Marathi Bible Reading | Monday 6th November 2023| 31st week in ordinary Time |

 सामान्यकाळातील ३१वा सप्ताह 

सोमवार ६ नोव्हेंबर  २०२३

नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.
For you will be repaid at the resurrection of the just."

  ✝️ 

लुमिझीनचे संत लिओनार्ड 
- वर्तनसाक्षी, मठाधिकारी (५५९)

मध्ययुगामध्ये संत लिओनार्ड हा जर्मनी, ऑस्ट्रिया आणि बोहेमिया इथे खूप नावारूपाला आला होता आणि त्यात त्यांची भक्ती वाढत गेली. त्याच्या मध्यस्थीने अनेक चमत्कारिक घटना घडत होत्या. त्याला आजारी, मंदबुद्धी, प्रसृतीवेदना सहन करणाऱ्या स्त्रिया आणि तुरुंगातील कैद्यांचा आश्रयदाता संत मानले जाते

मेजवानी ही परतफेडीसाठी नसून प्रेम, समानता, बंधुत्व व सहभागितेचे ते प्रतिक आहे. आपले विचार, आपल्या कल्पाना व योजना ह्यापेक्षां देवाच्या योजना खूप वेगळ्या असतात. प्रभू येशू त्याच्या प्रीति योजनेत सर्वांना आमंत्रण देत असतो. आपणसुद्धा, देवाच्या योजनेप्रमाणे भेदभाव, स्वार्थ व दांभिकपणे कोणतीही गोष्ट न करता समचित्त व एकचित्त बनण्यासाठी प्रभूकडे  कृपा मागू या.

✝️

पहिले वाचन :रोम  ११:२९-३६
वाचक :  पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे.'

देवाला आपल्या कृपादानांचा आणि पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाचे दया प्राप्त झाली आहे, त्याचप्रमाणे तुम्हांवरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोडवाड्यात कोंडून ठेवले आहे.
अहाहा, देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!
"प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता ?"
"त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?"
कारण सर्व काही त्याच्यापासून, त्याच्याच द्वारे आणि प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.

प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 11:29-36

Brethren: The gifts and the calling of God are irrevocable. For just as you were at one time disobedient to God but now have received mercy because of their disobedience, so they too have now been disobedient in order that by the mercy shown to you they also may now receive mercy. For God has consigned all to disobedience, that he may have mercy on all. Oh, the depth of the riches and wisdom and knowledge of God! How unsearchable are his judgments and how inscrutable his ways! "For who has known the mind of the Lord, or who has been his counsellor?" "Or who has given a gift to him that he might be repaid?" For from him and through him and to him are all things. To him be glory for ever. Amen.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ६८:३०-३१,३३-३४,३६-३७

प्रतिसाद : हे देवा, तू मला उत्तर दे.

१ मी तर दीन आणि दुःखी आहे, 
हे देवा, तू सिद्ध केलेले तारण मला 
उच्च स्थानी नेऊन ठेवील.
गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन, 
त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन.

२ दीनजन हे पाहून हर्ष करतील,
 देवाचा शोध करणाऱ्यांनो, 
तुमच्या हृदयात नवजीवन येवो, 
कारण परमेश्वर गरजवंतांचे ऐकतो, 
बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.

३ कारण देव सीयोनाचे तारण करील, 
तो यहुदाची नगरे बांधील, लोक तेथे राहतील 
आणि ते त्यांच्या ताब्यात येईल. 
ते त्यांच्या सेवकांच्या संततीचेही वतन होईल, 
ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील.


Psalm 69:30-31, 33-34, 36-37
In your great mercy, answer me, O Lord.

As for me in my poverty and pain, 
let your salvation, O God, raise me up. 
Then I will praise God's name with a song; 
I will glorify him with thanksgiving. 

The poor when they see it will be glad, 
and God-seeking hearts will revive: 
for the Lord listens to the needy,
and does not spurn his own in their chains.

For God will bring salvation to Sion, 
and rebuild the cities of Judah, 
and they shall dwell there in possession. 
The children of his servants shall inherit it;
 those who love his name shall dwell there.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
  ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
 आलेलुया!

Acclamation: 
 If you abide in my word, you are truly my disciple, and you will know the truth, says the Lord.

शुभवर्तमान लूक  १४:१२-१४
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तुम्ही आपल्या मित्रांना बोलावू नका,तर गोरगरिबांना आमंत्रित करा." 

ज्या परुश्याने येशूला आमंत्रण केले होते त्याला येशू म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची मेजवानी द्याल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका, कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा गोरगरीब, अपंग, लंगडे आणि आंधळे ह्यांना आमंत्रित करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नाही.  मात्र नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 14:12-14

At that time: Jesus said also to the man who had invited him, "When you give a dinner or a banquet, do not invite your friends or your brothers or your relatives or rich neighbours, lest they also invite you in return and you be repaid. But when you give a feast, invite the poor, the crippled, the lame, the blind, and you will be blessed, because they cannot repay you. For you will be repaid at the resurrection of the just."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:नारायण कृष्णन हे बँगलोरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खूप चांगल्या पगारावरती शेफ म्हणून काम करत होते. एक दिवशी मदुराईला त्यांच्या घरी येत असताना त्यांनी एका मानसिक रुग्णाला स्वतःचीच विष्ठा खाताना पाहिले. नारायण ह्यांनी हे बघताच ताबडतोब जवळच्या हॉटेलमधून चांगले जेवण आणून त्या मानसिक रुग्णाला दिले, त्याने मोठ्या उत्साहाने ते जेवण खाल्ले आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्मितहास्य फुलले. त्या स्मितहास्याने नाराणचे संपूर्ण जीवन बदलले. त्यांनी आपली एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून अशाप्रकारच्या मानसिक रुग्णांचे पोट भरण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. आज ते अशाप्रकारच्या गल्ली, रस्त्यावरील चारशे मानसिक रुग्णांना रोज जेवण वाढतात. गेली अनेक वर्षे एकही दिवस न चुकता अगदी आनंदाने ते ही सेवा करीत आहेत. ते सांगतात भिकारी तरी जेवण मागून खाऊ शकतात पण हे मानसिक रुग्ण कुणाकडे मागूही शकत नाहीत. यासाठी दर दिवशी त्यांना आठ हजार रूपयांचा खर्च येतो पण त्यांची त्यांना काहीच चिंता नाही, परमेश्वराचे कार्य आहे तो सांभाळणार हेच त्यांचे शब्द. तुमची परतफेड करण्यासाठी ज्यांच्याकडे काही नाही त्यांची मदत करा हे ख्रिस्ताचे शब्द नारायण अगदी तंतोतंत जगतो.

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या सहभोजनाचा आस्वाद सर्वांपर्यंत पोहोचवून तुझी सांगण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या