सामान्यकाळातील ३१वा सप्ताह
बुधवार ८ नोव्हेंबर २०२३
तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही
any one of you who does not renounce all that he has cannot be my disciple.
✝️
सोईझीन्सनजिकच्या एका श्रीमंत घराण्यामध्ये गॉडफ्रीचा जन्म झाला. त्याच्या आईच्या अकाली निधनानंतर गॉडफ्रीने स्वत:ला ईश्वरकार्यास वाहून घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला संत क्विन्टीनच्या मठामध्ये ठेवण्यात आले. त्याचे धर्मबाप पवित्र मठवासी (त्यांचेही नाव अॅबट गॉडफ्री असेच होते.) ह्याने तेथे त्याचे लालनपालन केले.
गॉडफ्री ह्याने आपल्या तारुण्याची महत्त्वाची वर्षे रात्रंदिवस प्रार्थना करण्यात घालविली. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला धर्मगुरूपदाची दीक्षा देण्यात आली. त्यानंतर लगेच मोडकळीस आलेल्या कॅम्पबेन इथल्या एका मठाचे अधिकारी म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. परंतु त्याने आपल्या चातुर्याने आणि हुशारीने तो मठ पुर्वस्थितीत आणला आणि त्यातील धार्मिक जीवनाचे पुनरुज्जीवन केले.
इ. स. ११०३ साली त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला एमिएन्सचे महागुरू म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यावेळी तो अनवाणीच, पश्चात्तापाची जाडीभरडी वस्त्रे (गोणताट) पांघरून शहरात शिरला आणि महागुरूंच्या राजमहालात एखाद्या भिक्षूप्रमाणे राहू लागला.
त्याची सहनशीलता, नम्रता आणि गरिबांविषयी त्याला वाटणारी कळकळ अलौकिकच म्हणावी लागेल. ख्रिस्त आणि बारा प्रेषित ह्या नात्याने तो दररोज १३ गरीब लोकांना भोजन देत असे. कुष्ठरोग्यांच्या इस्पितळांना भेटी देणे, त्यांच्या गरजा भागविणे, त्यांना हसतमुख ठेवून त्यांची सेवा करणे ह्यात त्याला परमानंद मिळत असे.
हाईम शहराच्या महापौराशी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी जात असताना अचानक गॉडफ्री आजारी पडले. त्यांनी अंतिम संस्कार स्वीकारला आणि मोठ्या आनंदाने ह्या जगाचा निरोप घेतला. संत क्रिस्पीनच्या मठात (सोईझॉन्स) ८ नोव्हेंबर १११५ रोजी त्याच्यावर अंत्यविधी संस्कार करण्यात आला.
आपले आप्तेष्ट, आपली भौतिक धनसंपत्ती व जे काही शिष्य बनण्यास अडथळा निर्माण करेल अशा सर्वांचा त्याग करण्यास प्रभू आवाहन करीत आहे. सर्वस्वाचा त्याग करुन ख्रिस्ताला अनुसरणे सोपे नाही, मात्र अशक्यही नाही. सर्व प्रेषितगण आणि संतगणांनी त्यागमय व खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे.
जागतिक जीवनात अनेक प्रलोभने व मोह आहेत. आपण त्याची निवडलेली प्रजा आहोत म्हणूनच प्रभू पासून आपल्याला विभक्त होता येत नाही. प्रभू येशूचे खरे शिष्य बनण्यास सामर्थ्य, धैर्य, प्रेरणा व कृपा लाभावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन :रोम १३:८-१०
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रीती हे नियमशास्त्रांचे पूर्णपणे पालन होय."
एकमेकांवर प्रीती करणे ह्यांच्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. “व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको," ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश "जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर," ह्या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Romans 13:8-10
Brethren Owe no one anything except to love each other, for the one who loves another has fulfilled the law for the commandments, "You shall not commit adultery. You shall not murder. You shall not steal. You shall not covet, and any other commandment, are summed up in this word: "You shall love your neighbour as self Love does no wrong to a neighbour, therefore love is the fulfilling of the law
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११२:१-२,४-५,९
प्रतिसाद : जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो : त्याचे कल्याण होते.
१) परमेश्वराचे स्तवन करा,
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य!
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल.
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.
२) सरळ जनांना अंध:कारात प्रकाश प्राप्त होतो,
त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत
जो मनुष्य दया करतो आणि उसनेदेतो त्याचे कल्याण होते,
तो न्यायाने आपला व्यवसाय करील
त्याने सढळ हाताने गरिबांना दानधर्म केला आहे
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.
Palm 112:16-2, 4-3,9
It goes well for the man who deals generously and lends
Blessed the man who fears the Lord
who takes great delight in his commandments
His descends all be powerful on earth
the generation of the upright will be blest. R
A light es in the darkness for the upright
he is generous, merctful, and just
It goes well for the man who deals
generously and lends,
who conducts his affairs with justice. R
Open-handed, he gives to the poor;
his justice stands firm forever.
His might shall be exalted in glory. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी देवाने आपणाला सुवार्तेच्या द्वारे पाचारण केले आहे.
आलेलुया!
Acclamation:
if you are insulted As the name of Christ, you are blessed, because the Spirit of glory and of God rests upon you
शुभवर्तमान लूक १४:२५-३३
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही."
येशूबरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही त्याग करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हेपाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, 'हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही,' अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करायला निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलाला पाठवून सलोख्याने बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 14:25-33
At that time: Great crowds accompanied Jesus, and he tumed and said to them, "ti anyone comes to me and does not hate his own father and mother and wife and children and brothers and sisters, ves, and even his own life, he cannot be my disciple. Whoever does not bear his own cross and come after me cannot be my disciple. For which of you desiring to build a tower does not first sit down and count the cost, whether he has enough to complete it? Otherwise, when he has laid a foundation and is not able to finish, all who see it begin to mock him, saying. This man began to build and was not able to finish. Or what king going out to encounter another king in war, will not sit down first and deliberate whether he is able with ten thousand to meet him who comes against him with twenty thousand? And if not, while the other is yet a great way off, he sends a delegation and asks for terms of peace. So therefore, any one of you who does not renounce all that he has cannot be my disciple.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:“त्याग” हा ख्रिस्ताच्या अनुयायांचा मुख्य छापा आहे. ख्रिस्ताचा शिष्य होणे सोपे नाही. आपल्याला सर्वस्वाचा त्याग करून ख्रिस्ताला अनुसरावे लागते. आपली करोडाची संपत्ती सोडून कितीतरी मुले आणि मुली धर्मगुरु धर्मभगिनी होण्यासाठी सेमनेरीत, कॉनव्हेंटमध्ये जातात. काहीवेळेला आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा, तर काही वेळेला कुटुंबामधला पहिला मुलगा, कुटुंबाचा आधारच सेमनेरीत जातो. काही लोकांनी आपले ऐश्वर्य सोडून कॅन्सरग्रस्तांची सेवा करण्यास आपले जीवन समर्पित केले आहे. आपले घरदार सोडून अपंग, अनाथ उपेक्षितांची सेवा ते करत आहेत. जीवनात माझ्या आवडी निवडी, माझे कुटुंब, माझा पैसा, माझा व्यवसाय याला दुय्यम स्थान देऊनप्रत्येक क्षण फक्त दुसऱ्यांचा विचार करणे, दुसऱ्यांसाठी माझा पैसा, संपत्ती याचा वापर कसा होऊ शकेल यासाठी धडपडणे, अगदी लहान लहान गोष्टीमध्ये स्वतःच्या आवडीनिवडींचा त्याग करून दुसऱ्यांच्या सेवेसाठी मला कसे उपयोगी पडता येईल यासाठी दिवस रात्र झटणे हे ख्रिस्ताच्या अनुयायांकडून अपेक्षित आहे. आपण सर्व घरदार सोडावे असे अपेक्षित नाही पण आपल्या परीने जो काही शक्य आहे तेवढा त्याग आपण केला पाहिजे.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या