सामान्यकाळातील चौथा सप्ताह
बुधवार दि.१ फेब्रुवारी २०२३
“संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो."
प्रतिसाद : परमेश्वराची दया त्याचे भय करणाऱ्यांवर युगानुयुगे असते.
१) हे माझ्या जिवा, परमेश्वराला धन्यवाद दे,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे.
हे माझ्या जिवा, परमेश्वराला धन्यवाद दे,
त्याचे सर्व उपकार विसरू नको.
२) जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो.
तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो;
तो आमची प्रकृती जाणतो,
आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो.
३ ) परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर
युगानुयुगे असते
आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव
जे त्याचा करार पाळतात
त्या पुत्रपौत्रांना घडतो.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका.
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या गावी आला. त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले ? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात! जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा आणि शिमोन ह्यांचा जो भाऊ तो हाच आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?" असे ते त्याच्याविषयी दबकत बोलू लागले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो." थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे येशूला आश्चर्य वाटले.
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
✝️

0 टिप्पण्या