Marathi Bible Reading | 18th week in ordinary Time |Saturday 12th August 2023

 सामान्यकाळातील १८वा सप्ताह 

शनिवार १२ ऑगस्ट २०२३

 "प्रभो, माझ्या मुलावर दया करा;   "

 संत हिप्पोलिटस व पोन्तिआतुस
-धर्मगुरू, रक्तसाक्षी व परमगुरु रक्तासाक्षी ( २३५)


आपल्या देवावरील विश्वासात चमत्कार घडवून आणण्याचे व परिस्थिती बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे. आपल्याला त्या विश्वासाची व देवाच्या  सामर्थ्याची जाणीव व्हावी. आपण देव प्रीतित आणि परस्पर प्रीतित वाढत राहावे तरच देवाठायी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन शक्य आहे. आपण देवाला | सर्वस्वी शरण जाऊ या.

✝️             

पहिले वाचन : अनुवाद  ६:४-१३
वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने प्रीती कर. "

मोशे लोकांना म्हणाला, हे इस्राएल, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे, त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता, त्यांविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर आणि आपल्या फाटकांवर त्या लिही."
तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल, जी मोठी आणि सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत, तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुन वृक्ष हे सर्व तो तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील; ज्या परमेश्वराने तुला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नामाने शपथ वाहा.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Deuteronomy 4:32-40 

Deuteronomy 6:4-13

Moses spoke to the people, saying, "Hear, O Israel: The Lord our God, the Lord is one. You shall love the Lord your God with all your heart and with all your soul and with all your might. And these words that I command you today shall be on your heart. You shall teach them diligently to your children, and shall talk of them when you sit in your house, and when you walk by the way, and when you lie down, and when you rise. You shall bind them as a sign on your hand, and they shall be as frontlets between your eyes. You shall write them on the doorposts of your house and on your gates. "And when the Lord your God brings you into the land that he swore to your fathers, to Abraham, to Isaac, and to Jacob, to give you - with great and good cities that you did not build, and houses full of all good things that you did not fill, and cisterns that you did not dig, and vineyards and olive trees that you did not plant-and when you eat and are full, then take care lest you forget the Lord, who brought you out of the land of Egypt, out of the house of slavery. It is the Lord your God you shall fear. Him you shall serve and by his name you shall swear.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १८:२- ४,४७.५१

प्रतिसाद :  हे परमेश्वरा,मी तुझ्यावर प्रेम करतो.

१) हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या 
मी तुझ्यावर प्रेम करतो; 
परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा आहे.

२) माझा देव, माझा खडक आहे, 
त्याचा मी आश्रय घेतो. तो माझे कवच, 
माझ्या रक्षणाचे बळकट साधन, 
माझा उंच बुरूज आहे. 
तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो.
स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो,

३) परमेश्वर जिवंत आहे, 
त्या माझ्या दुर्गाला धन्यवाद असो! 
माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो.
 तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो; 
आपल्या अभिषिक्ताला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.


 Psalm 18:2-3a, 3bc-4, 47 and 51ab
R  I love you, Lord, my strength.

I love you, Lord, my strength; 
O Lord, my rock, my fortress,
my saviour. R 

My God, my rock where take refuge;
my shield, my saving strength,
my stronghold.
I cry out, "Praised be the Lord!" and see, 
I am saved from my foes. R

The Lord lives, and blest be my Rock!
 May the God of my salvation be exalted.
The Lord gives great victories to his king 
and shows merciful love for his anointed. R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. 
 आलेलुया!

Acclamation: 
Our Saviour Christ Jesus abolished death and brought life and immortality to light through the gospel.

शुभवर्तमान   मत्तय १७:१४-२०
वाचक :मतयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुमच्याजवळ विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हांस असाध्य नाही. "एक मनुष्य येशूकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभो, माझ्या मुलावर दया करा; कारण तो फेपरेकरी असून त्याचे हाल होतात; तो वारंवार विस्तवात पडतो आणि कधी पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही." तेव्हा येशूने उत्तर दिले, “अहाहा, हे विश्वासहीन आणि कुटिल पिढी! मी कोठपर्यंत तुम्हाबरोबर असू? कोठपर्यंत तुमचे सोसू ? त्याला येथे माझ्याजवळ आणा." नंतर येशूने भुताला दटाविले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकान्ती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हांला नक्की सांगतो की, जर तुम्हांमध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.”.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 17:14-20

At that time: A man came up to Jesus and, kneeling before him, said, "Lord, have mercy on my son, for he has seizures and he suffers terribly. For often he falls into the fire, and often into the water. And brought him to your disciples, and they could not heal him. And Jesus answered, "O faithless and twisted generation, how long am I to be with you? How long am to bear with you? Bring him here to And Jesus rebuked the demon, and it came out of him, and the boy was healed instantly. Then the disciples came to Jesus privately and said, "Why could we not cast it out?" He said to them, "Because of your little faith. For truly, I say to you, if you have faith like a grain of mustard seed, you will say to this mountain, 'Move from here to there', and it will move, and nothing will be impossible for you."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासाला फार महत्व आहे. मी विश्वास ठेवतो ही प्रार्थना आपण वारंवार म्हणत असतो व आपला विश्वास प्रकट करीत असतो.परंतु खरोखर आपण त्या प्रार्थनेत सांगितेल्या सर्व गोष्टींवर हृदयापासून विश्वास ठेवतो का? येशूचे शिष्य त्याच्याबरोबर असूनदेखील त्यांचा पूर्ण विश्वास नव्हता. त्यामुळे ते फेपरेकरी मुलाला बरे करू शकले नाही. तेव्हा येशूने म्हटले की तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याऐवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. म्हणजेच परमेश्वरावर आपला विश्वास दृढ असेल तर एवादी अशक्य गोष्ट देखील आपण शक्य करू शकतो. इतके सामर्थ्य त्या विश्वासामध्ये आहे. त्यामुळे ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेले आहे, मी जगाच्या अंतःपर्यंत तुमच्याबरोबर आहे ह्या गोष्टींवर आपला भक्कम विश्वास असला पाहिजे, कारण आपल्यामध्ये कार्य करणारा खुद्द परमेश्वर (पवित्र आत्मा) आहे त्यामुळे परमेश्वराच्या सहाय्याने आपल्याला काहीही शक्य आहे. कधी कधी आपण आपल्या जीवनात अपयशी ठरतो कारण परमेश्वराला कार्य करण्यासाठी आपल्यामध्ये आपल्या अल्प-विश्वासामुळे कार्य करण्यास वाव देत नाही. बऱ्याचवेळा काही लोकसंकटात, दुःखात व आजारात भगताकडे धाव घेतात कारण त्यांचा परमेश्वराच्या सामर्थ्यांवर विश्वास नसतो मग ते जरी मी विश्वास ठेवतो ही प्रार्थना बोलत असले तरी ती वरवरून बोलतात, यांत्रिक पद्धतीने बोलतात कारण त्यांचा विश्वास उथळ असतो. म्हणून आजपासून निश्चय करू या की, जेव्हा जेव्हा मी विश्वास ठेवतो ही प्रार्थना बोलेन तेव्हा तेव्हा ती योग्यप्रकारे समजून मनापासून हृदयातून बोलेन.

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, माझी श्रद्धा बळकट करण्यांस व स्वतःबरोबरच  इतरांचे जीवन परिवर्तन करण्यास मला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या