सामान्यकाळातील १८ वा सप्ताह
मंगळवार २ ऑगस्ट २०२२
“प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.”
Born in La Mure d'Isere in southeastern France, Peter Julian's faith journey drew him from being a priest in the Diocese of Grenoble (1834) to joining the Marists (1839) to founding the Congregation of the Blessed Sacrament (1856). In addition to those changes, Peter Julian coped with poverty, his father's initial opposition to Peter's vocation, serious illness, a Jansenistic striving for inner perfection and the difficulties of getting diocesan and later papal approval for his new religious community.
यिर्मयाच्या आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर इस्त्राएली जनतेला सर्व संकटातून वाचवेल व त्यांचे रक्षण करील असे आश्वासन दिले आहे. विशेषतः परमेश्वर म्हणतो, 'तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.'
संत पेत्रासारखा आपला विश्वास तोकडा पडतो तसा आपण सुद्धा जगातील अरिष्टाला घाबरतो. प्रभू येशू शब्द रुपाने आपल्यामध्ये हजर असतो. प्रभू येशू अतिपवित्र ख्रिस्तशरीर संस्कारामध्ये हजर असतो. प्रभू येशूचे अस्तित्व आपल्या सर्व कृपा संस्कारामध्ये असते.
प्रभू येशूचे अस्तित्व आपण जाणावे, ओळखावे आणि अनुभवावे म्हणून प्रार्थना करु या. सर्व प्रसंगी अडचणीत असताना त्याचा धावा करु या.
✝️
पहिले वाचन : यिर्मया ३०:१-२, १२-१५.१८-२२
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पापे फार झाली आहेत, म्हणून मी तुला हे सर्व केले आहे. मी याकोबच्या डेऱ्यांचा बंदिवास उलटवीन."
परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले : परमेश्वरइस्राएलचा देव असे म्हणतो की. जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव.
कारण परमेश्वर म्हणतो : “तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे. तुझी दाद लावणारा कोणी नाही. तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही. तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे, तुझी पापे फार झाल्यामुळे, तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे. तू आपल्या घायामुळे का ओरडतेस ? तुझी जखम असाध्य आहे. तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पापे फार झाली आहेत, म्हणून मी तुला हे सर्व केले आहे."
परमेश्वर म्हणतो, “मी याकोबच्या डेऱ्यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वस्तीस्थानावर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल. त्यांमधून उपकारस्मरणाचा आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा शब्द उठेल. मी त्यांची संख्या वाढवीन, ती अल्प होणार नाही; मी त्यांचा गौरव करीन, म्हणजे ते क्षुद्र असावयाचे नाहीत. त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील; त्यांच्यावर जुलूम करणाऱ्यांना मी शासन करीन. त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल; मी त्याला जवळ आणीन म्हणजे तो माझ्या सन्निध येईल, कारण माझ्या सन्निध येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईन."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १०२:१६-२३
प्रतिसाद : परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे.
१) राष्ट्रे परमेश्वराच्या नामाला
आणि पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या
ऐश्वर्याला भितील; कारण परमेश्वराने
सियोन पुन्हा बांधले आहे,
तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे.
त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे
त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.
२) पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल,
पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करील;
कारण परमेश्वराने आपल्या उच्च
पवित्रस्थानावरून पृथ्वीकडे पाहून
बंदिवानांचे उसासे ऐकले
ज्याचे मरण ठेवले होते त्यांना सोडवले.
३) तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील,
त्यांची संतती तुझ्यासमोर स्थानिक होईल.
ह्यासाठी की त्यांनी सियोनात परमेश्वराच्या
नामाची घोषणा करावी आणि
येरुशलेममध्ये त्याची स्तुती गावी;
परमेश्वराची उपासना करायला लोक
आणि राज्ये एकत्र होतील तेव्हा असे होईल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
माझ्या देवा, तुझे मार्ग मला दाखव;
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १४ : २२-३६
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा."
“मी लोकसमुदायांना निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा." असे सांगून येशूने लागलेच शिष्यांना लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकान्ती गेला आणि रात्रभर तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”
तेव्हा पेत्रने उत्तर दिले, “प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला; परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” मग ते तू तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहा."
नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेतच्या भागात गेले आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या सर्व प्रातांत माणसे पाठवून सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हांला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली; तेव्हा जितक्यांनी त्याला विनंती केली; आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : ख्रिस्ती जीवनात प्रार्थनेला अग्रस्थान असावे. रात्रीच्या प्रहरी समुद्रावरुन चालत येणाऱ्या प्रभू येशूला पाहून शिष्य घाबरले, परंतु प्रभूने त्यांना म्हटले, 'धीर धरा, मी आहे, भिऊ नका.' प्रभू येशूचे आपल्या जीवनातील अस्तित्व आपण सतत अनुभवावे. आपल्या सर्व बिकट प्रसंगी प्रभू येशू आपल्याबरोबर आहे संत पेत्रासारखा आपला विश्वास मात्र तोकडा पडतो व आपण जगातील अरिष्टाला घाबरतो. मग जीवनातील भवसागरात बुडू लागतो कारण आमचे लक्ष कृष्ठावर नसते तर जगातील प्रलोभनावर लक्ष असते .चालातर प्रभूच्या पावलात लक्ष लावूया
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास व सर्वस्वी 'तुजवर अवलंबून राहण्यास कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या