आगमनकाळातील तिसरा सप्ताह
शुक्रवार १६ डिसेंबर २०२२
शुभवर्तमान योहान ५:३३-३६
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"योहान जळता आणि प्रकाश देणारा दिवा होता."
येशूने यहुद्यांना विचारले "तुम्ही योहानकडे माणसे पाठवून विचारले आणि त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. पण मी माणसांची साक्ष मान्य करीत नाही; तथापि तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. तो जळता आणि प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला; परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
✝️

0 टिप्पण्या