Marathi Bible Reading | Thursday 26th october 2023| 29th week in ordinary Time |

 सामान्यकाळातील २९वा सप्ताह 

गुरुवार २६ ऑक्टोबर २०२३

“मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. 
"I came to cast fire on the earth, 
  ✝️ 



संत एव्हरेस्ट
- परमगुरू, रक्तसाक्षी (१०५

संत क्लेमेंट ह्या पोप महाशयांच्या मृत्यूनंतर एव्हरेस्ट ह्यांची पाचवे पोप म्हणून नेमणूक झाली. त्यांनी इ. स. ९७ ते १०५ दरम्यान ख्रिस्तमंडळाचे नेतृत्व केले. अंत्युखियामध्ये स्थायिक झालेल्या परंतु मूळच्या बेथलेहेम येथे असलेल्या एका यहुदी घराण्यात एव्हरेस्टचा जन्म झाला. त्याच्याविषयी फारच त्रोटक माहिती इतिहासात नोंदण्यात आलेली आहे.
सहाव्या शतकात "पोप महाशयांची यादी" या पुस्तकात लिहिण्यात आलेल्या
माहितीनुसार पोप एव्हरेस्ट ह्यांनी रोम शहराची २५ धर्मग्रामामध्ये विभागणी केली आणि प्रत्येक स्वतंत्र धर्मग्रामावर प्रत्येकी एक प्रमुख धर्मगुरू नेमला. “पोप महाशय जेव्हा अधिकृत परिपत्रकांची घोषणा करतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला देवाचा गौरव करण्यासाठी किमान सात डिकन (प्रसेवक) उपस्थित असावेत,” असाही नियम त्यांनी अंमलात आणला.
शेवटी त्यांनी चर्चच्या स्थापनेच्या आशीर्वादविधीची पुनर्रचना केली.
आतापर्यंत ख्रिस्ती चर्च आशीर्वाद विधी प्रेषितांकडून चालत आलेल्या शलमोनच्या यहुदी परंपरेनुसार केला जात होता. आता त्याला ख्रिस्ती स्वरूप देण्यात आले.
त्या विधीत पवित्र मिस्साला मुख्य स्थान देण्यात आले. ह्याच पोप महाशयांच्या
कारकीर्दीत एफसस येथे येशूचा जिवलग शिष्य शुभवर्तमानकार योहान ह्याला मृत्यू आला.



पहिले वाचन :रोम.  ६:१९-२३
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

तुम्ही पापापासून मुक्त झाल्यामुळे देवाचे गुलाम झाला आहा.

तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. जरी तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरिता अमंगळपण आणि स्वैराचार ह्यांना गुलाम म्हणून समर्पण केले होते पण आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा.
तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते त्यापासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे?त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 6:19-23

Brethren: I am speaking in human terms, because of your natural limitations. For just as you once presented your members as slaves to impurity and to lawlessness leading to more lawlessness, so now present your members as slaves to righteousness leading to sanctification. For when you were slaves of sin, you were free in regard to righteousness. But what fruit were you getting at that time from the things of which you are now ashamed? For the end of those things is death, But now that you have been set free from sin and have become slaves of God, the fruit you get leads to sanctification and its end, eternal life. For the wages of sin is death, but the free gift of God is eternal life in Christ Jesus our Lord.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : १-४,६
प्रतिसाद :  जो मनुष्य परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो तो धन्य !

१ ) जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही,
 पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि 
निंदकांच्या बैठकीत वसत नाही. 
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, 
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.

२) जर झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, 
जे आपल्याला हंगामी फळ देते, 
ज्याची पाने कोमेजत नाहीत, 
अशा झाडासारखा तो आहे आणि 
जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.

३ ) दुर्जन तसे नाहीत, 
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. 
कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, 
पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.


Psalm Psalm 1:1-2, 3, 4 and 6 

Blessed the man who has placed his trust in the Lord.

Blessed indeed is the man 
who follows not the counsel of the wicked, 
nor stands in the path with sinners, 
nor abides in the company of scorners,
 but whose delight is the law of the Lord, 
and who ponders his law day and night. R

He is like a tree that is planted
beside the flowing waters,
that yields its fruit in due season, 
and whose leaves shall never fade; 
and all that he does shall prosper. R.

Not so are the wicked, not so! 
For they, like winnowed chaff, 
shall be driven away by the wind.
 For the Lord knows the way of the just, 
but the way of the wicked will perish. R 


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
 आलेलुया!

Acclamation: 
  I count everything as loss because of the surpassing worth of knowing Christ Jesus my Lord and be found in him.

शुभवर्तमान   लूक  १२:४९-५३
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"येशू म्हणतो, मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी नव्हे तर फूट पाडण्यासाठी आलो आहे.”

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! मला स्नानसंस्कार घ्यायचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता देण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय? मी तुम्हांस सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास. आतापासून एका घरातील पाच जणांत दोघाविरुद्ध तिघे आणि तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सुन अशी फूट पडेल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 12:49-53
At that time: Jesus said to his disciples. "I came to cast fire on the earth, and would that it were already kindled! I have a baptism to be baptized with, and how great is my distress until it is accomplished! Do you think that have come to give peace on earth? No, I tell you, but rather division. For from now on in one house there will be five divided, three against two and two against three. They will be divided, father against son and son against father, mother against daughter and daughter against mother, mother-in-law against her daughter-in-law and daughter-in-law against mother-in-law."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  आज प्रभू आपल्याला आगीचे उदाहरण देत आहे. मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे. येशूच्या येण्यामुळे लोकांची दोन गटात विभागणी झाली. एक येशूला स्विकारणारे लोक व दुसरे त्याला नाकारणारे लोक. येशूला नाकारणाऱ्या लोकांसाठी ही आग म्हणजे “न्यायाचा अग्नी.” तर येशूला
 स्विकारणाऱ्या लोकांसाठी हा अग्नी शुद्ध करणारा, बल संपन्न करणारा, पवित्र आत्म्याचा अग्नी आहे व ख्रिस्त म्हणतो, ती आग आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! ख्रिस्ताची सुवार्ता आगीच्या वणव्यासारखी चौफेर पसरावी अशी त्याची इच्छा होती, त्याचे तारणाचे कार्य जगभर पसरावे असे
 त्याला वाटत आग पेटवली की ती आपोआप पसरत जाते. प्रभूच्या शिष्याच्या अंतःकरणात हा पवित्र आत्म्याचा अग्नी पेटवला गेला आणि तेव्हापासून आतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता वणव्यासारखी पसरत आहे. काही ठिकाणी त्याच्या ज्वाला तीव्र आहेत तर काही ठिकाणी ह्या ज्वाला आता पेट घेत आहेत. आधुनिक जगात प्रभू ख्रिस्त हा सुवार्तेची अग्नी पसरविण्यासाठी अनेकांना बोलावत आहे. ज्यांना प्रभूचा अनुभव आलेला आहे असे अख्रिस्ती बांधव ह्या कामात येशूच्या नावाने मनःपूर्वक कार्यरत आहेत.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझी वचने ग्रहण करण्यास व तुझ्या प्रकाशात खरे जीवन  आचरण करण्यास कृपा व प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या