सामान्यकाळातील ३०वा सप्ताह
शुक्रवार ३ नोव्हेंबर २०२३
मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले आणि जाऊ दिले.
Then he took him and healed him and sent him away.
✝️
संत मार्टिन डी पोरेस
वर्तनसाक्षी (१५६९-१६३९)
✝️
पेरू देशातील लिमा ह्या ठिकाणी एका प्रेमप्रकरणामधून मार्टिन ह्याचा जन्म झाला. त्याचे वडील स्पेन देशातील अल्कांतारा येथील राजदरबारात सरदारकी करीत होते. त्यांचे नाव होते डॉन जुआन डी पोरेस. त्यांनी पनामा येथल्या एका निग्रो स्त्रीवर प्रेम केले. मात्र मार्टिनच्या जन्मानंतर त्याने तिला टाकून दिले. त्यामुळे मार्टिनचे बालपण अत्यंत दारिद्र्यात गेले. परंतु त्यामुळे त्याला गरिबांविषयी खूप कळवळा वाटू लागला. अगदी वयाच्या बाराव्या वर्षी त्याने शस्त्रक्रियेमध्ये प्राविण्य मिळविले आणि आसपासच्या इस्पितळात तो सराव (प्रॅक्टिस) करू लागला. आपल्या उत्पन्नाचा काही भाग तो गरीब रुग्णांना देई.
वयाच्या १५ व्या वर्षी तो डॅमिणिकन संघाचा सदस्य बनला. त्याच्याठायी आज्ञाधारकपणा, गरिबीचे व्रत आणि प्रेम इतके प्रभावी होते की, नऊ वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर डॉमिणिकन संघाच्या अधिकाऱ्यांनी त्याला व्रतस्थ बंधू म्हणून दीक्षा दिली. बऱ्याच रात्री त्याने आध्यात्मिक साधना, प्रायश्चित्त, आध्यात्मिक वाचन ह्यामध्ये घालविल्या.
आपल्या ठायी असलेले चमत्काराचे अद्भूत सामर्थ्य लपविण्याचा मार्टिनने खूप प्रयत्न केला, परंतु लवकरच लोकांमध्ये तो एक संत म्हणून प्रसिद्धीस आला. केवळ स्पर्शाने, पवित्र क्रुसाच्या खुणेने किंवा प्रार्थनेने तो आजारी लोकांना रोगमुक्त करी. देवाने त्याला अंतर्ज्ञानाची देणगी दिलेली होती. शिवाय संदेश देण्याचे दानही त्याला मिळाले होते. तो जणू प्रीती आणि शांतीचा मूर्तिमंत पुतळाच होता.
अगदी दूरूनही एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार किंवा आजार त्याला कळून येत असे. त्यामुळे त्याने लिमाबाहेर प्रवास केल्याची नोंद नसूनही मेक्सिको, फ्रान्स, आल्जिएर, फिलीपाईन्स, चीन आणि जपानसारख्या ठिकाणी तो व्यक्तिश: हजर राहून रुग्णसेवा करीत असे अशी साक्ष लोकांनी दिलेली आहे. कधी कधी तर त्याच्या भोवती देवदूत उभे असल्याचे आपण पाहिले असे डॉमणिकन संघाचे सदस्य सांगत.
मार्टिन सर्वांना समभावनेने वागवीत असे. आपल्या डॉमणिकन संघातील बंधूंना तो अगदी जिव्हाळ्याने मार्गदर्शन करी. हा स्पेनचा, तो भारतीय, हा निग्रो असा भेदभाव तो कधी करीत नसे. त्याच्या मठामधून दररोज १६० गरीब लोकांना आणि परित्यक्त स्त्रियांना भोजन पाठवून दिले जाई. इतकेच नव्हे तर दर आठवड्याला तो २६,००० रुपयांचा दानधर्म करीत असे. अनेक श्रीमंत आणि धनवान लोक त्याला देणग्या देण्यासाठी मठासमोर रांगा लावीत.
वयाच्या सत्तराव्या वर्षी मार्टिन जेव्हा मरण पावला तेव्हा संपूर्ण लिमा प्रांत शोकसागरात बुडाला. पेरूचे व्हॉईसरॉय, रॉयल चेंबर्सचे सदस्य, दोन महागुरू ह्यांनी मार्टिनच्या शवपेटिकेला खांदा दिला. त्याच्या २५ व्या स्मृतिदिनी त्याचे शरीर अविनाशी म्हणजेच न कुजलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. ६ मे १९६२ रोजी त्याला संतांच्या मालिकेत स्थान देण्यात आले. तो सामाजिक न्यायाचा आश्रयदाता मानला जातो.
✝️
पहिले वाचन : रोम ९:१-५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"माझ्या बंधुजनांसाठी मी शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती."
मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सद्सद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की, मला मोठा खेद वाटतो आणि माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. ते इस्राएली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना आणि अभिवचने ही त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत आणि त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो परमश्रेष्ठ असून युगानुयुगे धन्यवादित देव आहे. आमेन.
First Reading :Romans 9:1-5
Brethren: I am speaking the truth in Christ-I am not lying; my conscience bears me witness in the Holy Spirit-that I have great sorrow and unceasing anguish in my heart. For I could wish that I myself were accursed and cut off from Christ for the sake of my brothers, my kinsmen according to the flesh. They are Israelites, and to them belong the adoption, the glory, the covenants, the giving of the law, the worship, and the promises. To them belong the patriarchs, and from their race, according to the flesh, is the Christ, who is God over all, blessed for ever. Amen.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४८: १२-१५ , १९-२०
प्रतिसाद : हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर.
१) हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर,
हे सियोन, तू आपल्या देवाचे स्तवन कर.
त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत,
त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.
२) तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरितो,
उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो,
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो.
त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
३ )तो याकोबाला आपले वचन
इस्राएलला आपले नियम
आणि निर्णय जाहीर करतो.
कोणत्याही राष्ट्रांबरोबर त्याने असे वर्तन केले नाही.
त्याचे निर्णय ते जाणत नाहीत.
Psalm Psalm 147:12-13, 14-15, 19-20
R O Jerusalem, glorify the Lord!
O Jerusalem, glorify the Lord!
O Sion, praise your God!
He has strengthened the bars of your gates;
he has blessed your children within you. R
He established peace on your borders;
he gives you your fill of finest wheat.
He sends out his word to the earth,
and swiftly runs his command. R
He reveals his word to Jacob;
to Israel, his decrees and judgments.
He has not dealt thus with other nations;
he has not taught them his judgments.
आलेलुया, आलेलुया!
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतः चक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्यांच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.
Acclamation:
My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.
शुभवर्तमान लूक १४:१-६
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुमच्यापैकी कोणाचा गाढव किंवा बैल विहिरीत पडला तर त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय ?"
येशू एका शब्बाथ दिवशी परुश्यातील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनाला गेला, तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसले होते आणि पाहा, जलोदर झालेला कोणीएक माणूस त्याच्यासमोर होता. येशूने शास्त्र्यांना आणि परुश्यांना विचारले, शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले आणि जाऊ दिले. मग त्यांना म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा गाढव किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना.
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 14:1-6
One Sabbath, when Jesus went to dine at the house of a ruler of the Pharisees, they were watching him carefully. And behold, there was a man before him who had dropsy. And Jesus responded to the lawyers and Pharisees, saying, "Is it lawful to heal on the Sabbath, or not?" But they remained silent. Then he took him and healed him and sent him away. And he said to them, "Which of you, having a son or an ox that has fallen into a well on a Sabbath day, will not immediately pull him out?" And they could not reply to these things.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:एका आश्रममध्ये दररोज गुरु प्रवचन देताना एक मांजर लोकांचे लक्ष विचलित करायची म्हणून शिष्यांनी दररोज प्रवचन सुरू होण्याच्या अगोदर त्या मांजरीला आश्रममधील एका खांबाला बांधण्यास सुरूवात केली. काही वर्षांनी त्या गुरूचा मृत्यू झाला, त्या मांजरीचाही मृत्यू झाला. कुणाला माहीत नव्हते ती मांजर का बांधली जायची, म्हणून शिष्यांनी दुसरी मांजर आणून प्रवचनाच्या अगोदर बांधण्यास सुरुवात केली व त्या आश्रममध्ये प्रवचनाच्या अगोदर मांजर बांधायची प्रथा सुरू झाली. आपल्याही समाजात काही प्रथा, परंपरा, रूढी का सुरू झालेल्या आहेत, त्या कोणी सुरू केल्या आहेत, त्यांचा उद्देश काय आहे याचा योग्य अभ्यास न करता अगदी आंधळेपणाने त्या प्रथा आपण पाळतो. त्यामधील काही प्रथा या समाजासाठी हानीकारक व जीवघेण्यासुद्धा असतात. म्हणून आज ख्रिस्ताचा मुद्दा एवढाच आहे की, प्रथा ही माणसासाठी आहे माणूस प्रथेसाठी नाही. एखादी प्रथा समाजासाठी हानीकारक असेल तर परुश्यांसारखे त्याला चिकटून न राहता ती प्रथा बदलली पाहिजे. आपल्या समाजामध्ये अशाप्रकारच्या प्रथा आहेत का ? त्यांचा योग्य तो अभ्यास करून आपल्याला त्या बदलता येतील का ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, आमच्या सर्व आजारी बंधु भगिनींना आम्ही तुझ्या हातात सोपवितो त्यांना तुझ्या प्रेमाचा व करुणेचा स्पर्श कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या