प्रतिसाद स्तोत्र १३१:१,२,३
प्रतिसाद : ६२:२, ३-४, ५-६, ७-८
प्रतिसाद : हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला आहे.
१ हे देवा, तू माझा देव आहेस,
मी आस्थेने तुझा शोध करीन.
शुष्क, रुक्ष आणि निर्जल प्रदेशात
माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे.
माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे..
२ अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास
पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.
तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे,
माझे ओठ तुझे स्तवन करतील.
३ मी जिवंत आहे तोपर्यंत तुला धन्यवाद देईन,
तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन.
मज्जेने आणि मेदाने व्हावा
तसा माझा जीव तृप्त होईल.
आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.
४ मी रात्री आपल्या अंथरूणावर पडून तुझे
स्मरण करतो आणि प्रहरोप्रहरी
तुझे ध्यान करत असतो, कारण
तू माझे सहाय्य होत आला आहेस,
म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन.
Psalm 63:2, 3-4, 5-6, 7-8
For you my soul is thirsting,
O Lord, my God.
O God, you are my God;
at dawn seek you;
for you my soul is thirsting.
For you my flesh is pining, like a dry,
weary land without water. R
I have come before you in the sanctuary,
to behold your strength and your glory.
Your loving mercy is better than life;
my lips will speak your praise.R
I will bless you all my life;
in your name I will lift up my hands.
My soul shall be filled as with a banquet;
with joyful lips, my mouth shall praise you.
When remember you upon my bed,
I muse on you through the watches of the night
For you have been my strength;
in the shadow of your wings I rejoice.
दुसरे वाचन थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.”
(बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. )
प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील, नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.म्हणून ह्या वाचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading :1 Thessalonians 4:13-18
We do not want you to be uninformed, brothers, about those who are asleep, that you may not grieve as others do who have no hope. For since we believe that Jesus died and rose again, even so, through Jesus, God will bring with him those who have fallen asleep. For this we declare to you by a word from the Lord that we who are alive, who are left until the coming of the Lord, will not precede those who have fallen asleep. For the Lord himself will descend from heaven with a cry of command, with the voice of an archangel, and with the sound of the trumpet of God. And the dead in Christ will rise first. Then we who are alive, who are left, will be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air, and so we will always be with the Lord. Therefore encourage one another with these words.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जागृत आणि सिद्ध राहा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेला मनुष्याचा पुत्र येईल.
Acclamation:
Stay awake, and be ready; the Son of Man is coming at an hour you do not expect.
शुभवर्तमान मत्तय २५:१-१३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला."
येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितलाः “स्वर्गाचे राज्य दहा कुमारीसारखे होईल, त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. त्यात पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांस डुलक्या आल्या आणि झोप लागली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की, पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खानी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही दया, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की, कदाचित आम्हांला आणि तुम्हांला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नाला गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभो, प्रभो आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांला खचित सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस आणि ती घटका ठाऊक नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
0 टिप्पण्या