Marathi Bible Reading | 31st Sunday in ordinary Time| 5th November 2023

 सामान्यकाळातील ३१ वा रविवार 

५ नोव्हेंबर २०२३

पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे.

call no man your father on earth, for you have one Father, who is in heaven. 


तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे.


 धर्माचे व नीतिशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शास्त्री परुश्यांनी सामान्य व गरीब जनतेवर धर्माच्या नावाखाली अनेक प्रकारची बंधने लादली होती. विशेषतः बंधुत्वाची, परस्पर सेवेची व सत्कर्माची पायमल्ली केली जात | होती. प्रभू येशू अशा ढोंगी धर्मपंडितांना धारेवर धरुन स्वर्गीय पित्याठायी सर्व समान असल्याचे प्रतिपादन करीत आहे. विशेषतः प्रभू येशू आज स्पष्ट करीत आहे की पोकळ भक्ती व कर्मकांडाच्या आधारे जनतेला फसवणे योग्य नाही तर जसा स्वर्गीय पिता एक आहे तसे सर्वांनी एक व्हावे.  प्रभू येशूची समानतेची, बंधुत्वाची, ऐक्याची आणि प्रेमाची शिकवण  अमलात आणण्यासाठी आपण प्रभूची नम्रतेची शिकवण अमलात आणू या.

✝️             

पहिले वाचन : मलाखी १:१४-२:२०८-१० 
वाचक :मलाखी या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुम्ही मार्ग सोडून गेला आहा, धर्मशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना ठोकर खायला तुम्ही लावले आहे."

"मी थोर राजा आहे आणि राष्ट्रात माझ्या नामाची भीती धरतात," असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
आता याजकहो, तुम्हांला ही आज्ञा होत आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नामाचा महिमा व्हावा यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही तर मी तुम्हांवर शाप पाठवीन आणि तुमचे आशीर्वादच शाप करीन. तुम्ही मार्ग सोडून गेला आहा धर्मशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना ठोकर खाण्यास तुम्ही लावले आहे, तुम्ही लेव्याचा करार बिघडविला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव मी तुम्हांला सर्व लोकांपुढे तुच्छ आणि नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गानी चालत नाही आणि माणसांची भीड मुरवत धरून न्याय करता.

आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय ? एकाच देवाने आम्हांला उत्पन्न केले नाही काय? असे असता आम्ही एकमेकांचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे ?
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Malachi 1:14b-2:26, 8-10

"I am a great King, says the Lord of hosts, and my name will be feared among the nations." "And now O priests, this command is for you. If you will not listen, if you will not take it to heart to give honour to my name, says the Lord of hosts, then I will send the curse upon you. You have turned aside from the way. You have caused many to stumble by your instruction. You have corrupted the covenant of Levi, says the Lord of hosts, and so I make you despised and abased before all the people, inasmuch as you do not keep my ways but show partiality in your instruction." Have we not all one Father? Has not one God created us? Why then are we faithless to one another, profaning the covenant of our fathers?
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १३१:१,२,३
प्रतिसाद :  प्रभो, मला शांतीने सांभाळ.

१ हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही,
 माझी दृष्टी उन्मत्त नाही.
मोठमोठ्या आणि मला असाध्य 
अशा गोष्टींत मी पडत नाही.

२ खरोखर मी आपली वृत्ती स्वस्थ 
आणि शांत ठेवली आहे.
दूध तुटलेले बाळ आईच्या कुशीत विसावते,
 त्या बाळासारखा माझा जीव अंतर्यामी विसावतो.

३ हे यापुढे सर्वदा प्रभुवर आशा ठेव.

Psalm Psalm 131:1, 2, 3
Keep my soul in peace at your side, O Lord.

O Lord, my heart is not proud, 
nor haughty my eyes.
I have not gone after things too great, 
nor marvels beyond me.

Truly, I have set my soul 
in tranquility and silence.
 As a weaned child on its mother, 
as a weaned child is my soul within me.

O Israel, wait for the Lord, 
both now and forever. R
 

दुसरे वाचन   थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र २:७-९.१३
वाचक : पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

“आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हांकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो. '

आमच्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हांमध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हांला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हांवरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हांकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो.
बंधूनो, आमचे श्रम आणि कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे. तुम्हांतील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हांपुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.
आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करतो की, तुम्ही आम्हांपासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते असेच आहे, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांत कार्य करत आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading  :1 Thessalonians 2:7-9, 13

Brethren: We were gentle among you, like a nursing mother taking care of her own children. So, being affectionately desirous of you, we were ready to share with you not only the gospel of God but also our own selves, because you had become very dear to us. For you remember, brothers, our labour and toil: we worked night and day, that we might not be a burden to any of you, while we proclaimed to you the gospel of God. And we also thank God constantly for this, that when you received the word of God, which you heard from us, you accepted it not as the word of men but as what it really is, the word of God, which is at work in you believers.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
  आलेलुया!

Acclamation: 
 You have one Father, who is in heaven, and you have one instructor, the Christ.


शुभवर्तमान मत्तय  २३:१-१२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
"ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत."
येशू लोकसमुदायांना आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, शास्त्री आणि परुशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरीत आणि पाळत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरत करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावरदेतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात, ते आपली मंत्रपत्रे रुंद आणि आपले झग्याचे गोंडे मोठे करतात जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील उच्च आसने, बाजारात नमस्कार घेणे आणि लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांना आवडते. तुम्ही तरी आपणांस गुरुजी म्हणवून घेऊ नका. कारण तुमचा गुरू एक आहे आणि तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गात आहे. तसेच आपणांला स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 23:1-12

At that time: Jesus said to the crowds and to his disciples, "The scribes and the Pharisees sit on Moses' seat, so do and observe whatever they tell you, but not the works they do. For they preach, but do not practise. They tie up heavy burdens, hard to bear, and lay them on people's shoulders, but they themselves are not willing to move them with their finger. They do all their deeds to be seen by others. For they make their phylacteries broad and their fringes long, and they love the place of honour at feasts and the best seats in the synagogues and greetings in the market-places and being called rabbi by others. But you are not to be called rabbi, for you have one teacher, and you are all brothers. And call no man your father on earth, for you have one Father, who is in heaven. Neither be called instructors, for you have one instructor, the Christ. The greatest among you shall be your servant. Whoever exalts himself will be humbled, and whoever humbles himself will be exalted.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  धार्मिकता आणि आध्यात्मिकता यांच्यात एक मूलभूत फरक आहे. धार्मिकता ही बाह्यस्वरूपाची असते तर आध्यात्मिकता ही आंतरिक स्वरूपाची असते. आजची तिन्ही वाचने या दोन गोष्टींतील फरक ठळकपणे स्पष्ट करून सांगतात. 
१.कर्मकांड आणि उपासना : संदेष्टा मलाखी हा मंदिर उपासनेचा संदेष्टा मानला जातो. मंदिर उपासनेतील सहा गोष्टी त्याला खटकतात. त्यावरून तो देवप्रीती, देवाचे भय, करार, देवाचा क्रोध, पश्चात्ताप व देवनिंदा इत्यादिविषयी लोकांना खडसावतो. आजच्या पहिल्या वाचनात देवाचे भय व करार या विषयांवरून तो याजकांना व लोकांनी आणलेल्या सदोष यज्ञबळीबद्दल त्यांना धारेवर धरतो. परमेश्वराची उपासना करायची ती एकदम मनापासून, केवळ कर्मकांड म्हणून नव्हे हे अध्यात्माचे मूलतत्त्व मलाखी त्यांना शिकवितो.
 २. देवशब्द आणि त्याचा अर्थ : थेस्सलनीका येथील लोकांना आपण सांगितलेली सुवार्ता त्यांनी मनावर घ्यावी म्हणून संत पौल त्यांना प्रेमळ शब्दांत परंतु तितक्याच खंबीरपणे मार्गदर्शन करतो. बायबल हा माणसाच्या भाषेत लिहिला गेलेला वा भाषांतरीत करण्यात आलेला देवाचा शब्द आहे. मात्र असे असले तरी त्याचा अर्थ ज्याने त्याने आपापल्यापरिने लावणे धोक्याचे असते. कॅथोलिक ख्रिस्तसभेत देवाचे वचन, ख्रिस्ती परंपरा आणि ख्रिस्तसभेची अधिकृत ह्यांच्यात उचितमेळ घातला जातो. केवळ बायबल पुरेसे आहे असे म्हणणाऱ्या मार्टिन ल्यूथर, कॅल्वीन व इिवंग्ली ह्यांना चर्चने पाखंडी ठरविले. 
३. बाह्य आणि आंतरिक : शास्त्री - परुश्यांच्या दिखाऊ नीतिमत्त्वावर कडक ताशेरे ओढताना येशू अंतरीचा धर्म पाळण्याविषयी पाच महत्त्वाचे मुद्दे मांडतो : धार्मिक अधिकाऱ्यांचा आदर (मोशेचे आसन), धार्मिकतेचे पोकळ प्रदर्शन ( रूंद मंत्रपत्रे व मोठे गोंडे), चुकीच्या नेत्यांचे अनुकरण (परूशी), धार्मिक पदांचा आदर (पिता, रब्बी, गुरूजी) आणि धार्मिक जीवनातील नम्रता (सेवक). थोडक्यात जे बाहेरून दिसते ते नव्हे तर जे आतून बाहेर येते ते माणसाला आध्यात्मिक व नीतिमान ठरवित असते असे येशू शिकवितो.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात पोकळ धार्मिकता आणि प्रगल्भ आध्यात्मिकता ह्यांच्यात कोणकोणत्या बाबतीत दरी उत्पन्न झालेली आहे ? तिच्यातील अंतर दिवसेंदिवस मला कसे कमी करता येईल ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करुन खरे ख्रिस्ती जीवन
जगण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या