Marathi Bible Reading | Tuesday 7h November 2023| 31st week in ordinary Time |

 सामान्यकाळातील ३१वा सप्ताह 

मंगळवार ७ नोव्हेंबर  २०२३

"जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य. "
"Blessed is everyone who will eat bread in the kingdom of God!" 

  ✝️ 



 अलेक्सझांन्द्रीयाचे संत अचिलास
प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला त्याच्या प्रीतिभोजनात सहभागी होण्यासाठी बोलावित असतो.  पवित्र मिस्साबलिदान ही ख्रिस्ती माणसासाठी सर्वात महान उपासना आहे. प्रभू येशूच्या शरीर व रक्ताच्या पवित्र  भोजनात सहभागी होण्यासाठी आपण अंत:करणापासून उत्सुक असले पाहिजे..  विशेष रितीने प्रभूच्या भोजनात सहभागी होण्यासाठी योग्यप्रकारे मनाची तयारी करायला हवी. अनेकदा आपणसुद्धा आपल्या कामाचे निमित्त सांगून प्रभूचे आमंत्रण नाकारतो. प्रभू आपल्याला पुन्हा पुन्हा बोलावित आहे. कृपेची संधी आपल्याला मिळत आहे.
अनेकदा प्रभू आपल्या दाराशी येऊन आपले दार ठोठावित आहे. प्रभू  म्हणतो, “जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन" (प्रकटी ३ : २०). |

✝️

पहिले वाचन :रोम   १२:५-१६
वाचक :  पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"आपण प्रत्येकजण एकमेकांचे अवयव असे आहो."
आपण पुष्कळजण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येकजण एकमेकांचे अवयव असे आहो, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी.
प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणांपेक्षा थोर माना, आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा, अतिथ्य करण्यात तत्पर असा.
तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या. शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा, शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 12:5-16a

 Brethren: We, though many, are one body in Christ, and individually members one of another. Having gifts that differ according to the grace given to us, let us use them: if prophecy, in proportion to our faith if service, in our serving: the one who teaches, in his teaching: the one who exhorts, in his exhortation; the one who contributes, in generosity: the one who leads, with zeal; the one who does acts of mercy, with cheerfulness. Let love be genuine. Abhor what is evil; hold fast to what is good. Love one another with brotherly affection. Outdo one another in showing honour. Do not be slothful in zeal, be fervent in spirit, serve the Lord. Rejoice in hope, be patient in tribulation, be constant in prayer. Contribute to the needs of the saints and seek to show hospitality. Bless those who persecute you; bless and do not curse them. Rejoice with those who rejoice, weep with those who weep. Live in harmony with one another.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १३१:१,२,३
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्याशी माझा समेट घडव.

१ हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, 
माझी दृष्टी उन्मत्त नाही.
मोठमोठ्या आणि मला असाध्य 
अशा गोष्टीत मी पडत नाही.

२ खरोखर मी आपला जीव स्वस्थ 
आणि शांत ठेवला आहे.
दूध तुटलेले बालक, आपल्या आईबरोबर असते. 
तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा 
माझ्याठायी आहे.
३ हे इस्राएल, आतापासून सर्वकाळ तू 
परमेश्वराची आशा धर.


Psalm 131:1, 2,3

R Keep my soul in peace at your side, O Lord.

O Lord, my heart is not proud 
nor haughty my eyes. 
I have not gone after things too great,
nor marvels beyond me. R

Truly, I have set my soul
in tranquility and silence. 
As a weaned child on its mother, my soul
as a weaned child is  within me. R

O Israel, wait for the Lord, both now and forever R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
  देवाचे वचन स्वीकारा, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारा आणि वास्तविक ते असेच आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest, says the Lord.

शुभवर्तमान लूक  १४:१५-२४
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"माझे घर भरुन जावे म्हणून रस्त्यावर आणि कुंपणापलीकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये."

येशूबरोबर भोजनाला बसलेल्यापैकी कोणाएकाने त्याला म्हटले, "जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य. " त्याने त्याला म्हटले, “कोणाएका मनुष्याने संध्याकाळी मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले. जेवणाच्या वेळेस, आता या, तयारी झाली आहे, असे आमंत्रितांना सांगावयाला त्याने आपल्या एका नोकराला पाठवले. तेव्हा ते सगळे वेगवेगळे निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणखी एकजण म्हणाला, मी लग्न केले आहे, म्हणून मी येऊ शकत नाही. मग त्या नोकराने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला आणि तो आपल्या नोकराला म्हणाला, नगराच्या रस्त्यांत आणि गल्लीबोळांत लवकर जा आणि गोरगरीब, अपंग, आंधळे व लंगडे ह्यांस इकडे घेऊन ये. नोकर म्हणाला, महाराज आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे. धनी नोकराला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून रस्त्यावर आणि कुंपणापलीकडे जाऊन अशा लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या आमंत्रित माणसापैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही. "

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 14:15-24

At that time: One of those who reclined at table with Jesus said to him, "Blessed is everyone who will eat bread in the kingdom of God!" But he said to him, "A man once gave a great banquet and invited many. And at the time for the banquet he sent his servant to say to those who had been invited, 'Come, for everything is now ready. But they all alike began to make excuses. The first said to him, 1 have bought a field, and I must go out and see it. Please excuse me. And another said, 1 have bought five yoke of oxen, and I am going to examine them. Please excuse me. And another said, I have married a wife, and therefore I cannot come. So the servant came and reported these to his master. Then the master of the house became angry and said to his servant, 'Go out quickly to the streets and lanes of the city, and bring in poor and crippled and blind and lame.' And the servant said, 'Sir, what you commanded has been done, and still there is room. And the master said to the servant, 'Go out to the highways and hedges and compel people to come in, that my house may be filled. For I tell you, none of those men who were invited shall taste my banquet."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:आपण आपल्या ऐहिक जीवनात एवढे गुंतलेलो आहोत की, आध्यात्मिक जीवनासाठी परमेश्वर आपल्याला पुन्हा पुन्हा आमंत्रण करतो. पण आपण ते नाकारतो. तुमच्याकडे फरारी कार असो वा मारूती कार, शेवटी प्रवास तोच राहतो. तुमच्याकडे आयफोन असो वा सॅमसंग फोन असो, समोरचा बोलणारा तोच राहतो. तुमच्याकडे रोलेक्स घड्याळ असो वा टायटन घड्याळ असो, वेळ सारखीच दाखवणार. तुमच्याकडे मोठा बंगला असो वा छोटेसे घर असो, घरातील वातावरण प्रेमावर अवलंबून आहे. आपला आनंद कार, फोन, घड्याळ, घर अशावस्तूमध्ये नाही तर त्या मधून मिळणाऱ्याअनुभवांमधून आहे. या सर्व महान वस्तू असण्यामध्ये काहीच हरकत नाही. पण आपण जेवढी मेहनत आणि खटाटोप या वस्तूंसाठी करतो तेवढीच मेहनत आपण ज्या गोष्टी आपल्याला खरा, निखळ आनंद देतात त्यासाठी करतो का ? या सर्व महान गोष्टींमध्ये केवळ उपयोगिता मूल्य आहे, आनंदाचे मूल्य नाही. तरीपण आपण ह्या काही गोष्टींमध्ये आनंद शोधण्यासाठी एवढे गुंतलेलो आहोत की आपल्याला परमेश्वराची हाकसुद्धा ऐकू येत नाही.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, तुझ्या अतिपवित्र बलिदानातील प्रीति भोजनात सहभागी होण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या