सामान्यकाळातील २६वा सप्ताह
शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३
जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो .
"The one who hears you hears me, and the one who rejects you rejects me,
✝️
✝️ संत ब्रुनो
-मठाधिकारी, वर्तनसाक्षी (१०३५-११०१)
देवासाठी आपण जे युद्ध लढतो त्या युद्धातही जी मनःशांती असते, ती जगात कुठेही मिळत नाही.-संत ब्रुनो
देवाचा शब्द ऐकून तो आचारण आणण्यास आणि तो सर्वांपर्यंत पोहोचविण्यास प्रभू येशू आज आपल्याला आवाहन करीत आहे. समाजात आपल्याला कदाचित विरोध होईल, अडचणी येतील किंवा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. प्रभूची वचने आणि त्याची कृपा आपल्या सोबत आहे. प्रभूला आपण सर्वस्वी शरण जाऊ या आणि अंर्तमनाने त्याची वाणी ऐकू या.
पहिले वाचन :बारुख १:१५-२२
वाचक : बारुख या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आम्ही देवासमोर पाप करून त्याचा आज्ञाभंग केला आहे. "
न्यायाचा स्वामी आमचा देव परमेश्वर आहे, परंतु आज चालू असलेला गोधंळ आम्ही, यहुदाची माणसे, येरुशलेमचे सर्व रहिवाशी, आमचे राजे, आमचे राजपूत, आमचे याजक, आमचे संदेष्टे आणि आमचे पूर्वज यांच्यामुळे आहे. कारण आम्ही देवासमोर पाप करून त्याचा आज्ञाभंग केला. त्याच्या हाकेला प्रतिसाद न देता त्याने आम्हांला दाखवलेले मार्ग आम्ही झिडकारले, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने इजिप्त देशातून बाहेर आणल्यापासून आजपर्यंत आम्ही त्याचा आज्ञाभंग करून त्याच्या हाकेकडे दुर्लक्ष करत आलो आहोत. त्यामुळे इजिप्त देशातून बाहेर आणून आम्हाला दूध आणि मध यांनी वाहत असलेली भूमी देताना परमेश्वराने आमच्या पूर्वजांना त्याचा सेवक मोशे याच्याद्वारे ज्या आपत्ती आणि जे शाप जाहीर केले ते आजतागायत आम्हांला चिकटून बसले आहेत. आम्ही परमेश्वराने पाठवलेल्या संदेष्ट्यांच्या वचनांकडे कानाडोळा केला. आम्हांपैकी प्रत्येकाने स्वतः च्या मनातील दुष्ट हेतूंना अनुसरून अन्य देवांची सेवा केली आणि आपल्या प्रभू परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते आम्ही केले.
First Reading :Baruch 1:15-22
Righteousness belongs to the Lord our God, but shame, as at this day, to us, to the people of Judah, to the inhabitants of Jerusalem, and to our kings and our princes and our priests and our prophets and our fathers, because we have sinned before the Lord and have disobeyed him and have not heeded the voice of the Lord our God, to walk in the statutes of the Lord that he set before us. From the day when the Lord brought our fathers out of the land of Egypt until today, we have been disobedient to the Lord our God, and we have been negligent, in not heeding his voice. So to this day there have clung to us the calamities and the curse that the Lord declared through Moses his servant at the time when he brought our fathers out of the land of Egypt to give to us a land flowing with milk and honey. We did not heed the voice of the Lord our God in all the words of the prophets whom he sent to us. But we each followed the intent of his own wicked heart by serving other gods and doing what is evil in the sight of the Lord our God.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ७८: १ - २, ३-५, ८, ९
प्रतिसाद : तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हाला सहाय्य कर.
१ हे देवा, तुझ्या भूमीत परराष्ट्रे शिरली आहेत,
त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.
त्यांनी येरुशलेमचे ढिगारे केले आहेत,
त्यांनी आकाशातल्या पाखरांना तुझ्या सेवकांची प्रेते
आणि पृथ्वीवरील पशूंना तुझ्या भक्तांचे मांस खायला दिले आहे.
२ त्यांनी येरुशलेमभोवती त्यांचे रक्त पाण्यासारखे वाहविले,
त्यांना पुरायला कोणी राहिले नाही.
आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद
आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ
आणि हास्यास्पद झालो आहो.
हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार ?
तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय ?
तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय?
३ आमच्याविरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नकोस.
तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो,
कारण आम्ही फार आपत्तीत पडलो आहोत.
४ हे आमच्या उद्धारक देवा,
तू आपल्या नावाच्या गौरवासाठी आम्हांला सहाय्य कर.
आपल्या नावाकरिता आम्हांला सोडव
आणि आमची पापे धुऊन टाक.
Psalm 79:1-2, 3-5, 8, 9
R For the sake of the glory of your name, free us O Lord.
O God, the nations have invaded your heritage;
they have profaned your holy temple.
They have made Jerusalem a heap of ruins.
They have handed over the bodies
of your servants
as food to feed the birds of heaven,
and the flesh of your faithful
to the beasts of the earth. R
They have poured out their blood like water
round Jerusalem;
no one is left to bury the dead.R
We have become the taunt of our neighbours,
the mockery and scorn of those around us.
How long, O Lord? Will you be angry forever?
Will your jealous anger burn like fire?
Do not remember against us
the guilt of former times.
Let your compassion hasten to meet us;
for we have been brought very low. Ra
Help us, O God our saviour,
for the sake of the glory of your name.
Free us and forgive us our sins,
because of your name. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या
आलेलुया!
Acclamation:
Today, harden not your hearts but listen to the voice of the Lord.
शुभवर्तमान लूक १०:१३-१६
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
जो येशूचा अव्हेर करतो तो ज्याने त्याला पाठवले त्याचा अव्हेर करतो.
येशू म्हणाला, हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार ! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्हांमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चात्ताप केला असता. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन ह्यांना सोपे जाईल. हे कफर्णहूम, तू आकाशापर्यंत उच्चपदाला पोहोचशील काय ? तू अधोलोकापर्यंत उतरशील.
नंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 10:13-16
At that time: Jesus said, "Woe to you, Chorazin! Woe to you, Bethsaida! For if the mighty works done in you had been done in Tyre and Sidon, they would have repented long ago, sitting in sackcloth and ashes. But it will be more bearable in the judgment for Tyre and Sidon than for you. And you, Capernaum, will you be exalted to heaven? You shall be brought down to Hades. "The one who hears you hears me, and the one who rejects you rejects me, and the one who rejects me rejects him who sent me."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
एखाद्याचा मानवी स्वभाव हा आपल्या जीवनासाठी अडथळा असतो. आजच्या शुभवर्तमानात येशू बेथसैदा व खोराजिन शहराविषयी आपली अस्वस्था व्यक्त करतो. येशू निव्वळ प्रेमापोटी आपल्या लोकांपर्यंत पोहचून त्याच्या गरजेनुसार त्याच्या जीवनात कार्य करतो. तेच त्याने बेथसैदा व खोराजिना ह्या शहरातील लोकांसाठी केले. कुठेही केले नसतील एवढे चिन्ह, चमत्कार ह्या लोकांसाठी करूनही त्याच्या मनात कृतघ्नतेची भावना नव्हती.. प्रभूचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहचत नाही म्हणून ते प्रायश्चित्त साक्रामेतांवर विश्वास ठेवत नाहीत. येशूचा स्विकार करत नाहीत. यास्तव त्यांच्यामध्ये बदल होत नाही. प्रभू त्यांना आपले जीवन बदलण्यासाठी आमंत्रण देत आहे. मात्र ते येशूच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्यास तयार नाहीत. म्हणून येशू सोर व सिदोन यांच्याशी त्याची तुलना करून राग व्यक्त करत म्हणतो, “हे खोराजिना तुझी केवढी दुर्दशा होणार !!!” प्रभूचा हा संदेश आपल्या सर्वांसाठी आहे. रोजच्या दिनक्रमात गुंग असलेल्या आपल्या सर्वांना प्रभू आपल्या जीवनात करत असलेल्या चिन्ह, चमत्काराची जाणिव नसते किंबहुना आपण ते गृहीत धरतो व पश्चात्ताप करून प्रायश्चित्त साक्रामेंतावर विश्वास ठेवण्यास कमी पडतो. आज प्रभू आपल्याला सांगत आहे, माझ्या लेकरांनो तुमची दुर्दशा होवू नये म्हणून तुम्ही माझ्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपले जीवन बदला..
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वाणी एकेण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास ।आम्हाला बळ दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या