Marathi Bible Reading | 18th week in ordinary Time | Wednesday 9th August 2023

 सामान्यकाळातील १८वा सप्ताह 

बुधवार ९ ऑगस्ट २०२३

 “बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ होवो" 


पवित्र क्रुसाच्या भक्त संत तेरेसा बेनेडिक्टा 

रक्तसाक्षी

व 

नॉर्थुम्ब्रियाचे संत ऑझ्वल्ड

रक्तसाक्षी ( -६४२)

अपमान सहन करुन देवाला शरण ! जाणाऱ्या व्यक्तिची श्रद्धा हिमालयासारखी मजबूत बनत असते. सहनशीलता संयम, एकनिष्ठा आणि शरणागती ह्यामुळे कनानी बाईला देवाचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त झाली.
श्रद्धापूर्ण अंत:करणाने देवाला शरण गेल्यावर देव आपल्या जीवनात  परिवर्तन घडवतो व चमत्कारही करतो. प्रभू येशू दयेचा व करुणेचा महासागर आहे. आज आपण आपली सहनशीलता, एकनिष्ठता आणि प्रभूवरील श्रद्धा| तपासून पाहूया. प्रभूच्या कसोटीत आपण उत्तीर्ण होऊ शकतो का ?

✝️             

पहिले वाचन : गणना १३:१,२,२५-१४:१,२६-२९,३४-३५

वाचक :गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"त्यांनी सुपीक जागेला नकार दिला."

परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी इस्राएल लोकांना कनान देश देत आहे, ते हेरण्यासाठी माणसे पाठव. तो देश हेरून ते चाळीस दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन आणि इस्राएलची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली. ते मोशेला म्हणाले की, “ज्या देशात तू आम्हांला पाठवले त्या देशात आम्ही गेलो; त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह आहेत. तेथली ही फळे पाहा. त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात; डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबूसी आणि अमोरी हे राहतात आणि समुद्रकिनाऱ्यावर आणि यार्देनतीरी कनानी लोकांची वस्ती आहे." तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, “आपण त्या देशावर आताच्या आता हिमत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ; कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहो." पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत." त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्राएल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली; ते म्हणाले, " जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे; तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफेलीम (म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज) आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो.
तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि ती रात्रभर रडली. परमेश्वर मोशे आणि अहरोन ह्यांना म्हणाला, “ही दुष्ट मंडळी कोठवर माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार ? हे जे इस्राएल लोक माझ्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत, त्यांची कुरकुर माझ्या कानावर आली. म्हणून तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो : “माझी शपथ, तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन; तुमची प्रेते ह्या रानात पडतील आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकुर केली आहे त्यापैकी कोणीही देश हेरावयाला जे चाळीस दिवस लागले त्यातील प्रत्येक दिवसाप्रमाणे एक वर्ष ह्या हिशेबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार वाहाल आणि माझा विरोध तुम्हाला भोवेल.” मी परमेश्वर हे बोललो आहे. ही जी सर्व दुष्ट मंडळी माझ्याविरुद्ध जमली आहे तिचे मी असे खरोखर करीन. त्यांचा ह्या रानात विध्वंस होईल; ते तेथे मरून जातील.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Numbers 13:1-2, 25-14:1, 26-29, 34-35

 In those days: The Lord spoke to Moses,in the wilderness of Paran,
saying, "Send men to spy out the land of Canaan, which I am giving to the people of Israel. From each tribe of their fathers you shall send a man, every one a chief among them." At the end of forty days they returned from spying out the land. And they came to Moses and Aaron and to all the congregation of the people of Israel in the wilderness of Paran, at Kadesh. They brought back word to them and to all the congregation, and showed them the fruit of the land. And they told him, "We came to the land to which you sent us. It flows with milk and honey, and this is its fruit. However, the people who dwell in the land are strong, and the cities are fortified and very large. And besides, we saw the descendants of Anak there. The Amalekites dwell in the land of the Negeb. The Hittites, the Jebusites, and the Amorites dwell in the hill country. And the Canaanites dwell by the sea, and along the Jordan." But Caleb quietened the people before Moses and said, "Let us go up at once and occupy it, for we are well able to overcome it." Then the men who had gone up with him said, "We are not able to go up against the people, for they are stronger than we are." So they brought to the people of Israel a bad report of the land that they had spied out, saying, "The land, through which we have gone to spy it out, is a land that devours its inhabitants, and all the people that we saw in it are of great height. And there we saw the Nephilim (the sons of Anak, who come from the Nephilim), and we seemed to ourselves like grasshoppers, and so we seemed to them." Then all the congregation raised a loud cry, and the people wept that night. And the Lord spoke to Moses and to Aaron, saying, "How long shall this wicked congregation grumble against me? have heard the grumblings of the people of Israel, which they grumble against me. Say to them, 'As live, declares the Lord, what you have said in my hearing will do to you: your dead bodies shall fall in this wilderness, and of all your number, listed in the census from twenty years old and upwards, who have grumbled against me. According to the number of the days in which you spied out the land, forty days, a year for each day, you shall bear your iniquity for forty years, and you shall know my displeasure. I, the Lord, have spoken. Surely this will I do to all this wicked congregation who are gathered together against me: in this wilderness they shall come to a full end, and there they shall die."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १०६:६-७,१३-१४,२१-२३

प्रतिसाद :  हे परमेश्वरा, माझी आठवण कर.

१) आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे; 
आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे. 
आमच्या पूर्वजांनी इजिप्त देशात असताना
 तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही.

२) तरी ते त्यांची कृत्ये लवकरच विसरले; 
त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही. 
रानात त्यांची वासना अनावर झाली, 
ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली.

३) ते आपल्या उद्धारक देवाला विसरले; 
त्याने इजिप्त देशात महत्कृत्ये, 
हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, 
तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती.

४) तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; 
पण त्याचा क्रोध शांत करावा आणि 
त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा
 निवडलेला मोशे त्याला आडवा आला.


 Psalm   106:6-7ab, 13-14, 21-22, 23
O Lord, remember us with the favour you show to your people. Like our fathers, we have sinned. 
We have done wrong; our deeds have been evil.

Our forebears, when they were in Egypt, 
did not grasp the meaning of your wonders. R

But they soon forgot his deeds, 
and would not wait upon his counsel. 
They yielded to their cravings in the desert, 
and put God to the test in the wilderness. R

They forgot the God who was their saviour,
 who had done such great things in Egypt,
 such wonders in the land of Ham, 
such marvels at the Red Sea. R

For this he said he would destroy them, 
but Moses, the man he had chosen,
stood in the breach before him, 
to turn back his anger from destruction. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
 हे देवा, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर.
 आलेलुया!

Acclamation: 
A great prophet has arisen among us and God has visited his people!

शुभवर्तमान   मत्तय १५:२१-२८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बाई, तुझा विश्वास मोठा आहे. "

येशू तेथून निघून सोर आणि सिदोन ह्या भागात गेला आणि पाहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, “हे प्रभो, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा; माझी मुलगी भुताने फारच जर्जर केली आहे.” तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे.” त्याने उत्तर दिले, इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही." तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभुजी, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे.” तिने म्हटले, “खरेच प्रभुजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले खरखटे खातात.” तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ होवो" आणि त्याच घटकेला तिची मुलगी बरी झाली.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew15:21-28

At that time: Jesus went away and withdrew to the district of Tyre and Sidon. And behold, a Canaanite woman from that region came out and was crying, "Have mercy on me, O Lord, Son of David; my daughter is severely oppressed by a demon." But he did not answer her a word. And his disciples came and begged him, saying, "Send her away, for she is crying out after us." He answered, "I was sent only to the lost sheep of the house of Israel. But she came and knelt before him, saying, "Lord, help me." And he answered, "It is not right to take the children's bread and throw it to the dogs." She said, "Yes, Lord, yet even the dogs eat the crumbs that fall from their masters' table." Then Jesus answered her, "O woman, great is your faith! Be it done for you as you desire." And her daughter was healed instantly.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
येशूख्रिस्त कनानीबाईच्या विनंतीला पहिल्यांदा काहीच उत्तर देत नाही. परंतु जेव्हा तो तिचा दांडगा विश्वास बघतो तेव्हा तिच्या मुलीला बरे करतो. कधी कधी आपण परमेश्वराकडे प्रार्थना किंवा विनंती करतो तेव्हा आपल्याला वाटते की, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही किंवा आपली विनंती मान्य करीत नाही. मग आपण दुःखाला, संकटाला आजारपणाला कंटाळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, ख्रिस्ताच्या मार्गाने जात असताना जर तुमच्या दुःख, संकटे किंवा आजारपण येत असेल तर ते सहन करण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठीपरमेश्वर आपल्याला शक्ती मग आपण देवाला दोष देतो. हे साफ चुकीचे आहे. तेव्हा आपण देवाला दोष देण्यापेक्षा आपला विश्वास तपासून बघितला पाहिजे. तसेच आपण जे मागतो ते कुणासाठी व कशासाठी मागतो हे पण बघितले पाहिजे. कनानी बाईने तिच्या मुलीला आजारातून बरे करण्यासाठी प्रभूकडे विनंती केली. कधी आपण ह्या जगातील भौतिक व नश्वर गोष्टींसाठी विनंती करतो. तेव्हा त्या गोष्टी परमेश्वर देईलच असे नाही. परंतु एखाद्याच्या आरोग्यासाठी तुम्ही मनापासून दृढ विश्वासाने प्रार्थना केली तर त्याला नक्कीच चांगले आरोग्य लाभेल..

प्रार्थना :हे प्रभो, सर्वदा स्वर्गीय गोष्टी मिळविण्यास प्रयत्नशील बनण्यास आम्हला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या