Marathi Bible Reading | 18th Sunday in Ordinary Time |6th August 2023

 सामान्यकाळातील १८वा सप्ताह 

रविवार ६  ऑगस्ट २०२३



प्रभू येशूचे रुपांतर

"हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याचे तुम्ही ऐका.

आपल्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थान घटनेच्या जवळजवळ एक वर्ष आधी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या तीन लाडक्या शिष्यांना पेत्र, याकोब व योहान ह्यांना-कैसेरिया फिलिप्पीयाजवळ असलेल्या डोंगरावर नेले. ऑरिजेन या धर्मगुरूंच्या काळातील एका परंपरेनुसार (इ. स. २५४) हा पर्वत गालिलीतील ताबोर पर्वत असल्याचे मानले जाते. तिबिर्याच्या समुद्र सपाटीपासून या डोंगराची उंची २,००० फूट इतकी आहे.
या डोंगरावर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आपले वैभव प्रकट केले. त्याचे मूख सूर्यासारखे तेजस्वी झाले. त्याची वस्त्रे बर्फासारखी शुभ्र व चकचकीत झाली. मोशे आणि एलिया त्याच्या बाजूला उभे असलेले शिष्यांच्या दृष्टीस पडले (मोशे हे नियमशास्त्राचे तर एलिया हे संदेष्ट्यांचे प्रतीक मानले गेले आहे) आकाशातून वाणी झाली की, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
दुःखसहनाच्या काळात आपल्या शिष्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून प्रभूने आपल्या वैभवाचे दर्शन त्यांना ह्या रूपांतराच्या रूपाने घडविले.
पुढे निसर्ग देवतेची पूजा करणाऱ्या अख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर येशूचे रूपांतर हा सोहळा चौथ्या व पाचव्या शतकात उदयास आला. मात्र पोप कॅलिस्टस तिसरे ह्यांनी बेलग्रेड येथे हुनियादी जानोस ह्याने तुर्कांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ १४५६ साली हा सोहळा संपूर्ण जगभर साजरा केला जावा असा आदेश काढला. स्वत: पोप महाशयांनी या सोहळ्यानिमित्ते तयार केलेली प्रातः प्रार्थना व सायंप्रार्थना धर्मगुरूंच्या (ब्रिव्हरी) प्रार्थना पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.
ह्याच दिवशी रोममध्ये संत जॉन लॅटरन महामंदिराचा सणसुद्धा साजरा केला जातो.

चिंतन : “आपण इथे असावे हे बरे आहे” असे संत पीटर प्रभूला म्हणाला. येशूच्या बरोबर असणे आणि सर्वदा त्याच्या सहवासात राहणे खरोखर किती चांगले आहे. परमेश्वराच्या सहवासात राहणे, त्याच्या समान होत जाणे आणि त्याच्या दिव्य तेजात न्हाऊन निघणे ह्यापेक्षा आपला सन्मान तो काय? -सिनाईचे बिशप अनास्थासियुस
✝️             

पहिले वाचन :दानीएल ७:९-१०,१३-१४
वाचक :दानीएलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता.'

मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायसभा भरली, पुस्तके उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले इतक्यात पाहा, आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Daniel 7:9-10, 13-14

As I looked, thrones were placed, and the Ancient of Days took his seat; his clothing was white as snow, and the hair of his head like pure wool; his throne was fiery flames; its wheels were burning fire A stream of fire issued and came out from before him; a thousand thousands served him, and ten thousand times ten thousand stood before him; the court sat in judgment, and the books were opened. I saw in the night visions, and behold, with the clouds of heaven there came one like a son of man, and he came to the Ancient of Days and was presented before him. And to him was given dominion and glory and a kingdom, that all peoples, nations, and languages should serve him; his dominion is an everlasting dominion, which shall not pass away, and his kingdom one that shall not be destroyed.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ९७:१-२,५-६,९

प्रतिसाद :  परमेश्वर राज्य करतो, तो साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहे.

१)परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी उल्हास करो, 
द्विपसमूह हर्ष करो.
ढग आणि अंधार त्याच्याभोवती आहेत, 
नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.

२ )परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर 
पर्वत मेणाप्रमाणे वितळले. 
आकाश त्याची न्यायपरायणता जाहीर करते, 
सारी मानवजात त्याचे ऐश्वर्य पाहते.


Psalm  97:1-2, 5-6, 9

The Lord is king, most high above all the earth.

The Lord is king, let earth rejoice; 
let the many islands be glad. 
Cloud and darkness surround him;
justice and right are the foundation of his throne. R

The mountains melt like wax 
before the face of the Lord,
before the face of the Lord of all the earth.
The skies proclaim his justice; 
all peoples see his glory. R

For you indeed are the Lord, 
most high above all the earth,
 exalted far above all gods. R


दुसरे वाचन  २ पेत्र १: १६-१९
 वाचक : संत पेत्राने पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन 

"आकाशातून आलेली ही वाणी आम्ही ऐकली.'

चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही, तर त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान आणि गौरव मिळाला, तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टयाचे वचन आम्हाजवळ आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंत:करणात दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.

हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading  :2 Peter 1:16-19

Beloved: We did not follow cleverly devised myths when we made known to you the power and coming of our Lord Jesus Christ, but we were eyewitnesses of his majesty. For when he received honour and glory from God the Father, and the voice was borne to him by the Majestic Glory, "This is my beloved Son, with whom I am well pleased", we ourselves heard this very voice borne from heaven, for we were with him on the holy mountain. And we have the prophetic word more fully confirmed, to which you will do well to pay attention as to a lamp shining in a dark place, until the day dawns and the morning star rises in your hearts.
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, 
ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका.
  आलेलुया!

Acclamation: 
This is my beloved Son, 
with whom I am well pleased;
 listen to him.

शुभवर्तमान  मार्क  ९:२-१०
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"हा माझा प्रिय पुत्र आहे.'

येशूने पेत्र, याकोब आणि योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच पर्वतावर एकीकडे नेले आणि तेथे त्यांच्यादेखतत्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चकचकीत आणि इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नव्हते. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला, ते येशूबरोबर संभाषण करत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. तर आम्ही तीन मंडप उभारू आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक ' काय बोलावे हे त्याला सुचले नाही, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.” मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले पण येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही.

नंतर ते पर्वतावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतावस्थेतून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका." हे बोलणे मनात ठेवून मृतावस्थेतून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 17:1b-9

At that time: Jesus took with him Peter and James, and John his brother, and led them up a high mountain by themselves. And he was transfigured before them, and his face shone like the sun, and his clothes became white as light. And behold, there appeared to them Moses and Elijah, talking with him. And Peter said to Jesus, "Lord, it is good that we are here. If you wish, will make three tents here, One for you and one for Moses and one for Elijah." He was still speaking when, behold, a bright cloud overshadowed them, and a voice from the cloud said, "This is my beloved Son, with whom I am well pleased; listen to him." When the disciples heard this, they fell ontheir face and were terrified. But Jesus came and touched them, saying, "Rise, and have no fear." And when they lifted up their eyes, they saw no one but Jesus only. And as they were coming down the mountain, Jesus commanded them, "Tell no one the vision, until the Son of Man is raised from the dead."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  आज आपण येशूचे रूपांतरण व संत जॉन मारी वियाणीचा सण साजरा करीत आहोत. रूपांतरणाचा सण फक्त येशूच्या ओझरत्या दर्शनाविषयी सांगत नाही तर पुनरागमनाची म्हणजे येशूच्या येण्याची आठवण करत आहे. येशूचे रूपांतर हे एक पुराणकथा किंवा दंतकथा नव्हती तर तो सत्य सृष्टीतला खरा प्रसंग आहे. ख्रिस्ताच्या उज्वल प्रतिष्ठेच्या दर्शनाचा साक्षात्कार शिष्यांना झाला. हे एक दैवी रहस्य आहे. वैभवशाली देवाचा पुत्र दुःख सहन करून क्रुसावर मरणार. जो देव असून स्वतः मनुष्य झाला. येशूचे रुपांतर म्हणजे जीवनात काहीतरी परिवर्तन घडवून आणणे. येशू स्वतः शिष्यांना त्याचा अनुभव देतो. त्याच्या दुःख, मरण व पुनरुत्त्थनापूर्वी येशूच्या रुपांतरणाचा अनुभव शिष्यांना येतो. आपणा सर्वांना जर येशूच्या रुपांतरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण त्याची आज्ञा पाळली पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण विश्वासाने व चांगल्या कामाने देवाला आरश्यामध्ये पाहातो तेव्हा आपल्या जीवनात आपण ख्रिस्ताला पाहातो व आपणाला स्व रुपांतरणाचा अनुभव येतो. जॉन मारी वियानीच्या जीवनात अनेक अडचणी आल्या होत्या परंतु त्याची येशू ख्रिस्तावरील असलेले अढळ श्रद्धा व विश्वास कधी कमी झाला नाही. प्रभू येशू आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी स्वर्गीयभाकर देत असतो. त्यासाठी मात्र आपल्याला आध्यात्मिक भूक लागणे आवश्यक आहे.
आत्मपरीक्षण : मानवी जीवनाचे सार्थक कशामध्ये दडलेले आहे असे आपल्याला वाटते ? परमेश्वराचा अनुभव घेणे, त्याची इच्छा जाणून घेणे आणि आध्यात्मिक भूक भागविणे ह्या गोष्टींना आपल्या जीवनात कोणते स्थान आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व तुझ्या वैभवात सहभागी होण्यास पात्र बनण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या