Marathi Bible Reading | 26th Sunday in ordinary Time 1st October 2023

 सामान्यकाळातील २६ वा रविवार 

१ ऑक्टोबर   २०२३

ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील.


 पण तो म्हणाला, 'मी नाही जात.' तरी नंतर त्याला पश्चात्ताप होऊन तो गेला.

 
 देव विशेष रितीने पापी माणसांवर प्रेम करीत असतो.  परमेश्वराचे माणसावरील प्रेम, करुणा व | दया ह्यांचे दर्शन घडवून आणण्यासाठी दोन पुत्रांचा दाखला देण्यात आला आहे. पहिल्या पुत्राला स्वतःच्या वर्तणुकीबद्दल काहींचे वाटले नाही मात्र दुसऱ्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने बापाच्या शब्दाप्रमाणे वर्तन केले. ज्याला आपल्या गैरवर्तणुकीबद्दल आणि पापांबद्दल पश्चात्ताप होतो व जो कृतीशील बनतो त्याला देवाच्या प्रेमाची सहभागिता प्राप्त होते. धार्मिकतेचा आणि नीतिमत्तेचा देखावा करणाऱ्या शास्त्री परुश्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही मात्र समाजाने बहिष्कृत ठरवलेले जकातदार आणि पापी स्त्रियांनी पश्चात्तापी अंतःकरणाने  येशूवर विश्वास ठेवला. म्हणूनच प्रभू आज म्हणत आहे, 'जकातदार व कसविणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. '
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणत आहे, 'स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या  गौरवासाठी प्रत्येक जिभेने, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे.' असे कबूल करावे. प्रभू । यी आपण आज नतमस्तक बनू या.
✝️             

पहिले वाचन : यहेज्केल १८:२५ - २८

वाचक :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन

“दुर्जन दुष्टाईपणापासून परावृत्त होईल तर तो आपला जीव वाचवील."

परमेश्वराचे वचन मला याप्रमाणे प्राप्त झाले : तुम्ही म्हणता, प्रभूचा मार्ग न्याय्य नाही. हे इस्राएल घराण्या, ऐक, माझा मार्ग न्याय्य नाही का? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत, असे नव्हे का? कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करतो आणि त्यामुळे मरतो तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो. दुर्जन आपण केलेल्या दुष्टाईपणापासून परावृत्त होऊन नीतीने आणि धार्मिकतेने वागेल तर आपला जीव वाचवील. तो आपण केलेली सर्व पापे लक्षात आणून वळेल तर तो खात्रीने वाचेल, मरणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Ezekiel 18:25-28

Thus says the Lord: "Yet you say, The way of the Lord is not just Hear now, O house of Israel: Is my way not just? Is it not your ways that are not just? When a righteous person turns away from his righteousness and does injustice, he shall die for it; for the injustice that he has done he shall die. Again, when a wicked person turns away from the wickedness he has committed and does what is just and right, he shall save his life. Because he considered and turned away from all the transgressions that he had committed, he shall surely live; he shall not die
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र २४:४-५ अब, ६-७, ८-९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव.

१. तुझ्या वाटा मला प्रकट कर. 
तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, 
कारण तूच माझा उद्धारक देव आहेस.

२. हे परमेश्वरा, तू आपली दया आणि वात्सल्य आठव, 
ती पुरातन काळापासून आहेत. 
हे परमेश्वरा, माझी तारुण्यातली पापे व अपराध आठवू नकोस. 
तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.

३. परमेश्वर उत्तम आणि सरळ आहे, 
म्हणून तो पाप्यांना सन्मार्ग दाखवतो, 
तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो, 
तो दीनांना आपला मार्ग शिकवतो.


Psalm  25:4-5, 6-7, 8-9

Remember your compassion, O Lord.

O Lord, make me know your ways.
Teach me your paths.
Guide me in your truth, and teach me; 
for you are the God of my salvation.
I have hoped in you all day long. 

Remember your compassion, O Lord, 
and your merciful love,
for they are from of old. 
Do not remember the sins of my youth,
nor my transgressions.
In your merciful love remember me, 
because of your goodness, O Lord. R

Good and upright is the Lord; 
he shows the way to sinners.
He guides the humble in right judgment:
to the humble he teaches his way. R



दुसरे वाचन  फिलिप्पीकरांस पत्र १:२०-२४.२७
 
वाचक : पौलचे फिलिप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन २:१-११

" अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. "
.ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा आणि करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर विनयशीलतेने एकमेकांना आपणांपेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही क्रुसावर मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading  :Philippians 2:1-11

Brethren: If there is any encouragement in Christ, any comfort from love, any participation in the Spirit, any affection and sympathy, complete my joy by being of the same mind, having the same love, being in full accord and of one mind. Do nothing from selfish ambition or conceit, but in humility count others more significant than yourselves. Let each of you look not only to his own interests, but also to the interests of others. Have this mind among yourselves, which is yours in Christ Jesus, who, though he was in the form of God, did not count equality with God a thing to be grasped, but emptied himself, by taking the form of a servant, being born in the likeness of men. And being found in human form, he humbled himself by becoming obedient to the point of death, even death on a cross. Therefore God has highly exalted him and bestowed on him the name that is above every name, so that at the name of Jesus every knee should bow, in heaven and on earth and under the earth, and every tongue confess that Jesus Christ is Lord, to the glory of God the Father.


This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
 प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. 
  आलेलुया!

Acclamation: 
 My sheep hear my voice, says the Lord; and know them, and they follow me.

शुभवर्तमान मत्तय  २१:२८-३२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

"पहिल्या मुलाला पश्चात्ताप झाला आणि तो गेला. जकातदार आणि वेश्या मुख्य याजक व वडीलजन यांच्या आधी देवाच्या राज्यात जातात.'

येशू मुख्य याजक व लोकांचे वडीलजन यांना म्हणाला, तुम्हांला काय वाटते ते सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, 'मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.' पण तो म्हणाला, 'मी नाही जात.' तरी नंतर त्याला पश्चात्ताप होऊन तो गेला. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. त्याने उत्तर दिले, जातो महाराज पण तो गेला नाही. ह्या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ? ते म्हणाले, पहिल्या मुलाने. येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हांला नक्की सांगतो, जकातदार आणि वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. कारण योहान नीतीच्या मार्गाने तुम्हांकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जकातदार आणि वेश्या ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हांला पश्चात्ताप झाला नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 21:28-32 
At that time: Jesus said to the chief priests and the elders of the people, "What do you

think? A man had two sons. And he went to the first and said, 'Son, go and work in the
vineyard today." And he answered, I will not, but afterwards he changed his mind and went. And he went to the other son and said the same. And he answered, I go sir, but did not go. Which of the two did the will of his father?" They said, "The first. Jesus said to them, "Truly, I say to you, the tax collectors and the prostitutes go into the kingdom of God before you. For John came to you in the way of righteousness, and you did not believe him, but the tax collectors and the prostitutes believed him. And even when you saw it, you did not afterwards change your minds and believe him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  चांगला माणूस जसा बिघडू शकतो तसाच वाईट माणूस चांगला बनू शकतो. दरम्यानच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार व केलेल्या कृतीनुसार त्याच्या जीवनाची एकंदरीत दिशा ठरू
शकते. आजच्या पहिल्या वाचनात धार्मिक व दुर्जन, दुसऱ्या वाचनात आज्ञाधारक व बंडखोर तर शुभवर्तमानात विश्वासू व अविश्वासू ह्या व्यक्तींची उदाहरणे देण्यात आलेली आहेत. त्यामागची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर आपल्याला पुढील विचार चिंतनासाठी मिळतात. 
१. धार्मिकता जीवन देते; दुष्टपणा विनाशाकडे घेऊन जातो : यहेज्केलच्या काळातील लोक आपल्या जीवनाच्या अवस्थेचे खापर आपल्या पूर्वजांच्या दुष्टपणावर फोडीत होते. आमच्या बापांनी द्राक्षे खाल्लीत म्हणून आमचे दात आंबले असे ते म्हणत. यहेज्केल त्यांना ... आपल्या कृत्यांची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन करतो. धार्मिक माणसाने चुकीचा निर्णय घेतला तर तो विनाशाच्या दिशेने जाऊ शकतो. तसाच दुर्जनाने चांगला निर्णय घेतला तर तो जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो. मात्र त्यासाठी त्याने स्वातंत्र्याचा सदुपयोग करायला हवा. 
२. नम्रता माणसाला उंचावते; गर्वाचे घर खाली असते: आजचे दुसरे वाचन आपल्यासमोर प्रभू येशूच्या त्यागाचे व नम्रतेचे उदाहरण सादर करते. तो देवाच्या बरोबरीचा असूनही गर्विष्ठ बनला नाही. याउलट ज्यांच्या हाती तात्पुरती राजकीय व धार्मिक सत्ता होती त्यांनी त्याला क्रुसावर खिळले.त्याच्या पुनरुत्थानामुळे गर्विष्ठांचे घर खाली झाले. मात्र येशूच्या नावापुढे गुडघे टेकले जावेत इतका तो आकाशाएवढा उंच झाला. 
३. पश्चात्ताप माणसाला नवजीवन देतो; पाप माणसाला मरणाकडे घेऊन जाते : आजच्या शुभवर्तमानातील पहिला मुलगा हे। यहूदी लोक, शास्त्री- परूशी ह्यांचे प्रतीक आहे. त्यांनी परमेश्वराची आज्ञा पाळण्याचे वचन दिले होते परंतु प्रत्यक्षात मात्र ते देवाच्या इच्छेविरुद्ध वागले होते. याऊलट जकातदार व कसबिणी (वेश्या) ह्यांनी आज्ञाभंगाचे जीवन स्वीकारलेले होते. मात्र नंतर त्यांना पश्चात्ताप झाला व ते नवजीवन जगू लागले. प्रभू येशू हा तिसरा मुलगा होय. त्याने "होय" म्हटले
आणि त्याप्रमाणे केले.

आत्मपरीक्षण : आपल्या जीवनात पहिला मुलगा (आज्ञाभंग), दुसरा मुलगा (पश्चात्ताप) आणि तिसरा मुलगा (आज्ञाधारकपणा) कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत ? आपली वाटचाल धार्मिकतेकडे (नवजीवन) सुरू आहे की दुष्टपणाकडे (विनाश) सुरू आहे ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तूच एकमेव मार्ग, सत्य आणि जीवन आहे. विश्वासाने, आम्ही तुला शरण येतो. आम्हा पापांवर दया कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या