Marathi Bible Reading | Thursday 15th December 2022 | 3rd week of Advent

आगमनकाळातील तिसरा  सप्ताह   

गुरुवार १५ डिसेंबर  २०२२

स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानपेक्षा मोठा कोणी नाही; 
✝️


St. Mary di Rosa

FOUNDRESS

Born: November 6, 1813, Brescia, Italy
Died: 1855, Brescia, Italy
Canonized: 12 June 1954 by Pope Pius XII
Foundress of the Handmaids of Charity of Brescia, also called the Servants of Charity. Born into a wealthy family in Brescia, Italy, on November 6, 1813, by age seventeen she was running her father's household and caring for the girls in her father's mill and estate. In the cholera epidemic of 1836, she became well-known as she directed a home for girls and begame another residence for deaf and mute young ladies. In 1840, she became superior of a community that evolved into her congregation. The women of the Servants of Charity ministered to the wounded on the battlefields of northern Italy and in hospitals. Maria died at Brescia on December 15. She was canonized in 1954.


 ✝️
पहिले वाचन यशया ५४: १-१०
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे."

"मूल न झालेल्या वंध्ये, आनंदाने गजर कर. ज्या तुला प्रसूतिवेदना माहीत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर.. आनंदाची आरोळी मार. कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा टाकलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो. आपल्या डेऱ्याची जागा वाढव. आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे. अटकाव करू नको. आपल्या दोऱ्या लांब कर. मेखा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे आणि डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील आणि उजाड झालेली नगरे वसतील."
“भिऊ नको. तू लज्जित होणार नाहीस. घाबरू नको. तू फजीत होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण यापुढे होणार नाही. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव. इस्राएलचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. टाकलेल्या आणि दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले, पण मी तुझ्यावर दया करून. तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन." असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.
"नोहाकालीन जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखतो. नोहाकालीन जलप्रलय भूमीवर पुनरपि येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती, त्याप्रमाणे तुझ्यावर कोप करणार नाही, तुला दटवणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे. कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. माझा शांतीचा करार हालणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३०: २,४-६,११-१३
प्रतिसाद :  प्रभो, मी तुझा महिमा गातो. 

१) हे प्रभो मी तुझा महिमा गातो.
कारण तू मला वाचवले आहेस, 
अशा रीतीने माझ्या शत्रूंना तू आनंद होऊ दिला नाहीस. 
हे प्रभो, तू अधोलोकातून मला वर आणलेस, 
मी गर्तेत पडू नये म्हणून तू मला जिवंत ठेवलेस.

२) अहो प्रभूचे भक्त हो, त्याचे स्तवन करा. 
त्याच्या पावित्र्याचे स्मरण करून धन्यवाद द्या. 
त्याचा कोप केवळ क्षणभर, 
सायंकाळी दुःखाश्रू करतात घर
पण सकाळी होतो आनंदाचा गजर.

३) माझे ऐक, हे प्रभो, दया कर 
प्रभो, माझा साहाय्यकर्ता हो.
 तू माझ्या शोकाचे रूपांतर करून,
मला आनंदाने उड्या मारायला लावले आहेस.
 हे प्रभो, माझ्या देवा,
मी सदैव तुला धन्यवाद देईन.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे. पाहा, 
तो आमचे तारण करायला येत आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक   २१:२४-३०

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"योहान हा प्रभूचा मार्ग तयार करणारा दूत आहे."

योहानचे निरोप्ये गेल्यावर येशू योहानविषयी लोकसमुदायाला म्हणू लागला, "तुम्ही काय पाहायला रानात गेला होता ? वाऱ्याने हालविलेला बोरू काय ? तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय ? पहा, उंची पोषाख करणारे आणि चैन करणारे राजवाड्यात असतात. तर मग तुम्ही काय पाहायला गेला होता ? संदेष्ट्याला काय ? मी तुम्हांला सांगतो, हो, संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. पहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापढे तुझा मार्ग सिद्ध करील. असे ज्याच्याविषयी लिहिलेआहे तो तोच आहे. मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानपेक्षा मोठा कोणी नाही; तरी देवाच्या राज्यात जो कनिष्ट तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” आणि जकातदारांसह सर्व लोकांनी हे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानचा बाप्तिस्मा घेतला होता. परंतु परुशी आणि शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : पवित्र शास्त्र परमेश्वराला यहुदी लोकांचा वर आणि यहुदी लोक त्याची वधू अशी उपमा देतो (होशेय २:६-७). आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा त्या उपमेला दुजोरा देतो (५४:५). दुर्दैवाने इस्रायलची प्रजा परमेश्वराशी एकनिष्ठ न राहता तिने परराष्ट्रीयांच्या देवाची आराधना केली. म्हणून त्यांना शासन झाले. यशया स्थलांतर झालेल्या इसरायच्या लोकांना सांगतो की, त्याचे शासन संपुष्टात येईल आणि पुन्हा एकदा परमेश्वर एकत्र आणून त्यांच्यावर प्रीती करणार. ज्याअर्थी परमेश्वराने इस्रायलच्या प्रजेवर अतीव प्रीती आणिदया दाखवली त्या अर्थी तो आपल्या प्रत्येकावर | तशीच प्रीती करतो याची ओळख आपल्याला शुभवर्तमानात कळून चुकते कारण त्याचा परमपुत्र येशू रोग्यांना निरोगी आणि एकत्र जमवून देवराज्याची अनुभूती देत आहे. (लूक ७:२२). या आगमन काळात परमेश्वराकडे वळून त्याच्या प्रीतीचा आणि दयेचा अनुभव घेण्यासाठी देऊळ माता आपणांस आमंत्रण करत आहे.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, आमच्या जीवनातील सर्व प्रसंगी जागृत राहून अंती तुला भेटण्यास आम्ही उत्सुक असावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या