले, 'प्रभू येशूवर विश्वास ठेव  म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल'. देव आपले संकल्प, आपल्या योजना आणि इच्छा रहस्यमय रितीने पूर्णत्वास नेत असतो, हे आजच्या ह्या घटनेद्वारे स्पष्ट होत 

✝️   
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १६:२२-३४
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्याघराण्याचे तारण होईल.'

लोक पौल आणि सीला ह्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली आणि त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सोला हे प्रार्थना करीत असता आणि गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएको असा मोठा भूमिकंप झाला की, बंदिशाळेचे पाय डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले आणि सर्वांची बधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तरवार उपसून आपलाच घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, "तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्वजण येथेच आहो." मग दिवे मागवून तो आत धावत गेला. कापत कापत पौल आणि सीला ह्यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?" ते म्हणाले, "प्रभू येश्वर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल." त्यांनी त्याला आणि त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेला त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा साफ केल्या आणि तेव्हाच त्याने आणि त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. मग बंदिशाळेच्या नायकाने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने आणि त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १३८:१-३,७-८
प्रतिसाद :प्रभो, तुझा हात पुढे कर आणि मला वाचव.

१) मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन,
तू माझा धावा ऐकला आहेस.दूतांसमोर तुझी स्तोत्रे गाईन 
तुझ्या पवित्र मंदिरात मी तुझी उपासना करीन.

२) तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे 
मी तुझ्या नामाचे उपकारस्मरण करीन, 
कारण तू आपल्या संपूर्ण नामाहून 
आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. 
मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला,
 तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या आत्म्याला
 सामर्थ्य प्राप्त झाले.

३)  तुझा हात पुढे कर आणि मला वाचव,
 परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नेईल. 
हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे,
 तू आपल्या हातचे काम मध्येच सोडू नको.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !

प्रभू जो क्रुसावर आमच्याकरिता टांगलेला होता 
तो थडग्यातून उठलेला आहे.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १६:५-११
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारत नाही. ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हांला खरे ते सांगतो: मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ह्यावरून पापाविषयी, मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्त्वाविषयी आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करीन."

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन : आजच्या शुभवर्तमानात, येशू त्याच्या शिष्यांना सांगतो की, “मी जावे हे तुमच्या हिताचे आहे", म्हणजे ज्या पवित्र आत्म्याने ख्रिस्ताला प्रेरणा दिली व मार्गदर्शन केले त्याद्वारे शिष्यांनाही त्याच्या मार्गदर्शनासाठी त्याची मदत होईल. हाच पवित्र आत्मा ह्या जगातील उणिवा आपल्याला दाखवील आणि देवाबरोबर व इतरांबरोबर आमचे नातेसंबंध मजबूत बनवील आणि फक्त प्रेमाच्या मूल्याद्वारेच आपणा सर्वांचा न्याय होईल हे आपल्याला पटवून देईल. आपल्याला स्वतःच्या बळावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आपले पाचारण हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्या जीवनात अधिक चांगले रुपांतर करण्यासाठी आहे, जेणेकरून आपले जीवन पवित्र आत्म्याद्वारे घडविले जाईल. आणि म्हणूनच प्रभू येशू आपल्यामधून स्वर्गात जातोय हे आपल्या फायद्यासाठीच आहे. माझ्या जीवनात पवित्र आत्मा मला कसे मार्गदर्शन करतो ? ह्या जगात कोणत्या कमतरता आहेत ज्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जी पूर्ण करू शकते / शकतो? पवित्र आत्म्याची देणगी मला मिळावी अशी माझी खरोखरच इच्छा आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्ही तुझी स्तुति करण्यास व धन्यवाद देण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या