सामान्यकाळातील २६वा सप्ताह
मंगळवार ३ ऑक्टोबर २०२३
कारण त्याचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता.
because his face was set towards Jerusalem.
संत थिओडोर गुइरीन चा सण
येरुशलेम ही पवित्र भूमि असून त्या ठिकाणी इस्त्राएलच्या तारणाचा इतिहास घडला आहे. प्रभू येशू यज्ञबली अर्पण करण्याच्या उद्देशाने यरुशलेमेस जाण्यास निघाला ह्याचा वृतांत आजच्या शुभवर्तमानात सांगितला आहे. शुभवर्तमान म्हणते की, 'प्रभू येशूचा गौरव होण्याची वेळ जवळ आली असता येशू येरुशलेमेस जाण्यास निघाला.' प्रभू येशूच येरुशलेमचा जिर्णोद्धार करणारा होता. येरुशलेमचे पवित्र मंदिर शास्त्री, परुशी आणि याजकगणांनी बाजारपेठ बनविली होती. देवाचे पवित्र मंदिर प्रार्थना साठी आणि उपासनांसाठी असते त्याचे पावित्र्य भ्रष्ट झाले होते. अशा प्रसंगी प्रभू येशूचे यरुशलेमेस जाणे यथायोग्य होते.
आपण सुद्धा देवाचा अनुग्रह मागण्यास आणि बलिदानात सहभागी होण्यास प्रभूच्या पवित्र मंदिरात येत असतो.
✝️
पहिले वाचन :जखऱ्या ८ :२०-२३
वाचक :जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पुष्कळ लोक येरुशलेमाला परमेश्वराच्या चरणी येतील."
सेनाधीश परमेश्वर म्हणतो: “राष्ट्र आणि अनेक नगरांचे रहिवासी येतील अशी वेळ येईल, एका नगराचे रहिवासी दुसऱ्या नगरात जाऊन म्हणतील, आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू आणि सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू, मीही जातो. पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे येरुशलेमात सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास आणि परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हांबरोबर येतो, कारण देव तुम्हांबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे."
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Zechariah 8:20-23
"Thus says the Lord of hosts: Peoples shall yet come, even the inhabitants of many cities. The inhabitants of one city shall go to another, saying, 'Let us go at once to entreat the favour of the Lord, and to seek the Lord of hosts; myself am going. Many peoples and strong nations shall come to seek the Lord of hosts in Jerusalem and to entreat the favour of the Lord. Thus says the Lord of hosts: In those days ten men from the nations of every tongue shall take hold of the robe of a Jew, saying, 'Let us go with you, for we have heard that God is with you.""
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८७:१-७
प्रतिसाद : परमेश्वर आम्हाबरोबर आहे.
१) परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतावर आहे
याकोबच्या सर्व वसतिस्थानांहून सियोनची द्वारे
त्याला अधिक प्रिय आहेत.
हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगितल्या जातात.
२) राहाब आणि बाबेल मला ओळखतात
असे मी जाहीर करीन.
पाहा, पलेशेथ, सोर आणि कुश म्हणतात,
ह्याचा जन्म तेथलाच. सियोनविषयी म्हणतील की,
हा आणि तो तिच्यातच जन्मले होते.
३) परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
लोकांची नावनिशी करताना ह्यांचा जन्म तेथलाच,
असे परमेश्वर लिहील,
गायन आणि नृत्य करणारे म्हणतीलः
माझे सर्व उगम तुझ्याच ठायी आहेत.
Psalm 87:1-3, 4-5, 6-7
R. God is with us.
Founded by him on the holy mountain,
the Lord loves the gates of Sion,
more than all the dwellings of Jacob.
Of you are told glorious things,
you, O city of God! R
"Rahab and Babylon I will count
among those who know me;
of Tyre, Philistia, Ethiopia, it is told,
'There was this one born.
But of Sion it shall be said,
"Each one was born in her."
He, the Most High, established it.R
I In his register of peoples the Lord writes,
"Here was this one born."
The singers cry out in chorus,
"In you, all find their home. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला
आनंदीत करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात.
आलेलुया!
Acclamation:
The Son of Man came not to be served but to serve, and to give his life as a ransom for many.
.
शुभवर्तमान लूक ९:५१-५६
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता. "
येशूला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने येरुशलेमला जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी शोमरोन्यांच्या एका गावात गेले, पण त्यांनी स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब आणि योहान म्हणाले, “प्रभो, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय ?” त्याने वळून त्यांना धमकावले. मग ते दुसऱ्या गावात गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 9:51-56
When the days drew near for Jesus to be taken up, he set his face to go to Jerusalem. And he sent messengers ahead of him, who went and entered a village of the Samaritans, to make preparations for him. But other people did not receive him, because his face was set towards Jerusalem. And when his disciples James and John saw it, they said, "Lord, do you want us to tell fire to come down from heaven and consume them?" But he turned and rebuked them. And they went on to another village.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
"आपण शाप दिल्याने आपली दैवी शक्ती ढळते.” येशू लोकांच्या तारणासाठी जेरुसलेमच्या वाटेत असताना शोमरोनी लोकांच्या विरोधाला कंटाळून त्याच्याबरोबर असलेले दोन शिष्य याकोब व योहान यांच्या मनात मानवी स्वभावानुसार सूड बुद्धीची भावना निर्माण झाली. एकीकडे येशूच्या हृदयात असलेले लोकांविषयी प्रेम व पित्याकडून त्याला मिळालेली लोकांच्या तारणांची आज्ञा. तर दुसरीकडे त्याच्याबरोबर असलेल्या शिष्यांच्या मनात असलेली खूनी वृत्ती. शिष्य येशूबरोबर असूनही त्यांना येशूच्या प्रेमाची व कार्याची जाणीव नव्हती, ह्यास्तव, त्यांच्यावर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्यांचा नाश व्हावा असे त्यानी येशूला सुचवले. मात्र येशू त्यांना असे म्हणून त्यांची कान उघडणी करतो की, “स्वर्गातून अग्नी यावा असे न म्हणता, स्वर्गातून कृपा यावी असे म्हणायला हवे.” शिष्य, प्रिती व क्षमेमध्ये कमी पडले. प्रभूने त्यांना आपल्या वृत्तीची जाणीव करून दिली. तुमची वृत्ती कशी आहे ? तुमच्यामध्ये कोणता आत्मा कार्यरत आहे? दुष्ट आत्मा की “पवित्र आत्मा”. ईश्वराचा पुत्र मनुष्याच्या जीवनाचा नाश करावयास नव्हे तर त्यांचे तारण करावयास आला आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करण्यास व तुझी परस्पर प्रीतिची आज्ञा पाळण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या