Marathi Bible Reading | 18th week in ordinary Time | Friday 11th August 2023

 सामान्यकाळातील १८वा सप्ताह 

शुक्रवार ११ ऑगस्ट २०२३

 प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.  "


संत क्लेअर

कुमारिका (११९३-१२५३)

इ. स. १२१२ साली असिसी शहरातील संत जॉर्जच्या चर्चमध्ये असिसीच्या संत फ्रान्सिस ह्यांनी उपवासकालीन प्रवचने दिली. त्या प्रवचनाचा “क्यारा" नावाच्या एका अठरा वर्षीय मुलीवर एवढा जबरदस्त प्रभाव पडला की संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विचार सरणीनुसार व जीवन पद्धतीनुसार साधेपणाचे जीवन जगण्याची तीव्र उत्कंठा तिच्यात निर्माण झाली.
पुढे त्यानेच दिलेल्या सल्ल्यानुसार ती झावळ्यांच्या रविवारच्या रात्री आपल्या राजमहालातून गुपचूप बाहेर पडली. सोबत तिची मावशी बियांका आणि आणखी एक मैत्रीण होती. जवळच्याच पोर्टिउंकुलाच्या खोल्यापाशी असलेल्या लहानशा प्रार्थनामंदिरात संत फ्रान्सिस आणि त्यांचे धर्मबंधू तिच्यासाठी थांबलेले होते. इथेच तिने त्या सर्वांच्या साक्षीने आपले सोनेरी केस कापून घेतले. आपली भरजरी वस्त्रे काढून त्याऐवजी वैराग्याची वस्त्रे परिधान केली आणि ख्रिस्ताच्या नावाने गरिबीचे व्रत स्वीकारले. संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनानुसार तिला तात्पुरते जवळच्याच बेनेडिक्टाईन मठात ठेवण्यात आले.
ही बातमी तिच्या वडिलांच्या कानी पडताच त्यांचे रक्त उसळले. त्यांनी क्लेअरच्या लग्नाची व्यवस्था केलेली होती. तिच्यासाठी योग्य असा वर निवडलेला होता. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करून देण्याची मनोस्वप्ने ते पाहात होते. त्यामुळे त्यांना ह्या घटनेने धक्का बसला. बेनेडिक्टाईन कॉन्व्हेंटमधून तिला पळवून नेण्याचा मनसुबा देखील त्यांनी आखला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. क्लेअर आता पावित्र्याच्या व गरिबीच्या व्रताशी एकनिष्ठ राहण्यासाठी एका विशिष्ट संघाच्या स्थापनेचा विचार करू लागली.संत फ्रान्सिसला झालेल्या साक्षात्कारातून संत डेमियन चर्चच्या शेजारी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या प्रार्थनामंदिरात आता क्लेअर अगदी साधेसुधे जीवन जगू लागली. पंधरा दिवसांच्या आतच तिची धाकटी बहीण आग्रेस तिला येऊन मिळाली. 'पुअर क्लेअर्सची संस्था हळूहळू वाढीस लागली. पुढील काही वर्षात क्लेअरची मावशी बियांका, तिची आई धन्यवादित ऑर्तोलाना, आणखी एक बहीण बियाट्रीस ह्यांनीसुद्धा क्लेअरचे आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारले व त्या तिच्या संघात येऊन दाखल झाल्या.
क्लेअरच्या उर्वरित आयुष्यात ४० वर्षांत युरोपभरातील अनेक देशांमध्ये गरीब मुलींच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या संघाच्या पुष्कळशा शाखा उघडल्या गेल्या. असिसी येथील या संघाचे प्रमुख केंद्र मात्र क्लेअरच्या उतरत्या वयातही अध्यात्माचे केंद्र बनून राहिले. दोन पोप, अनेक कार्डिनल आणि बिशप्स तिचा सल्ला घेण्यासाठी येत असत. तिच्या अधिकृत निवृत्तीनंतरही असंख्य लोक तिच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत असत.
दीर्घकाळच्या आजारानंतर वयाच्या ५९व्या वर्षी १२ ऑगस्ट १२५३ रोजी साक्षात गरिबीचे मूर्तिमंत प्रतीक बनलेली 'संत फ्रान्सिसचे चिमुकले फूल' मानली गेलेली क्लेअर आपल्या स्वर्गीय निजधामी निघून गेली. त्यावेळी पोप इनोसेंट चौथे व त्यांच्या दरबारातील सर्व उच्च अधिकारी, तिच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते, अवघ्या दोनच वर्षांनी 'पुअर क्लेअर्स'ची ही पवित्र संस्थापिका पोपमहाशयांनी संतपदाने सन्मानित केली. तिच्या थडग्यावर असिसी येथे उभारलेले चर्च आतादेखील हजारो भाविकांसाठी तीर्थक्षेत्र बनलेलं आहे.
इ. स. १२२४ मध्ये फ्रेडरिक दुसरा ह्याच्या सारासेन सैन्याने जेव्हा असिसी
शहरावर हल्ला चढविला तेव्हा क्लेअर हिने अतिपवित्र ख्रिस्तशरीर असलेला प्याला आपल्या हाती घेऊन उंचाविला तेव्हा सर्व सैनिक आपोआप गर्भगळीत झाले. त्यांनी ताबडतोब तेथून पळ काढला. त्यामुळे काही चित्रांमध्ये क्लेअर हातात सिवोरियम (पवित्र भाकरींनी भरलेला प्याला) असलेल्या अवस्थेत दाखविण्यात येते.
अतिपवित्र साक्रामेंतातील येशूविषयी तिच्या मनात आत्यंतिक भक्तीभाव भरून उरलेला होता. 

चिंतन: मला जसे वागवायचे तसे वागवा. मी माझी इच्छा सर्वस्वी देवाला अर्पण केलेली असल्याने मी पूर्णतः तुमचीच आहे. मला आता स्वत:ची अशी इच्छा उरलेली नाही. संत क्लेअर

✝️             

पहिले वाचन : अनुवाद ४:३२-८०
वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
 "देवाने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले."

मोशे लोकांना म्हणाला, “देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुझ्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी महान गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती का ? हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत विचारून पाहा. तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत का? त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने इजिप्त देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला बाहू ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपणासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला का ? परमेश्वरच देव आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखविण्यात आले. तुला शिक्षण द्यावे म्हणून आकाशातून त्याने आपली वाणी तुला ऐकवली आणि पृथ्वीवर त्याने तुला आपला महाअग्नी दाखवला; आणि अग्नीमधून निघालेले त्याचे शब्द तू ऐकले. त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला इजिप्त देशातून बाहेर आणले. तुझ्यापेक्षा महान आणि सामर्थ्यवान राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देऊन तुला त्यांच्या देशात न्यावे आणि त्यांची भूमी तुला वतन करून द्यावी. म्हणून त्याने तसे केले आहे; आज हे तुम्ही पाहतच आहात. म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही. तुझे आणि तुझ्यामागून तुझ्या वंशजांचे बरे व्हावे आणि तुझा देव परमेश्वर जो देश तुला निरंतर देत आहे त्यात तू चिरकाळ राहावे म्हणून आज मी तुला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन कर."

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Deuteronomy 4:32-40 

Moses spoke to the people, saying "Ask now of the days that are past, which were before you, since the day that God created man on the earth, and ask from one end of heaven to the other, whether such a great thing as this has ever happened I or was ever heard of. Did any people ever hear the voice of a god speaking out of the midst of the fire, as you have heard, and still live? Or has any god ever attempted to go and take a nation for himself from the midst of another nation, by trials, by signs, by wonders, and by war, by a mighty hand and an outstretched arm, and by great deeds of terror, all of which the Lord your God did for you in Egypt before your eyes? To you it was shown, that you might know that the Lord is God; there is no other besides him. Out of heaven he let you hear his voice, that he might discipline you. And on earth he let you see his great fire, and you heard his words out of the midst of the fire. And because he loved your fathers and chose their offspring after them and brought you out of Egypt with his own presence, by his great power, driving out before you nations greater and mightier than you, to bring you in, to give you their land for an inheritance, as it is this day, know therefore today, and lay it to your heart, that the Lord is God in heaven above and on the earth beneath; there is no other. Therefore you shall keep his statutes and his commandments, which I command you today, that it may go well with you and with your children after you, and that you may prolong your days in the land that the Lord your God is giving you for all time."

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ७७:१२-१३,१४-१५,१६-२१

प्रतिसाद :  मी परमेश्वराची महत्कृत्ये वर्णीन.

१ खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या 
अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन;
 मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन
आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.

२ हे देवा, तुझा मार्ग पवित्र आहे; 
देवासारखा थोर देव कोण आहे ? 
अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस. 
तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस.

३ याकोब आणि योसेफ ह्यांची संतती 
म्हणजे तुझे लोक ह्यांना तू आपल्या 
पराक्रमी बाहूने मुक्त केले आहेस. 
मोशे आणि अहरोन ह्यांच्या हस्ते
तू आपले लोक कळपाप्रमाणे नेले.


 Psalm 77:12-13, 14-15, 16 and 21 

I remember the deeds of the Lord.

I remember the deeds of the Lord, 
I remember your wonders of old; 
I muse on all your works, and ponder your mighty deeds. R

Your way, O God, is in the holy place. 
What god is as great as our God? 
You are the God who works wonders.
 Among the peoples you showed your power.R

Your strong arm redeemed your people,
the descendants of Jacob and Joseph. 
You guided your people like a flock 
by the hand of Moses and Aaron. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतःचक्षू प्रकाशित करो. म्हणजे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी
 आलेलुया!

Acclamation: 
 Blessed are those who are persecuted for righteousness' sake, for theirs is the kingdom of heaven. 

शुभवर्तमान   योहान १६:२४-२८
वाचक :मतयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?"

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा आणि आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार ? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. मी तुम्हाला नक्कीच सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 16:24-28:
 At that time: Jesus told his disciples, "If anyone would come after me, let him deny himself and take up his cross and follow me. For whoever would save his life will lose it, but whoever loses his life for my sake will find it. For what will it profit a man if he gains the whole world and forfeits his soul? Or what shall a man give in return for his soul? For the Son of Man is going to come with his angels in the glory of his Father, and then he will repay each person according to what he has done. Truly, I say to you, there are some standing here who will not taste death until they see the Son of Man coming in his kingdom."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
जो कोणी आपला क्रुस उचलून येशूच्या मागे चालतो तोच खरा येशूचा शिष्य आहे. मात्र येशूच्या मागे चालताना दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. तुम्हाला ऐहिक सुख पाहिजे की, सार्वकालिक जीवन पाहिजे. जर तुम्हाला ह्या जगातील मोह जाळ्यात अडकून रहायचे असेल तर तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य बनू शकत नाही. कारण तुम्ही सुखी, विलासी व चैनबाजीचे जीवन निवडता. ह्या जगातील संपत्ती धनदौलतीची हाव तुम्हाला येशूच्या मागे जाण्यापासून परावृत्त करते. ह्या जगातील जीवन हेच खरे जीवन आहे असे तुम्ही समजता व सार्वकालिक जीवनावरचातुमचा विश्वास उडतो. येशूला हेच सांगायचे आहे, ह्या जगातील जीवनाचाच तुम्ही विचार कराल तर तुमच्या जीवनाला तुम्ही मुकाल म्हणजे सार्वकालिक जीवन जे खरे जीवन आहे त्या जीवनाला तुम्ही मुकाल. म्हणूनच मनुष्याने सर्व जग मिळविले पण आपला आत्मा गमावला तर त्याचा काय फायदा. येशूने सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक जीवन हे फार महत्त्वाचे आहे. आपण आपल्या जीवनात येशूचा शिष्य बनण्यासाठी आध्यात्मिक जीवनाला किती महत्त्व देतो त्यावर मनन चिंतन करायला पाहिजे.

प्रार्थना :हे प्रभू येशू, आत्मत्याग व परस्पर सेवा करुन तुला अनुसरण्यास  आम्हाला सामर्थ्या व कृपा दे, आमेन,


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या