Marathi Bible Reading | 12th week in ordinary Time | Tuesday 27th June 2023

 सामान्यकाळातील १वा सप्ताह 

मंगळवार २७ जुन २०२३ 

“अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे  
✝️


आलेक्झांड्रीयाचे  संत सिरील
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३७०-४४४)
आपल्या सहवासात असणाऱ्या व संबंध असलेल्या माणसांबरोबर  आपण समंजसपणे, प्रेमळपणे व सहकार वृत्तीने वागावे यासाठी प्रभू येशू आजच्या शुभर्वतमानात एक सुवर्ण नियम आपल्याला देत आहे. प्रभू म्हणतो, “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही  त्यांच्याशी वागा'. परस्पर संबंध दृढकरण्याचा आणि सर्वांबरोबर संबंध मजबूत  करण्याचा हा सोपा नियम आहे. आपल्याबरोबर सर्वांनी प्रेमळपणे, सहकार्याने व शांतीने बोलावे व वागावे अशी आपली इच्छा असते. मात्र आपण सर्वांबरोबर तसे वागतो का, ह्यावर चिंतन करण्यासाठी प्रभू येशू आपल्याला आज बोलावीत  आहे. आपणच आपली भाषा, आपली वर्तणूक तपासून पाहू या, नंतर आपण इतरांकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा बाळगली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने घालून  दिलेला सुखी जीवनाचा हा सुवर्ण नियम आपण अमलात आणू या.
✝️                    

पहिले वाचन :   उत्पत्ती १३:२,५-१८
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"तुझ्या-माझ्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो."

अब्राम कळप, रुपे आणि सोने ह्यांनी संपन्न होता. अब्रामबरोबर लोट जात होता. त्याचीही मेंढरे, गुरेढोरे आणि पाले होती. त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एका स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामच्या आणि लोटच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी आणि परिज्जी यांची वस्ती होती.
अब्राम लोटला म्हणाला, “हे पाहा, तुझ्या-माझ्यामध्ये आणि माझे गुराखी आणि तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन; तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.” तेव्हा लोटने आपली दृष्टी फेकून यार्देनचे सर्व खोरे पाहिले तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम आणि गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि इजिप्त देशासारखा होता. ही यार्देनची सर्व तळवट लोटने आपणासाठी पसंत केली आणि तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला आणि लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमपाशी दिला. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापापे करणारे होते. लोट अब्रामपासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दृष्टी लावून पाहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला आणि तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या धुळीकणांसारखी करीन, कोणाला पृथ्वीवरील धुळीच्या कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीची ही गणना होईल. ऊठ, या देशाची लांबीरुदी फिरून पाहा, कारण तो मी तुला देणार." मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोनजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला, तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


First Reading : Genesis 13:2, 5-18

Abram was very rich in livestock, in silver, and in gold. And Lot, who went with Abram, also had flocks and herds and tents, so that the land could not support both of them dwelling together; for their possessions were so great that they could not dwell together, and there was strife between the herdsmen of Abram's livestock and the herdsmen of Lot's livestock. At that time the Canaanites and the Perizzites were dwelling in the land. Then Abram said to Lot, "Let there be no strife between you and me, and between your herdsmen and my herdsmen, for we are kinsmen. Is not the whole land before you? Separate yourself from me. If you take the left hand, then I will go to the right, or if you take the right hand, then I will go to the left." And Lot lifted up his eyes and saw that the Jordan Valley was well watered everywhere like the garden of the Lord, like the land of Egypt, in the direction of Zoar. (This was before the Lord destroyed Sodom and Gomorrah.) So Lot chose for himself all the Jordan Valley, and Lot journeyed east. Thus they separated from each other. Abram settled in the land of Canaan, while Lot settled among the cities of the valley and moved his tent as far as Sodom. Now the men of Sodom were wicked, great sinners against the Lord. The Lord said to Abram, after Lot had separated from him, "Lift up your eyes and look from the place where you are, northwards and southwards and eastwards and westwards, for all the land that you see I will give to you and to your offspring for ever. I will make your offspring as the dust of the earth, so that if one can count the dust of the earth, your offspring also can be counted. Arise, walk through the length and the breadth of the land, for I will give it to you." So Abram moved his tent and came and settled by the oaks of Mamre, which are at Hebron, and there he built an altar to the Lord.

This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र १५ :२-५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील ? 

१) हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण वस्ती करील?
जो सात्त्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो, 
जो मनापासून सत्य बोलतो तो, 
जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो.

२) तो आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, 
तो आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही,
तो अधर्माला तुच्छ लेखतो,
तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो.

३) तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे 
अहित झाले तरी ती मोडीत नाही,
 तो आपला पैसा व्याजी लावत नाही,
 तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही,
जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.

Psalm 15:2-3a, 3bc-4ab, 5

R.  O Lord, who may abide in your tent?

Whoever walks without fault; 
who does what is just, and 
speaks the truth from his heart. 
Whoever does not slander with his tongue. R

Who does no wrong to a neighbour,
 who casts no slur on a friend, 
who looks with scorn on the wicked, 
but honours those who fear the Lord. R 

Who lends no money at interest, 
and accepts no bribes against the innocent.
Such a one shall never be shaken. R

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. 
आलेलुया!
Acclamation: 
I am the light of the world, says the Lord; 
Whoever follows me will have the light of life.

शुभवर्तमान मत्तय ७:६,१२-१४
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“लोकांनी जसे तुमच्यापाशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर डुकरे ती मोत्ये कदाचित आपल्या पायांखाली तुडवतील आणि उलटून तुम्हांला फाडतील."लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्याच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत. “अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो असे ते थोडके आहेत.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 7:6, 12-14

At that time: Jesus said to his disciples, "Do not give dogs what is holy, and do not throw your pearls before pigs, lest they trample them underfoot and turn to attack you. So whatever you wish that others would do to you, do also to them, for this is the Law and the Prophets. "Enter by the narrow gate. For the gate is wide and the way is easy that leads to destruction, and those who enter by it are many. For the gate is narrow and the way is hard that leads to life, and those who find it are few.

चिंतन: आपण या ऐहिक जगातील सुखसोयी निवडतो कि जीवनातील क्रुस निवडतो ? पूर्वीचा मार्ग हा नाशाचा होता परंतू नंतरचा हा जीवनाकडे जाणारा अरुंद दरवाजा होता. लोटने सुखसोयीचा मार्ग निवडला. आब्राहामचा मार्ग अरूंद दरवाजाने देवाला प्रिय असा मार्ग निवडतो. या निवडीच्या मार्गात आब्राहामाला पृथ्वीच्या धुळीइतकी संतती मिळेल हेबक्षिस मिळाले. कुसाचा मार्ग हा तारणाचा सर्वात पक्का मार्ग आहे. कारण त्यावर जगाचा तारणारा टांगलेला आहे. म्हणून आपण ख्रिस्ताच्या वधस्तभाला आलिंगन देण्याचा निर्णय घेऊया. जर आपल्याला कोणत्याही अडचणी किंवा नैराश्याच्या, दुःखाच्या दरीतून जात असाल तर आब्राहामाप्रमाणे सतत चालत राहा. आपला तंबू हलवा आणि एक वेदि बांधा, तुम्ही जे काही सहन करत आहात ते सर्व त्याला अर्पण करा आणि फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. आब्राहामाप्रमाणे विश्वासाने प्रवास करा. तुमचा कधीही नाश होणार नाही. कारण त्याने आमच्यासाठी प्रथम प्रेमाने वधस्तंभ उचलला आहे. 

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या नियमानुसार व आज्ञेनुसार जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या