Marathi Bible Reading | 19th Sunday in Ordinary Time |13th August 2023

 सामान्यकाळातील १९वा सप्ताह 

रविवार १३  ऑगस्ट २०२३

येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका.

प्रभू येशूचे समुद्रावरुन चालत येणे

“प्रभुजी, मला वाचवा.”

आजच्या शुभवर्तमानातील दुसरा प्रसंग प्रभू येशूचे समुद्रावरुन चालत येणे हा आहे. कठीण विपत्तीच्या समयी प्रभू येशू आपल्या शिष्यांपुढे प्रकट झाला. त्यांच्या डळमळीत विश्वासाबद्दल प्रभूने त्यांना समजावले आणि सांगितले, 'धीर धरा, मी आहे. भिऊ नका.' प्रभूवरील आपला विश्वास दृढ करण्यासाठी त्याला शरण जाऊ या.

✝️             

पहिले वाचन :१राजां १९:९.११-१३
वाचक :राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन १९:९.११-१३
"तू येथून बाहेर निघून जा आणि पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. "

एलिया गुहेत राहिला. तेव्हा, पाहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. त्याने त्याला म्हटले, तू येथून बाहेर निघून जा आणि पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पाहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच्यासमोरून मोठा सोसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारीत व खडक फोडीत होता, वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला; पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी उभा राहिला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :1 Kings 19:9a, 11-13a
In those days: Elijah came to a cave Horeb the mount of God,) and lodged in it. And behold, the word of the Lord came to him. And he said, "Go out and stand on the mount before the Lord." And behold, the Lord passed by, and a great and strong wind tore the mountains and broke in pieces the rocks before the Lord, but the Lord was not in the wind. And after the wind an earthquake, but the Lord was not in the earthquake. And after the earthquake a fire, but the Lord was not in the fire. And after the fire the sound of a low whisper. And when Elijah heard it, he wrapped his face in his cloak and went out and stood at the entrance of the cave.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ८५:९-१४

प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तुझी दया दाखव आणि तुझी तारणदायी मदत आम्हांला दे. 

१ परमेश्वर देव बोलेल ते मी ऐकून घेईन,
कारण तो आपल्या लोकांशी आणि 
आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील.
 त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले
 तारण खरोखर समीप असते.
 यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.

२ दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत, 
न्याय्यत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे. 
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे,
 स्वर्गातून न्याय्यत्व अवलोकन करीत आहे.

३ जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि 
आमची भूमी आपले फळ देईल. 
त्याच्यापुढे नीतिमत्ता चालेल आणि 
त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.


Psalm 85:9ab and 10, 11-12, 13-14

Let us see, O Lord, your mercy, and grant us your salvation.

I will hear what the Lord God speaks;
he speaks of peace for his people and his faithful, 
His salvation is near for those who fear him, 
and his glory will dwell in our land. R 

Merciful love and faithfulness have met; 
justice and peace have kissed. 
Faithfulness shall spring from the earth, 
and justice look down from heaven. R

Also the Lord will bestow his bounty, 
and our earth shall yield its increase. 
Justice will march before him, 
and guide his steps on the way.


दुसरे वाचन  रोम ९:१-५
 वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन९:१-५
“माझ्या नातेवाईकांसाठी मी ख्रिस्तापासून विभक्त व्हावे हे शक्य असते तर तशी मी इच्छा केली असती."
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही, माझी सद्सद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की, मला मोठा खेद वाटतो आणि माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्र, उपासना आणि अभिवचने ही त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत आणि त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांच्यावर असून युगानुयुगे धन्यवादित देव आहे. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading  :Romans 9:1-5

Brethren: I am speaking the truth in Christ-I am not lying my conscience bears me witness in the Holy Spirit-that have great sorrow and unceasing anguish in my heart. For I could wish that I myself were accursed and cut off from Christ for the sake of my brothers, my kinsmen according to the flesh. They are Israelites, and to them belong the adoption, the glory, the covenants, the giving of the law, the worship, and the promises. To them belong the patriarchs, and from their race, according to the flesh, is the Christ,
who is God over all, blessed for ever. Amen.
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतःचक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही आम्ही ओळखावी.
  आलेलुया!

Acclamation: 
 I long for you, O Lord, my soul longs for his word.

शुभवर्तमान मत्तय १४:२२-३३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १४:२२-३३ 

"प्रभो, पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा."

मी लोकसमुदायांना निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्याआधी पलीकडे जा, असे म्हणून येशूने लागलेच शिष्यांना पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकान्ती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले,“भूत आहे” आणि ते भिऊन ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका.

तेव्हा पेत्रने उत्तर दिले, “ प्रभो, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” त्याने म्हटले, "ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असंता ओरडून म्हणाला, “प्रभुजी, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, “अरे, अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहा.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 14:22-33

After the crowd was satisfied, Jesus made the disciples get into the boat and go before him to the other side, while he dismissed the crowds. And after he had dismissed the crowds, he went up on the mountain by himself to pray. When evening came, he was there alone, but the boat by this time was a long way from the land, beaten by the waves, for the wind was against them. And in the fourth watch of the night he came to them, walking on the sea. But when the disciples saw him walking on the sea, they were terrified, and said, "It is a ghost!" and they cried out in fear. But immediately Jesus spoke to them, saying, "Take heart; it is I. Do not be afraid." And Peter answered him, "Lord, if it is you, command me to come to you on the water." He said, "Come." So Peter got out of the boat and walked on the water and came to Jesus. But when he saw the wind, he was afraid, and beginning to sink he cried out, "Lord, save me." Jesus immediately reached out his hand and took hold of him, saying to him, "O you of little faith, why did you doubt?" And when they got into the boat, the wind ceased. And those in the boat worshipped him, saying, "Truly you are the Son of God."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  आजच्या उपासनेतील तिन्ही वाचने परमेश्वराच्या अद्भूत सामर्थ्याचे वर्णन करणारी आहेत. 
अ. परमेश्वराचे सामर्थ्य केवळ आगळ्यावेगळ्या गोष्टींमधून नव्हे तर साध्यासुध्या गोष्टींमधून प्रकट होते : आजच्या पहिल्या वाचनात (१राजे १९:९, ११-१३अ) एलिया संदेष्ट्याला परमेश्वराचा दृष्टान्त होतो. परंपरेनुसार भुकंप,वादळवारे आणि अग्नीवर्षाव हे परमेश्वराच्या दिव्य उपस्थितीचे अग्रदूत मानले जायचे. एलियाने होरेब पर्वताच्या गुहेजवळ ह्या तिन्ही गोष्टींचा थरार अनुभवला. मात्र “परमेश्वर त्याच्यात नव्हता” असे लेखक ठामपणे आपल्याला सांगत राहतो. नंतर जी एक “शांत, मंद वाणी” ऐकू आली तिच्यातून परमेश्वर आपल्याशी बोलत असल्याचे एलियाने ओळखले. कधी कधी भव्य दिव्य गोष्टींच्या झगमगाटाचा ध्यास घेतल्याने साध्या सुध्या गोष्टींतील परमेश्वराचे अद्भूत सामर्थ्य माणसाला जाणवेनासे
होते. 
ब. परमेश्वराचे सामर्थ्य आपण गृहीत धरू नये : आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल रोमकरांस (रोम ९:१-५) जाणीव करून देतो की, इस्राएली लोकांना परमेश्वराचे विशेष आशीर्वाद लाभलेले होते. मात्र ती जनता परमेश्वराशी एकनिष्ठ राहिली नाही. त्यामुळे त्यांनी परमेश्वराचे सामर्थ्य गृहीत धरले. यहुद्यांनी सुवार्ता स्वीकारली नाही तेव्हा संत पॉल आणि त्याचे सहकारी परराष्ट्रीयांकडे वळले होते. ह्या पार्श्वभूमीवर संत पॉलने दिलेला हा सावधानतेचा इशारा अतिशय गांभीर्याने घ्यायला हवा. 
क.परमेश्वराच्या सामर्थ्याचे भान ठेवण्यासाठी अंतःकरणात श्रद्धा असायला हवी : आजच्या शुभवर्तमानामध्ये (मत्तय १४:२२-३३) येशू पाण्यावरून चालत असल्याचा चमत्कार सादर करण्यात आलेला आहे. त्यावरून तीन गोष्टी सिद्ध होतात. येशूचे निसर्गावरील नियंत्रण, मानवाची दुर्बलता (संत पीटर) आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवण्याची गरज. “भिऊ नका, धीर धरा, मी आहे" हे प्रभूचे आश्वासक शब्द आपल्याकडून श्रद्धेची अपेक्षा करतात. अशीच श्रद्धा परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी संवेदनक्षम असते, आणि ती यथाकाळी विपुल फळ धारण करते.

आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात परमेश्वराचे सामर्थ्य मी कोणकोणत्या बाबतीत अनुभवतो ? त्यामध्ये कोणते अडथळे जाणवतात ?

प्रार्थना : हे प्रभू, प्रार्थनाद्वारे तुझ्याशी व परमपित्याशी संवाद साधण्यास आणि श्रद्धेत वाढण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या