सामान्यकाळातील २६वा सप्ताह
बुधवार ४ ऑक्टोबर २०२३
“जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही."
"No one who puts his hand to the plough and looks back is fit for the kingdom of God."
✝️
✝️
असिसीचे संत फ्रान्सिस
- वर्तनसाक्षी (११८२-१२२६)
इटली येथील असिसी गावात एका कपड्यांच्या व्यापाऱ्याच्या घरी फ्रान्सिस्कोचा इ. स. ११८२ साली जन्म झाला. फ्रान्सिस्कोच्या जीवनाची पहिली वीस वर्षे ख्याली खुशाली, चैनबाजी आणि ऐषारामामध्ये गेली. फ्रान्सिस्को अतिशय देखणा तरुण होता. शेजारी असलेल्या पेरुजिया देशाबरोबर झालेल्या युद्धात फ्रान्सिस्को युद्धकैदी म्हणून पकडला गेला. एक वर्ष त्याला तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगातून परतल्यानंतर तो बरेच महिने तापाने फणफणत होता. आपण ज्या प्रकारचे जीवन जगत आहोत ते किती अर्थहीन आहे ह्याची जाणीव त्याला ह्या आजारपणात झाली.
आतापर्यंत जे जीवन त्याने वाया घालविले होते त्याच्या बदली आता तो अधिक पवित्र जीवन जगू लागला. गरिबांची विशेषत: महारोग्यांची सेवा करणे, एकांतात प्रार्थना करणे. चिंतन-मनन आणि प्रायश्चित्त करणे अशा गोष्टी तो करू लागला. तो म्हणत असे "गोरगरिबांची सेवा हीच ख्रिस्ताची सेवा होय.”
एके दिवशी संत डेमियन चर्चमध्ये प्रार्थना करताना क्रुसावरील येशूने त्याला आज्ञा केली “खचत चाललेलं माझं घर दुरूस्त कर." ख्रिस्ताचे हे शब्द शब्दश: घेऊन फ्रान्सिस्को चर्चची डागडुजी करण्यासाठी आवश्यक असलेले दगड जमा करू लागला. त्यासाठी दारोदारी हिंडून भीक मागू लागला. ज्या मुलाविषयी आपल्या खूप मोठ्या आशा अपेक्षा आहेत, तोच आपला मुलगा अशा प्रकारचे लाजिरवाणे जिणे जगत असलेला पाहून त्याचे वडील संतापले आणि त्यांनी सर्वासमक्ष त्याला घराबाहेर हाकलून दिले.
फ्रान्सिसने आपल्या घरादारावर, धन-संपत्तीवर आनंदाने पाणी सोडले आणि तो संन्यासी होऊन गरिबातले गरीब जीवन जगू लागला. ह्यावेळी त्याचे वय अवघे २७ वर्षांचे होते. तो स्वत: ख्रिस्तशिष्य म्हणून जिकडे तिकडे देवराज्याची घोषणा करू लागला. भावाभावांमध्ये प्रेमाचे नाते जोडले जावे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये शांतीचे वातावरण नांदावे म्हणून तो लोकांना उपदेश करीत फिरू लागला. हे सर्व तो इतक्या तळमळीने आणि साधेपणाने करीत असे की प्रारंभी जे लोक त्याचा तिरस्कार करीत होते ते आता आश्चर्याने थक्क झाले.
हळूहळू त्याच्याभोवती समविचारी लोक जमा होऊ लागले. शहरातील महत्त्वाची पदे व जबाबदाऱ्या सांभाळणारे त्याचे अनुयायी बनले. त्यांनी आपले होते नव्हते ते विकून टाकले आणि त्यांची मालमत्ता गोरगरिबांना वाटून टाकली.जेव्हा अशा लोकांची संख्या बारावर गेली तेव्हा फ्रान्सिस्को त्यावेळचे पोप इनोसेंट तिसरे ह्यांच्याकडे रोम येथे गेले आणि आपणाला अशाप्रकारे देवराज्याची सुवार्ता पसरविण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्याने पोपमहाशयांना केली. धर्मगुरुपदाविषयी त्याला खूप आदर होता. परंतु तरीही नम्रतेपोटी त्याने डिकन (उपधर्मगुरू) राहून कार्य करण्याचे ठरविले. अशा प्रकारे तृतीय श्रेणीतील धर्मबंधूंच्या संस्थेचा (Third Order Lay Apostolate ) पाया रचिला गेला.
फ्रान्सिसने स्थापन केलेल्या संस्थेचा प्रचार इतका झपाट्याने झाला की १२१९ साली असिसी येथे भरलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेला ५,००० अनुयायी (Friars) एकत्र आले होते. त्यांच्या प्रवचनांचा लोकांवर खूप प्रभाव होताना दिसत होता. स्थानिक भाषा, दररोजच्या जीवनातील उदाहरणे, प्रेमाने ओतप्रोत भरलेली रसाळ व नैतिक जीवनावरील प्रवचने अनेकांना आकर्षून घेऊ लागली.
सदा प्रसन्न परंतु तितकाच नम्र असलेल्या संत फ्रान्सिसने आपल्या प्रेषितीय प्रवासात इटली, दक्षिण फ्रान्स आणि स्पेन येथे बरेच वाद मिटविले. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे असंख्य पापी लोक देवाकडे आले. सोबत सर्वसमावेशक सहानुभूती तर होतीच. ज्यांना धर्मगुरू न होता देवाचं कार्य करायचं होतं त्यांच्यासाठी फ्रान्सिसने १२२१ साली 'तृतीय श्रेणी' ची स्थापना केली. ह्या श्रेणीतील सभासद निरासक्त, वचनबद्ध आणि राजकारणापासून अलिप्त राहात असत.
फ्रान्सिसचे पावित्र्य तर आता इतके पराकोटीला पोहोचलेले होते की इ. स. १२२६ साली त्याच्या शरीरावर येशूचे पाच पवित्र घाय (जखमा) दिसू लागले. त्यावेळी त्याचे वय अवघे ४४ वर्षे होते. शेवटी ४ ऑक्टो. १२२६ साली फ्रान्सिस मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन वर्षांत त्याला संतपद देण्यात आले. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय संत म्हणून त्याची ख्याती आहे.संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचे निसर्गावर नितांत प्रेम होते. त्यांचे सूर्यस्तोत्र खूप प्रसिद्ध आहे. इ.स. १२१२ साली त्यांनी येशू जन्माची महती वर्णन करणारा गाईचा गोठा तयार केला. त्यामध्ये सर्व जिवंत पात्रे त्याने सादर केली. तेव्हापासून गाईचे गोठे नाताळला तयार करण्यात येतात. हे प्रभो, मला तुझ्या शांतीचा दूत बनव' ही त्यांची प्रार्थना जगप्रसिद्ध आहे.
चिंतन : दारिद्र्य हा स्वर्गाकडे जाणारा मार्ग आहे आणि परिपूर्णतेचे मूळ आहे. - संत फ्रान्सिस असिसीकर ■■
ख्रिस्तसभा आज संत फ्रान्सिस आसिसीचा सन्मान करीत आहेत. सर्वस्वी गरिबांसाठी सेवाकार्य करणाऱ्या संत फ्रान्सिस चे जीवन अत्यंत साधे, नम्र व पवित्र होते. त्याने असंख्य लोकांना ख्रिस्ताकडे आणले. त्याचा आदर्श ठेवून आपण प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी प्रेरणा घेऊ या.
✝️
पहिले वाचन :नहेम्या २:१-८
वाचक :नहेम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
"महाराजांची मर्जी असली तर माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगराला मला पाठवा म्हणजे मी ते बांधीन."
अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेवलेला होता तो मी उचलून राजाला दिला. यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, “तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे ? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे." तेव्हा मी फार भ्यालो. मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत !” माझ्या वाडवडिलांच्या कबरी जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरावयाचे नाही ? राजाने मला विचारले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करून राजाला म्हटले, “महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी, माझ्या पूर्वजांच्या कबरी असलेल्या नगरालामला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन.” (राजाजवळ राणी बसली असता) राजा मला म्हणाला, “तुझ्या प्रवासाला किती दिवस लागतील आणि तू केव्हा परत येशील ?” नंतर तू मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले आणि मी मुदत ठरवून त्याला कळवली. मग मी राजाला म्हणालो, “महाराजाच्या मर्जीस आल्यास मी यहुदा देशी पोहोचेपर्यंत महानदीच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथला अधिपती आसाफ यास असे पत्र द्यावे, मंदिराच्या गढीच्या दरवाजासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी तुळ्या काढण्यासाठी त्याने मला लाकडे दयावी.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Nehemiah 2:1-8:
In the month of Nisan, in the twentieth year of King Artaxerxes, when wine was before him, I, Nehemiah, took up the wine and gave it to the king. Now I had not been sad in his presence. And the king said to me, "Why is your face sad, seeing you are not sick? This is nothing but sadness of the heart." Then I was very much afraid. I said to the king, "Let the king live for ever! Why should not my face be sad, when the city, the place of my fathers' graves, lies in ruins, and its gates have been destroyed by fire?" Then the king said to me, "What are you requesting?" So prayed to the God of heaven. And said to the king, "If it pleases the king, and if your servant has found favour in your sight, that you send me to Judah, to the city of my fathers' graves, that I may rebuild it." And the king said to me (the queen sitting beside him), "How long will you be gone, and when will you return?" So it pleased the king to send me when I had given him a time. And I said to the king, "If it pleases the king, let letters be given to me for the governors of the province Beyond the River, that they may let me pass through until I come to Judah, and a letter to Asaph, the keeper of the king's forest, that he may give me timber to make beams for the gates of the fortress of the temple, and for the wall of the city, and for the house that shall occupy." And the king granted me what I asked, for the good hand of my God was upon me.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १३६:१- २,३,४-५,६
प्रतिसाद : जर मी तुझी आठवण ठेवली नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
१ बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो,
तेथे आम्हांला सियोनची आठवण झाली,
तेव्हा आम्ही रडलो. तेथील वाळुजांच्या फांद्यांवर
आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या.
२ कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी
आम्हांला गाणी गावयाला सांगितले,
आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हांला
त्याची करमणूक करावयाला सांगितले,
ते म्हणाले, आम्हांला सियोनचे एखादे
गाणे गाऊन दाखवा.
३. आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे ?
हे येरुशलेम, जर मी तुला विसरलो तर
माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
४ जर मी तुझी आठवण ठेवली नही,
जर मी येरुशलेमला माझ्या आनंदाच्या मुख्य
विषयाहून अधिक मानले नाही,
तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
Psalm 137:1-2, 3, 4-5, 6
O let my tongue cleave to my palate if I remember you not.
By the rivers of Babylon
there we sat and wept,
remembering Sion;
on the poplars that grew there
we hung up our harps. R
For it was there that they asked us,
our captors, for songs,
our oppressors, for joy.
"Sing to us," they said,
"one of Sion's songs." R.
O how could we sing
The song of the Lord
on foreign soil?
If I forget you, Jerusalem,
let my right hand wither! R
O let my tongue
cleave to my palate
if I remember you not
if I prize not Jerusalem
as the first of my joys! R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर,
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
आलेलुया!
Acclamation:
I count everything as loss, because of the surpassing worth of knowing Christ Jesus my Lord and be found in him.
शुभवर्तमान लूक ९:५७-६२
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"प्रभो, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन."
येशू आणि त्याचे शिष्य वाटेने चालत असता कोणाएकाने त्याला म्हटले, "आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.” त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये.” परंतु तो म्हणाला, "प्रभो, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ दया.” तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर." मग आणखी एकाने म्हटले, “प्रभो, मी आपल्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ दया.” येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 9:57-62:
At that time: As Jesus and his disciples were going along the road, someone said to him, "I will follow you wherever you go." And Jesus said to him, "Foxes have holes, and birds of the air have nests, but the Son of Man has nowhere to lay his head." To another he said, "Follow me." But he said, "Lord, let me first go and bury my father." And Jesus said to him, "Leave the dead to bury their own dead. But as for you, go and proclaim the kingdom of God." Yet another said, "I will follow you, Lord, but let me first say farewell to those at my home." Jesus said to him, "No one who puts his hand to the plough and looks back is fit for the kingdom of God."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
येशू सर्वकाही सोडून भटक्या भिक्षुकासमान भ्रमंतीवर अंतिम ध्येय गाठण्याच्या उद्देशाने जेरूसलेमच्या दिशेस निघाला असता, रस्त्यात त्याची भेट तीन व्यक्तींशी होते. पहिला प्रभूचे कार्य पाहून अतिउत्साही व प्रभूच्या मागे जाऊ इच्छितो. मात्र त्याला म्हणतो, भल्या भक्ता सारी सृष्टी जरी माझी असली तरी, मनुष्याच्या पुत्राला कुठेच आश्रय नाही. आहे का तुझी तयारी माझ्या मागे येण्याची? शिष्यत्वासाठी वृत्ती महत्त्वाची आहे. येशू दुसऱ्या व्यक्तिला म्हणतो, “देव राज्याची घोषणा हे शिष्य होऊ इच्छिणाऱ्याच प्रथम ध्येय असावे.” “प्रभूजी” नावाने संबोधिणाऱ्या तिसऱ्या व्यक्तिला येशू म्हणतो, “देवाच्या राज्याचा शिष्य होऊ इच्छिणाऱ्याने कोणत्याही गोष्टीवरून विचलीत होऊ नये. एकाग्रता शिष्यत्वासाठी आवश्यक गुण आहे.” ह्या तिन्ही उदाहरणावरून प्रभू आपल्याला सांगू इच्छितो की, एखाद्या गोष्टीसाठी आपली निवड झाली की, त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहण्यासाठी आवश्यक असलेला त्याग करण्याची आपली तयारी असायला हवी. माझ्या जीवनात ज्या गोष्टीसाठी माझी निवड झाली आहे त्यासाठी मला कोणता त्याग करण्याची गरज आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या शांतीचा दूत बनवू तुझी साक्ष जगाला देण्यास। 'आम्हाला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या