सामान्यकाळातील २८वा सप्ताह
शनिवार २१ ऑक्टोबर २०२३
“तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकविल."
for the Holy Spirit will teach you in that very hour what you ought to say."
✝️
सांप्रत युगात जीवन जगत असताना येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाता यावे म्हणून प्रभू येशू आपल्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची जाणीव करुन देत आहे. श्रद्धेच्या इतिहासात सुरुवातीच्या काळापासून ख्रिस्ती श्रद्धावंतांचा शारीरिक व मानसिक छळ झाला अनेकांना आपले प्राण गमावावे लागले, मात्र ते सुवार्तेचे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त साक्षी बनले. आज अनेक ठिकाणी ख्रिस्त मंदिरांवर आणि ख्रिस्ती जनांवर हल्ले होत आहेत अशा प्रसंगी विश्वासात टिकून राहणाऱ्यांना पवित्र आत्माच मार्गदर्शन करीत असल्याचे आपण पाहतो. आपल्या ख्रिस्ती श्रद्धेच्या प्रवासात अशा प्रकारची अनेक संकटे, वादळे व भूकंप येऊ शकतात.|
आपल्या सर्वांना श्रद्धेत टिकून राहण्यासाठी व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा व सामर्थ्य लाभावे, व पवित्र आत्म्यानुसार आपले जीवन आपण जगावे म्हणून प्रभूची व पवित्र आत्म्याची आराधना करु या.
पहिले वाचन : रोमकरांस ४:१३. १६-१८
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन
" आब्राहामने श्रद्धा ठेवली, आशेला कारण नसताही त्याने आशा बाळगली.”
आब्राहामचे आचरण धर्मशास्त्रानुसार होते म्हणून नव्हे,पण त्याच्या श्रद्धेमुळे तो नीतिमान ठरला म्हणून, सारे जग त्याचेच होईल असे अभिवचन त्याला व त्याच्या वंशजांना देण्यात आले होते.
तेव्हा आब्राहामच्या साऱ्या वंशजांना म्हणजे केवळ धर्मशास्त्राप्रमाणे वागणारांनाच नव्हे पण आब्राहामप्रमाणे ज्यांची श्रद्धा आहे त्यांनाही हे अभिवचन मेहेरबानीदाखल खात्रीने मिळावे म्हणून ते श्रद्धेवर आधारलेले आहे, कारण आब्राहाम आपणा सर्वांचा पिता आहे. त्याच्याविषयी धर्मशास्त्रात लिहिले आहे, “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.” जो मृतांना जिवंत करतो व अस्तित्वात नसेल ते आपल्या आज्ञेसरशी अस्तित्वात आणतो, अशा देवावर त्याची श्रद्धा होती. आब्राहामने श्रद्धा ठेवली, आशेला कारणही नसताना आशा बाळगली, त्याच्याविषयी सांगण्यात आले होते, “इतके तुझे वंशज होतील" म्हणूनच तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Romans 4:13, 16-18
Brethren: The promise to Abraham and his offspring that he would be heir of the world did not come through the law but through the righteousness of faith. That is why it depends on faith, in order that the promise may rest on grace and be guaranteed to all his offspring-not only to the adherent of the law but also to the one who shares the faith of Abraham, who is the father of us all, as it is written, "I have made you the father of many nations-in the presence of the God in whom he believed, who gives life to the dead and calls into existence the things that do not exist. In hope he believed against hope, that he should become the father of many nations, as he had been told, "So shall your offspring be."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०५:६-७,८- ९,४२-४३
प्रतिसाद : प्रभू आपल्या कराराची सर्वकाळ आठवण ठेवतो.
१ त्याचा सेवक आब्राहाम ह्याचे वंशजहो,
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो,
तो प्रभू आमचा देव आहे.
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.
२ तो आपला करार सर्वकाळ आठवतो,
म्हणजे हजारो पिढ्यांसाठी दिलेले अभिवचन पाळतो,
तो करार त्याने आब्राहामशी केला,
तो पाळण्याची इसहाकजवळ शपथ घेतली.
३ कारण आपला सेवक आब्राहाम याला दिलेल्या
पवित्र अभिवचनाची त्याला आठवण होती.
अशा रीतीने त्याने आपले लोक,
आपली निवडलेली प्रजा,
मोठ्या आनंदाने वाजतगाजत बाहेर आणली.
Psalm 105:6-7, 8-9, 42-43
The Lord remembers his covenant forever.
O children of Abraham, his servant,
O descendants of the Jacob he chose,
he, the Lord, is our God;
his judgments are in all the earth. R
He remembers his covenant forever:
the promise he ordained for a thousand generations,
the covenant he made with Abraham,
the oath he swore to Isaac.
For he remembered his holy word,
spoken to Abraham his servant.
So he brought out his people with joy,
his chosen ones with shouts of rejoicing. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो,
मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू बालकांना प्रकट केल्या.
आलेलुया!
Acclamation:
The Spirit of truth will bear witness about me, says the Lord; you also will bear witness.
शुभवर्तमान लूक १२:८-१२
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा तुम्हांस शिकवील.”
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर स्वीकारतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर स्वीकारील; तसेच जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरूद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरूद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हांला सभा, 'सरकार, आणि अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे आणि काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्याविषयी काळजी करू नका. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
Luke 12:8-12
At that time: Jesus said to his disciples, "And I tell you, everyone who acknowledges me before men, the Son of Man also will acknowledge before the angels of God, but the one who denies me before men will be denied before the angels of God, And everyone who speaks a word against the Son of Man will be forgiven, but the one who blasphemes against the Holy Spirit will not be forgiven. And when they bring you before the synagogues and the rulers and the authorities, do not be anxious about how you should defend yourself or what you should say, for the Holy Spirit will teach you in that very hour what you ought to say."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
जगाचा वारस होण्याचे अभिवचन आब्राहामाला नियमशास्त्रामुळे त्याच्या विश्वासाच्या आणि कृपेच्या द्वारे मिळाले. तर संत पौलच्या मनाप्रमाणे आब्राहामाच्या सर्व संततीला म्हणजेच आब्राहामाप्रमाणे विश्वास असणाऱ्या आपल्या सर्वांसाठी हे अभिवचन आहे. आब्राहाम हा विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सर्वांचा बाप आहे. सर्व विश्वास ठेवणारे आब्राहामाचे खरे आध्यात्मिक वारसदार आहेत. वारस होण्याचे हे अभिवचन केवळ विश्वासाच्या द्वारेच निश्चित होते. (गलती ३:२९) देवाने आब्राहामाला अनेक राष्ट्रांचा जनक केले. आध्यात्मिक दृष्ट्या तो सर्व राष्ट्रांचा जनक झाला व जे अस्थित्वात नव्हते किंवा घडणे अशक्य होते ते त्याच्या जीवनात घडवून आणले. कारण आशेला काहीच जागा नसतानाही आब्राहामाने आशेने विश्वास ठेवला. वयाच्या १००व्या वर्षी पुत्रप्राप्ती होईल ह्या अगदी निष्फळ आशेवर आब्राहामाने विश्वास ठेवला. आब्राहामाप्रमाणे आपल्या जीवनात देखील अशक्यातील अशक्य गोष्टी शक्य होण्यासाठी आपण शंका न बाळगता देवावर विश्वास ठेवणे रास्त आहे.
प्रार्थना : हे पवित्र आत्म्या ये, आमची श्रद्धा बळकट कर व तुझ्या पवित्र दानांनी आम्हाला भरुन टाक, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या