Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Friday 27th october 2023| 29th week in ordinary Time |

 सामान्यकाळातील २९वा सप्ताह 

शुक्रवार २७ ऑक्टोबर २०२३

मी तुला सांगतो, पै न् पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस.. 
I tell you, you will never get out until you have paid the very last penny."
  ✝️ 




संत फ्रेमेन्शिअस

-महागुरू, वर्तनसाक्षी (३०८-३८०)

 आपल्या अंत:करणात दैहिक आणि आध्यात्मिक भावनांचे जणू युध्द सुरु असते. म्हणूनच संत पौल आपल्याला आठवण करून देत आहे की, देवाने त्याचा आत्मा आपल्यामध्ये घातला आहे. पवित्र आत्म्याची आराधना करुन जे चांगले, पवित्र आणि नैतिक त्याचा आपण स्वीकार करावा आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण आपले निर्णय घ्यावेत.
आपण जर योग्यप्रकारे येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी केली  नसेल तर आपला न्याय होणार आहे. जीवनात जे जे चांगले, न्याय, दैवी आणि पवित्र असेल त्याचा स्वीकार  करण्यासाठी देवाकडे सद्सद्विवेक बुध्दीची प्रेरणा मागू या.
आज आपण शरीराने, मनाने व आत्म्याने प्रभूला शरण जाऊ या. आपल्या संपूर्ण जीवनावर परमेश्वराला ताबा घेण्यासाठी विनंती करु या.. 




पहिले वाचन :रोम.  ७:१८-२५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

"मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?"

मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे ते मला साधत नाही. जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते.
तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी दुर्दैवी माणूस! ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून मला कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 7:18-25a

Brethren: know that nothing good dwells in me, that is, in my flesh For have the desire to do what is right, but not the ability to carry it out for do not do the good I want, but the evil I do not want is what I keep on doing Now i do what I do not want, it is no longer I who do it, but sin that dwells within me. So I find it to be a law that when I want to do right, evil lies close at hand. For I delight in the law of God, in my inner being, but I see in my members another law waging war against the law of my mind and making me captive to the law of sin that dwells in my members Wretched man that I am! Who will deliver me from this body of death? Thanks be to God through Jesus Christ our Lord!

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११९: ६६,६८,७६-७७
प्रतिसाद :   प्रभो, तुझे नियम मला शिकव. 

१) विवेकबुद्धी आणि ज्ञान मला दे,:
कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे.
तू चांगला आहेस, तू चांगले करतोस, 
तुझे नियम मला शिकव.

२) तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार 
तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे.
 माझ्यावर करुणा करा म्हणजे मी जगेन. 
कारण तुझे शास्त्र माझा पूर्णानंद आहे.

३) तुझे नियमशास्त्र मी कधीही विसरणार नाही, 
कारण तू त्यांच्याद्वारे मला नवजीवन दिले आहेस, 
मी तुझा आहे, माझे तारण कर, 
कारण मी तुझ्या नियमशास्त्राचा आश्रय घेतला आहे.

Psalm 119:66, 68, 76, 77, 93, 94 Teach me your statutes, O Lord.

Teach me good judgment and knowledge 
for I trust in your commands. R

You are good, and you do what is good: 
teach me your statutes. R

Let your merciful love console me 
by your promise to your servant. R 

Show me compassion, that I may live, 
for your law is my delight. R.

I will never forget your precepts, 
for with them you give me life. R

Save me, I am yours,
for I seek your precepts. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे,
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही
 आलेलुया!

Acclamation: 
  Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you to little children the mysteries of the kingdom. have revealed

शुभवर्तमान   लूक  १२:५४-५९
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तुम्हांला पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, मग या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही.'

येशू लोकसमुदायांना म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, पावसाची सर येत आहे आणि तसे घडते, दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल, असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हांस पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही ?
आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही ? तू आपल्या वादयाबरोबर न्यायाधीशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुगांत टाकील. मी तुला सांगतो, पै न् पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस..
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 12:54-59
At that time: Jesus said to the crowds, "When you see a cloud rising in the west, you say at once, 'A shower is coming; and so it happens. And when you see the south wind blowing, you say, 'There will be scorching heat', and it happens. You hypocrites! You know how to interpret the appearance of earth and sky, but why do you not know how to interpret the present time? "And why do you not judge for yourselves what is right? As you go with your accuser before the magistrate, make an effort to settle with him on the way, lest he drag you to the judge, and the judge hand you over to the officer, and the officer put you in prison. I tell you, you will never get out until you have paid the very last penny."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  आजच्या वाचनात प्रभू आपल्याला हृदय परीवर्तनाचा सल्ला देत आहे. समाजात आपल्याला दोन प्रकारचे लोक दिसून येतात. येशूच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवून त्यावर आधारीत जीवन जगणारे आणि येशूच्या शिकवणीमधून आपणांस सोयीस्कर आहे ते घेऊन दुसऱ्यावर दुर्लक्ष करणारे. येशूचा स्विकार करणे लोकांना कठीण जात नाही परंतु त्याची शिकवण आचरणात आणण्यास त्यांना कठीण जाते. यास्तव ते त्याच्या बरोबर वाद-विवाद घालतात म्हणून येशू त्यांच्या ढोंगीपणाचा निषेध करतो. कारण ते येशूमध्ये तारणाच्या इतिहासाचे क्षण पाहातात परंतु त्याच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्यात मिळणाऱ्या कृपेवर ते दुर्लक्ष करतात. म्हणून येशू त्यांना म्हणतो, “जर निसर्गातील बदल पाहून तुम्ही स्वतःच्या संरक्षणाची काळजी घेता तर सावध असा, याहून मोठे वादळ जीवनात येणार आहे. तुमच्या वर्तनामुळे तुम्हाला न्यायाधिशाकडे ओढून नेण्यात येईल म्हणून आपल्या वर्तनावर लक्ष द्या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, जे जीवनासाठी यथार्थ व पोषक ते स्वीकारण्यास व सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून राहण्यास प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️