Marathi Bible Reading | Thursday 5th October 2023| 26th week in ordinary Time |

 सामान्यकाळातील २६वा सप्ताह 

गुरुवार ५ ऑक्टोबर २०२३



“पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. 

"The harvest is plentiful, but the labourers are few. Therefore pray earnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest.
  ✝️ 

 
 संत फॉस्टिना कोवाल्स्का

जन्म दि. २५ ऑगस्ट १९०५--- मृत्यू  दि. ५ ऑक्टोबर १९३ 

  ✝️ 

दैवी दयेच्या प्रेषिता व देवाच्या सेविका, संत फॉस्टिना कोवाल्स्का या “द सिस्टर्स ऑफ अवर मर्सी या संघाच्या सिस्टर” होत्या. त्यांचा जन्म दि. २५ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. दि. ५ ऑक्टोबर १९३८ रोजी त्या ख्रिस्तवासी झाल्या. त्या अत्यंत धार्मिक व भक्तिमान होत्या. प्रत्यक्ष ख्रिस्ताने त्यांना सन १९३१ ते १९३८ या काळापर्यंत वारंवार दर्शन देऊन पापक्षमेसाठी दैवी दयेचे महत्त्व, सामर्थ्य आणि दैवी दयेच्या आवश्यकतेविषयी सांगितले. “पाप्यांना व महापाप्यांना देवाच्या दयेसाठी आग्रहाने याचना करण्यास अजूनही संधी आहे म्हणून त्यांना देवाच्या दयेकडे वळविण्याचे आदेश ख्रिस्ताने सिस्टर फॉस्टिानांना दिले.

सिस्टर फॉस्टिनांना पवित्रतेबद्दल व धर्म कार्याबद्दल 'आदरणीय' म्हणून ७ मार्च १९९२ साली घोषित केले गेले. रोममध्ये पोप जॉन पॉल यांनी १८ एप्रिल १९९३ साली त्यांना 'धन्य म्हणून मान्यता दिली '. सन २००० च्या पास्कासणानंतरच्या रविवारी त्यांना ‘संत' म्हणून घोषित करण्यात आले. ख्रिस्ताने दिलेला आदेश सिस्टर फॉस्टिनांनी आपल्या डायरीत नमूद केलेला आहे. या आदेशाच्या आणि संदेशाच्या त्या जिवंत साक्षीदार झालेल्या आहेत.परमगुरूस्वामींनी दि. १५ एप्रिल १९७८ रोजी दैवी दयेच्या या भक्तिला मान्यता दिली आहे.

येशूने दैवी दयेविषयक दिलेले विशेष संदेश.

१. अत्यंत निष्ठेने माझ्या दयेकडे वळल्याशिवाय मानवजातीला शांती मिळणार नाही.

२. माझ्या दयाळू हृदयापाशी आल्याशिवाय मानव जातीला शांती व समाधान मिळणार नाही.

३. तसेच जो आत्मा माझ्या दयेची याचना करील तो मला अपार आनंद देईल. माझ्याकडे दयेची व सहानुभूतिची याचना करणाऱ्या आत्म्यावर, तो कितीही महापापी असला तरी मी त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक कृपा करीन. त्याला शिक्षा करणार नाही.

येशू म्हणाला, अखिल जगाला माझ्या दयेची जाणीव व्हावी अशी माझी फार इच्छा आहे. माझ्या दयेवर अवलंबून राहणाऱ्यांवर मी अपार दया करतो. मी साक्षात दया व प्रेम आहे. माझी ही दया अक्षय सागर आहे.. कोणत्याही पाप्याने माझ्यापाशी यावयास भिऊ नये. पापी माणसाचा माझ्यावरील अविश्वास माझे हृदय घायाळ करतो.” जे धर्मगुरू माझ्या दयेचा प्रसार करून तिची स्तुती करतील; त्यांचे शब्द, अभिषिक्त करीन व ते सांगतील त्या हृदयांना स्पर्श करीन.

✝️
पहिले वाचन :नहेम्या  ८:१-४अ.५-६.७ब-१२

वाचक :नहेम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन ८:१-४अ.५-६.७ब-१२

“एजाने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडून लोकांना आशीर्वाद दिला आणि सर्व लोकांनी 'आमेन, आमेन', असे म्हटले."

सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले आणि एज्रा शास्त्री याला म्हणाले, परमेश्वराने इस्राएल लोकांना दिलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्रीपुरूषांपुढे आणि ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वापुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशी समोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे आणि ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला. एज्जाने उभा राहून तो ग्रंथ उघडला, तेव्हा एज्रा सर्वांना दिसला, कारण तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर ह्याला धन्यवाद दिला आणि सर्व लोकांनी आपले हात वर करून 'आमेन, आमेन,' असे म्हटले आणि आपली डोकी लपवून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वराला प्रणाम केला. लेवीसुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते आणि लोक आपल्या स्थानी उभे होते. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला, वाचले तेवढे लोकांना चांगले समजले.

मग नहेम्या प्रांताधिपती, एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, "हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका, रडू नका." कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टात्राचे • जेवण करा, गोडगोड पेय घ्या आणि ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय, " "शांत राहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे, दुःख करू    नका,” असे म्हणून लेव्यांनी लोकांना शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यासाठी, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यासाठी आणि मोठा उत्सव करण्यासाठी निघून गेले, कारण जी वचने वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती.

प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Nehemiah 8:1-4a, 5-6, 7b-12

those days: All the people gathered as one man into the square before the Water Gate. And they told Ezra the scribe to bring the Book of the Law of Moses that the Lord had commanded Israel. So Ezra the priest brought the Law before the assembly, both men and women and all who could understand what they heard, on the first day of the seventh month. And he read from it facing the square before the Water Gate from early morning until midday, in the presence of the men and the women and those who could understand. And the ears of all the people were attentive to the Book of the Law, And Ezra the scribe stood on a wooden platform that they had made for the purpose. And Ezra opened the book in the sight of all the people, for he was above all the people, and as he opened it all the people stood. And Ezra blessed the Lord, the great God, and all the people answered, "Amen, Amen," lifting up their hands. And they bowed their heads and worshipped the Lord with their faces to the ground. The Levites, helped the people to understand the Law, while the people remained in their places. They read from the book, from the Law of God, clearly, and they gave the meaning, so that the people understood the reading. And Nehemiah, who was the governor, and Ezra the priest and scribe, and the Levites who taught the people said to all the people, "This day is holy to the Lord your God; do not mourn or weep." For all the people wept as they heard the words of the Law. Then he said to them, "Go on your way. Eat the fat and drink sweet wine and send portions to anyone who has nothing ready, for this day is holy to our Lord. And do not be grieved, for the joy of the Lord is your strength. So the Levites calmed all the people, saying, "Be quiet, for this day is holy; do not be grieved." And all the people went on their way to eat and drink and to send portions and to make great rejoicing, because they had understood the words that were declared to them.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र१९:८-११

प्रतिसाद :   परमेश्वराचे नियम सरळ आहेत

१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, 
ते मनाचे पुनरुज्जीवन करते, 
परमेश्वराचा बोध विश्वसनीय आहे, 
तो भोळ्यांना समंजस करतो.

२) परमेश्वराचे नियम सरळ आहेत, 
ते हृदयाला आनंदित करतात, 
परमेश्वराची आज्ञा चोख आहे, 
ती नेत्रांना प्रकाश देते.

३) परमेश्वराचे भय शुद्ध आहे, 
ते सर्वकाळ टिकणारे आहे. 
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत.
 ते सर्वथैव न्याय्य आहेत.

४) ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या
 राशीपेक्षा इष्ट आहेत, 
ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या
 मधापेक्षा गोड आहेत.


Psalm 19:8, 9, 10, 11

The precepts of the Lord are right; 
they gladden the heart. 

The law of the Lord is perfect;
it revives the soul. 
The decrees of the Lord are steadfast;
they give wisdom to the simple. R

The precepts of the Lord are right; 
they gladden the heart.
The command of the Lord is clear;
it gives light to the eyes. R

The fear of the Lord is pure,
abiding forever. 
The judgments of the Lord are true;
they are, all of them, just. R. 

They a are more to be desired than gold,
than quantities of gold. 
And sweeter are they than honey, 
than honey flowing from the comb. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, 
मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!

Acclamation: 
The kingdom of God is at hand; repent, and believe in the Gospel.

शुभवर्तमान   लूक १०:१-१२ 
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तुमची शांती त्याच्यावर राहील."
प्रभूने आणखी बहात्तरजणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे, पाहा, पैशाची थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ह्या घरात शांती असो, असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हांकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत रहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा, त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणाः आमच्या पायांस लागलेली तुमच्या गावची धूळ देखील तुमची तुम्हांस झाडून टाकतो,” तथापि हे लक्षात ठेवा की, "देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमला त्या दिवशी सोपे जाईल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 10:1-12

At that time: The Lord appointed seventy-two others and sent them on ahead of him, two by two, into every town and place where he himself was about to go. And he said to them, "The harvest is plentiful, but the labourers are few. Therefore pray earnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest. Go your way; behold, I am sending you out as lambs in the midst of wolves. Carry no money bag, no knapsack, no sandals, and greet no one on the road. Whatever house you enter, first say, "Peace be to this house!" And if a son of peace is there, your peace will rest upon him. But if not, it will return to you. And remain in the same house, eating and drinking what they provide, for the labourer deserves his wages. Do not go from house to house. Whenever you enter a town and they receive you, eat what is set before you. Heal the sick in it and say to them, The kingdom of God has come near to you.' But whenever you enter a town and they do not receive you, go into its streets and say, 'Even the dust of your town that clings to our feet we wipe off against you. Nevertheless know this, that the kingdom of God has come near." I tell you, it will be more bearable on that day for Sodom than for that town.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
"संपूर्ण सृष्टी प्रभूची आहे त्यामध्ये आपण त्याचे निवडलेले लोक त्याच्या स्वर्गीय राज्याची घोषणा करण्यासाठी आहोत." आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू आपली निवड ह्या विषयी सांगत आहे. प्रभू म्हणतो, Be smart because you are mine. "मी कोकरा सारखा पिलाता समोर उभा होतो. तुम्ही माझे निवडलेले माझ्या नावाने जात आहेत. तुम्हाला देखिल लांडग्यासमोर कोकरा सारखे उभे रहावे लागेल." हे लक्षात असू दे. पिलातासमोर प्रभूने आपल्या वर्तनात बदल केला नाही, लांडग्यासमोर उभे असताना कोकराला कमीपणा घ्यावा लागतो. कारण लांडगे कोकरापेक्षा शक्तीने श्रेष्ठ असतात. जाताना बरोबर काही घेऊ नका तर माझी शिकवण व माझे वचन तुमच्या कार्यासाठी पुरेसे आहे. लोकांना भूक आहे, गरज आहे. ती फक्त माझ्या वचनाची ज्यामध्ये सामर्थ्य आहे; तारण आहे, जीवन आहे. युक्रेनमधील लोकांना युद्धाला तोंड देत असताना, त्याच्या संरक्षणासाठी फक्त बायबल पुरेसे होते. ह्या संकटसमयी आम्ही निराधार असताना प्रभूचे वचन जे काही सांगेल ते आम्ही करू त्यातच आमचे तारण आहे, असे ते म्हणत. त्यावेळी त्यांना बायबल कमी पडली. म्हणून तुम्ही माझ्या नावाने जाताना बरोबर काही घेवू नका, तर माझे वचन तुमच्या मुखी असू द्या. तुम्ही सर्वस्वी माझ्यावर अवलंबून रहा. मी तुम्हाला निवडले आहे व पाठवत आहे. तुम्ही करत असलेले कार्य तुमचे नसून माझे आहे. तुमच्या कार्याद्वारे स्वर्गराज्याची घोषणा होवू दे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या वाणीद्वारे व कृतीद्वारे तुझी सुवार्ता सर्वांपर्यंत  पोहोचविण्यास आम्हाला शक्ती व कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या