Marathi Bible Reading | Saturday 30th September 2023|25th week in ordinary Time |

 सामान्यकाळातील २५वा सप्ताह 

शनिवार  सप्टेंबर २०२३

 कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.

The Son of Man is about to be delivered into the hands of men."


  ✝️  

  ✝️  


संत जेरोम  -
वर्तनसाक्षी,धर्मपंडित (३४१-४२०)

सोफ्रोनियस युजेबियस हैरोनिमस असे लांबलचक नाव असलेला जेरोम दल्मातिया (युगोस्लाव्हिया) प्रांतात जन्माला आला. त्याने रोम शहरात अभ्यास केल्यानंतर वृत्तीने ज्ञानपिपासू असलेला हा अभ्यासू बुद्धीमान माणूस ज्ञानाच्या शोधार्थ बरीच वर्षे दूरदूरचा प्रवास करीत राहिला. फा, जेरोम ह्यांची अभ्यासूवृत्ती, विविध भाषांवरील प्रभुत्व बायबलचे ज्ञान आणि चिकाटी ह्यामुळे तब्बल १८ वर्षांनी इ.स. ४०४ साली हे बायबल भाषांतराचे कार्य त्यांनी तडीस नेले. त्या आवृत्तीला 'व्हल्गेट' (म्हणजे दैनंदिन वापरासाठी बायबलची आवृत्ती) असे नाव देण्यात आले. पुढे ११०० वर्षांनी ट्रेंट इथे भरलेल्या विश्वपरिषदेमध्ये 'जेरोमकृत भाषांतरीत बायबल हे ख्रिस्तसभेचे अधिकृत भाषांतर आहे' अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला.
नितांत श्रद्धा आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता ह्यांचा सुंदर मिलाफ त्यांच्याठायी घडून आलेला होता. मोठ्या खंबीरपणे बायबलवर सडेतोडपणे बोलणारे संत जेरोम रात्रीच्या रात्री प्रार्थनेमध्ये एकांतवासात घालवीत. पुष्कळ उपासतापास करीत. शेवटपर्यंत त्यांनी आपल्या शरीराला अनंत आत्मक्लेश दिले.३० सप्टेंबर ४२० रोजी आपल्या परिश्रमाचे प्रतिफळ मिळविण्यासाठी स्वर्गीय निजधामी गेलेला हा महापुरुष ग्रंथपालांचा आश्रयदाता संत मानला जातो.
त्यांच्या मते 'पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला प्रार्थना कराविशी वाटली पाहिजे आणि प्रार्थना करीत असताना पवित्र शास्त्रातील वचनांचा आधार आपल्याला घ्यावासा वाटला पाहिजे. 'पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान होय.'

चिंतन : सतत काहीतरी करीत रहा, मग परमेश्वर येवो वा सैतान येवो, तुमचे हात पुष्कळशा चांगल्या गोष्टींनी भरलेले आहेत असे त्याला दिसले पाहिजे.-संत जेरोम ■■

बायबल वाचन, मनन-चिंतन, प्रार्थना व उपासनाविधीतील आपला सहभाग ह्याद्वारे आपण प्रभूची सामर्थ्यशाली कृपा अनुभवून देवाचे राज्य सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत होऊ या. 


 ✝️

पहिले वाचन :  जखऱ्या २ :१,५-१०-११

वाचक :जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन

“मी येईन नि तुझ्यात वस्ती करीन."

जखऱ्या म्हणाला, “मी आपले डोळे वर करून पाहिले तो पाहा, एक मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन उभा आहे. तेव्हा मी विचारले, तू कोठे जात आहेस?" तो मला म्हणाला, 'तू “येरुशलेमचे माप घेण्यास म्हणजे त्याची लांबी रुंदी पाहण्यास मी जात आहे.” आणि पाहा माझ्याबरोबर भाषण करणारा देवदूत जाऊ लागला तेव्हा दुसरा देवदूत त्याला भेटायला आला. तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणाला असे सांग, येरुशलेममध्ये माणसे आणि गुरेढोरे फार झाल्यामुळे भिती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन आणि तिच्या ठायी मी तेजोरूप होईन.”
हे सियोनकन्ये, जयजयकार आणि उल्हास कर, कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील आणि प्रजा बनतील.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Zechariah 2:1-5, 10-11a

1,Zechariah, lifted my eyes and saw, and behold a man with a measuring line in his hand! Then I said, "Where are you going?" And he said to me, To measure Jerusalem, to see what is its width and what is its length." And behold, the angel who talked with me came forward, and another angel came forward to meet him and said to him, "Run, say to that young man, Jerusalemn shall be inhabited as villages without walls, because of the multitude of people and livestock in it. And I will be to her a wall of fire all round, declares the Lord, and will be the glory in her midst." Sing and rejoice, O daughter of Sion, for behold, I come and I will dwell in your midst, declares the Lord. And many nations shall join themselves to the Lord in that day, and shall be my people. And I will dwell in your midst.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र यिर्मया ३२:१०-१३

प्रतिसाद :परमेश्वर मेंढपाळाप्रमाणे त्यांची देखभाल करील.

१) अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका, 
दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा 
आणि म्हणा, ज्याने इस्राएलला विखुरले.
तो त्यांना जमा करील. 
मेंढपाळ आपल्या कळपाची जशी देखभाल 
करतो तशी तो त्यांची देखभाल करील.

२) कारण परमेश्वराने इस्राएलचा उद्धार केला आहे 
आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या
 हातून त्याला मुक्त केले आहे. 
ते येऊन सियोनच्या टेकड्यांवर आनंदाने गातील, 
परमेश्वराची उपयुक्त वरदाने त्यांच्याकडे लोटतील.

३) त्या समयी कुमारिका आनंदाने नृत्य करतील, 
वृद्ध आणि तरुण एकत्र आनंद करतील, 
मी त्यांच्या शोकाचे आनंदात रूपांतर करीन, 
मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखाचे रूपांतर आनंदात करीन.



Psalm 
Jeremiah 31:10, 11-12ab, 13 
The Lord will keep us, as a shepherd keeps his flock.

Hear the word of the Lord, O nations,
and declare it in the coastlands far away; 
say, 'He who scattered Israel will gather him, 
and will keep him as a shepherd keeps his flock.R

For the Lord has ransomed Jacob
and has redeemed him from hands too strong for him. 
They shall come and sing aloud on the height of Sion, 
and they shall be radiant over the goodness of the Lord.

Then shall the young women rejoice in the dance, 
and the young men and the old shall be merry.
will turn their mourning into joy; 
I will comfort them, and give them gladness for sorrow.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे,
म्हणून पित्याने स्वत:च्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला.
 आलेलुया!

Acclamation: 
Our Saviour Christ Jesus abolished death and brought life and immortality to light through the gospel.
.
शुभवर्तमान  लूक ९:४३-४५
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे, या गोष्टींविषयी त्याला विचारायला ते भीत होते. "

येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. ही गोष्ट त्यांना समजली नाही. ती त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ती गुप्त ठेवण्यात आली होती आणि ह्या गोष्टींविषयी त्याला विचारायला ते भीत होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel ReadingLuke 9:43b-45

At that time: While they were all marvelling at everything Jesus was doing, Jesus said to his disciples, "Let these words sink into your ears: The Son of Man is about to be delivered into the hands of men." But they did not understand this saying, and it was concealed from them, so that they might not perceive it. And they were afraid to ask him about this saying.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
येशू चमत्कार करणारा आहे. तो आजाऱ्यांना व रोग्यांना बरे करणारा आहे. तो सामर्थ्यवान, शक्तीशाली व लोकांना जीवन देणारा आहे. इतक्याच गोष्टींची त्याच्या शिष्यांना समजूत होती. पण येशू जेव्हा त्याच्या दुःखसहनाबाबत किंवा देवाच्या पुत्राला धरून देण्याबाबतचे सत्य येशू त्याच्या शिष्यांपुढे मांडतो, तेव्हा त्याचे शिष्य ते सत्य समजण्यास असमर्थ ठरतात. त्यावेळी आपण जर शिष्यांसोबत असतो तर आपणालाही हे येशूचे वचन समजण्यास कठीण गेले असते, पण आता आपल्याला येशूच्या दुःखसहनाचे व धरून देण्यामागचे खरे कारण काय आहे हे कळले आहे की, आपण येशूचे अनुसरण करत असताना जीवनात आनंदाचे, सुखाचे व समाधानाचे क्षण येतील पण त्याबरोबर आपले येशूशी असलेले नाते किती मजबूत आहे याची परीक्षा घेतली जाऊ शकते.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी तारणदायी योजना व जीवनाची रहस्ये जाणण्यास व  तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन आचरण करण्यास कृपा दे, आमेन.




सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या