Marathi Bible Reading | Saturday 4th November 2023| 30th week in ordinary Time |

 सामान्यकाळातील ३०वा सप्ताह 

शानिवार ४ नोव्हेंबर  २०२३

जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल.”
 For everyone who exalts himself will be humbled, and he who humbles himself will be exalted.

  ✝️ 


 संत चार्ल्स बोरोमियो
• महागुरू, वर्तनसाक्षी (१५३८-१५८४)

त्यांना धर्मशिक्षकांचा आश्रयदाता मानले जाते. मरीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची मध्यस्थी केली जाते.

चिंतन : ज्याला देवाच्या सेवेत व मनन-चिंतनात प्रगती करण्याची इच्छा आहे त्यांनी दररोज नव्या दमाने देवाच्या सान्निध्यात राहून देवाची सेवा अखंडीतपणे करीत राहिले पाहिजे. आपल्या सर्व आशा आकांक्षा आणि ध्येय केवळ देवाच्या गौरवासाठी असावे ही तीव्र मनीषा त्याने बाळगली पाहिजे.
- संत चार्ल्स बोरोमियो

✝️

पहिले वाचन :रोम  ११:१-२,११-१२, २५-२९

वाचक :  पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

"यहुदी लोकांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो, तर यहुदी लोकांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यातून जिवंत होणे ह्यापेक्षा कमी ठरणार नाही."

मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही. कारण मीही इस्राएली, आब्राहामच्या कुळातला, बन्यामिनच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.
तर मी विचारतो, यहुद्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता किती तरी अधिक होईल.
बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशतः अंध झालेले आहेत, अशा रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेले आहे, "मुक्त करणारा सियोनातून येईल,
तो याकोबापासून अभक्ती दूर करील."
"जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन,
तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल."
सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत, परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत. कारण देवाला आपल्या कृपादानांचा आणि पाचारणाचा अनुताप होत नाही.

प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 11:1-24, 11-12, 25-29

Lask then, has God rejected his people? By no means for mysel Israelite, a descendant of Abraham, a member of the tribe of fenjanin God has not rejected his people whom he foreknew So Eask, did they stumble in orde that they might fall? By no means! Rather, through the trespass salvation has come to the Gentiles, so as to make Israel jealous. Now if their tresqus means riches for the world, and if their failure means niches for the Gentiles, how much more will their full inclusion mean! Lest you be wise in your own sight. I do not want you to be uncare of this mystery, brother a partial hardening has come upon trael, until the fullness of the Gentiles has come in. And in this way all Israel will be saved, as it is written "The Deliverer will come from Sion, he will banish ungodliness from Iscob and this will be my covenant with them when I take away their sins As regards the gospel they are enemies for your sake. But as regards election, they are beloved for the sake of the forefathers. For the gifts and the calling of God are irrevocable. . 
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९४: १२-१५ ,१७-१८

प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.

१) हे परमेश्वरा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, 
ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, 
तो धन्य. त्याला तू विपत्काली आराम देशील.

२)परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही. 
तो आपले वतन सोडून देणार नाही. 
न्यायी नीतिमानांकडे वळेल आणि 
सरळ मनाचे सर्वजण त्याला अनुसरतील.

३ ) परमेश्वराने मला सहाय्य केले नसते 
तर माझी वस्ती निःशब्दस्थानी केव्हाच झाली असती. 
माझा पाय घसरला असे मी म्हणालो, 
तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला.

Psalm 94:12-13a, 14-15, 17-18 
The Lord will not abandon his people.

Blessed the man 
whom you discipline, O Lord,
whom you train by means of your law, 
to whom you give peace in evil days. R 

The Lord will not abandon his people, 
nor forsake those who are his heritage:
for judgment shall again be just, 
and all true hearts shall uphold it. R

 If the Lord were not to help me, 
my soul would soon go down to the silence.
When I think, "I have lost my foothold," 
your mercy, O Lord, holds me up. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
  तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता.
 आलेलुया!

Acclamation: 
 Take my yoke upon you, says the Lord; and learn from me, for I am gentle and lowly in heart.

शुभवर्तमान लूक  १४:१,७-११
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 “जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल."

येशू एका शब्बाथ दिवशी परुश्यातील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनाला गेला, तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसले होते.आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून येशू त्यांना दाखला देऊन म्हणाला: "कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस, कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या मा त्याने आमंत्रण केले असेल, मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील, पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 14:1, 7-11

One Sabbath, when Jesus went to dine at the house of a ruler of the Pharisees, they were watching him carefully. Now he told a parable to those who were invited, when he noticed how they chose the places of honour, saying to them, "When you are invited by someone to a wedding feast, do not sit down in a place of honour, lest someone more distinguished than you be invited by him, and he who invited you both will come and say to you, "Give your place to this person', and then you will begin with shame to take the lowest place. But when you are invited, go and sit in the lowest place, so that when your host comes he may say to you, 'Friend, move up higher.' Then you will be honoured in the presence of all who sit at table with you. For everyone who exalts himself will be humbled, and he who humbles himself will be exalted." immediately pull him out?" And they could not reply to these things.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:सदा नम्र रहा. एका थडग्यावरती एक सुंदर वाक्य वाचले, "मै अहंम था, वही मेरा वहम था, इस जिंदगी में इतना समझ आया हे ईश्वर ये तेरा ही रहम था." फक्त वीस ते पंचवीस दिवस एकांतवासात जा, लोक तुमचे नाव सुद्धा विसरतील. मनुष्य जीवनभर या अहंकारात जगतो की मी लोकांकरिता किती विशेष आणि महत्त्वपूर्ण आहे, पण वास्तविकता मात्र ही आहे की, तुमच्या असण्या नसण्याने कोणाचे काही अडत नाही. थोडीशी गैरसोय होईल, थोडी आठवण येईल पण कोणाचे काही अडणार मात्र नाही. तुमच्या निवृत्तीच्या वेळेला तुम्हाला असे वाटते की मी गेल्यावर माझ्या एवढ्या मोठ्या कामाचा डोलारा कोण सांभाळणार आणि मला पुन्हा पुन्हा मानसन्मानाने इथे बोलावले जाणार पण निवृत्तीच्या फक्त वीस दिवसानंतर पुन्हा त्या ऑफिसमध्ये या, तुमच्याशी बोलण्यासाठी कुणाकडे पाच मिनिटेही नसतील. जोपर्यंत तुमच्याकडे पद, अधिकार वगैरे आहे तोपर्यंत हजारो लोकांना तुमची गरज असते. पण एकदा का तुमचे पद गेले की, कदाचित कोण तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही. म्हणून सदा जीवनामध्ये नम्र रहा.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, आमच्या सर्व आजारी बंधु भगिनींना आम्ही तुझ्या हातात सोपवितो त्यांना तुझ्या प्रेमाचा व करुणेचा स्पर्श कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या