Marathi Bible Reading | 17th December 2023 | Third Sunday of Advent

 आगमन काळातील तिसरा  रविवार  

१७ डिसेंबर  २०२३

 "परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडणाऱ्यांची वाणी मी आहे."

I am the voice of one crying in the wilderness:



आनंद   (Joy ) 
तो स्वर्गीय  आनंद  घेऊन प्रभू येशू येत आहे

योहान आला तेव्हा लोक त्याला तारणारा खिस्त म्हणून समजले मात्र योहानाने हा मोठेपणा नम्रपणे नाकारला आणि सांगितले की, खिस्त माझ्या मागून येणार आहे. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील. त्याच्या पायतणाचा बंध सोडावयास मी योग्य नाही. योहान खोट्या प्रतिष्ठेपासून दूर राहिला. आज समाजात पदासाठी चढाओढ सुरू आहे. मीच कसा श्रेष्ठ हे पटवून देण्यासाठी बिनदिक्कतपणे खोट्याचा आधार घेतला जातो. योहानाने स्पष्टपणे सांगितले की, येणारा तारणारा हा जगाचा प्रकाश आहे. तो पापाच्या अंधकाराला दूर करणारा आहे. तो येणार म्हणून त्याचा मार्ग नीट करा. असे तो आवाहन करीत आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पॉल सांगत आहे निरंतर प्रार्थना करा. वाईटाच्या प्रत्येक गोष्टीपासून दूर रहा. बाप्तिस्म्याद्वारे मी ख्रिस्ताचा प्रकाश स्वीकारला आहे. माझा समाज खोट्या  प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन अंधकाराच्या मार्गाने जात असल्यास त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे का?
✝️             

पहिले वाचन : यशया ६१:१-२,१०-११

वाचक :  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"मी परमेशराठायी अत्यंत हर्ष पावतो."

प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्नहदयी जनाना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता आणि बंदिवानांना सुटका जाहीर करावी, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष आणि आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा म्हणून त्याने मला पाठवले आहे.

मी परमेश्वराच्याठायी अत्यंत हर्ष पावतो , माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेलापागोटे लेवून स्वत:ला याजकासारखा मंडित करतो आणि नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला विभूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली ओह. मला धार्मिकतेच्या झग्याने सजवले आहे, कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रादेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Isaiah 61:1-2a, 10-11

The Spirit of the Lord God is upon me because the Lord has anointed me to bring good news to the poor, he has sent me to bind up the broken hearted, to proclaim liberty to the captives, and the opening of the prison to those who are bound; to proclaim the year of the Lord's favour. I will greatly rejoice in the Lord; my soul shall exult in my God, for he has clothed me with the garments of salvation; he has covered me with the robe of righteousness, bridegroom decks himself like a priest with a beautiful headdress, and as a bride adorns herself with her jewels. For as the earth brings forth its sprouts, and as a garden causes what is sown in it to sprout up, so the Lord God will cause righteousness and praise to sprout up before all the nations. 
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  लूक १:४६-५०,५३-५४

प्रतिसाद : देवाच्या ठायी माझा जीव उल्हासला आहे. 

१) माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे,कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.

२) कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे.जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या आहे.

३) त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे. आपली दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला सहाय्य केले आहे.


Luke 1:46-48, 49-50, 53-54

My soul shall exult in my God.

My soul magnifies the Lord, 
and my spirit rejoices in God my Saviour
for he has looked on the humble estate of his servant. 
For behold, from now on all generations will call me blessed. R

For he who is mighty has done great things for me, 
and holy is his name.
And his mercy is for those who fear him 
from generation to generation.R

He has filled the hungry with good things, 
and the rich he has sent away empty. 
He has helped his servant Israel, 
in remembrance of his mercy.R


दुसरे वाचन   १ थेस्सलनीकाकरांस ५:१६-२४

वाचक :  पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन.

प्रिय जनहो, सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकारस्तुती करा. कारण तुम्हांविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. सर्व गोष्टीची पारख करा. बऱ्याला चिकटून राहा. वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.

शांतीचा देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव आणि शरीर ही निर्दोष राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे. तो हे करीलच.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading 1 Thessalonians 5:16-24

Brethren: Rejoice always, pray without ceasing, give thanks in all circumstances; for this is the will of God in Christ Jesus for you. Do not quench the Spirit. Do not despise prophecies, but test everything: hold fast what is good. Abstain from every form of evil. Now may the God of peace himself sanctify you completely, and may your whole spirit and soul and body be kept blameless at the coming of our Lord Jesus Christ. He who calls you is faithful; he will surely do it.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.
  आलेलुया!

Acclamation: 
The Spirit of the Lord is upon me, because he has anointed me to proclaim good news to the poor.

शुभवर्तमान  योहान  १:६-८.१९-२८
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला आहे.

पुढे यहुद्यांनी येरुशलेमहून याजक आणि लेवी ह्यांना योहानला 'आपण कोण आहा' असे विचारावयास पाठवले तेव्हा त्याची साक्ष हीच आहे. त्याने कबूल केले, नाकारले नाही. 'मी ख्रिस्त नाही' असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, "तर मग आपण कोण आहा ? एलिया आहा काय?" तो म्हणाला "मी नाही" "आपण तो संदेष्टा आहा काय?" त्यावर त्याने "नाही" असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, "ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहा हे सांगा स्वत:विषयी आपले काय म्हणणे आहे ?" तो म्हणाला, "यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, "परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडणाऱ्यांची वाणी मी आहे." पाठवलेली माणसे परुश्यांपैकी होत. त्यांनी त्याला विचारले, आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही आणि संदेष्टाही नाही, तर मग बाप्तिस्मा का करता ? योहानने त्यांना उत्तर दिले, "मी पाण्याने पाण्याने बाप्तिस्मा करतो ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हांमध्ये उभा आहे तो माझ्यामागून येणारा आहे. त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही." यार्देनच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : John 1:6-8, 19-28

There was a man sent from God, whose name was John. He came as a witness, to bear witness about the light, that all might believe through him. He was not the light, but came to bear witness about the light. And this is the testimony of John, when the Jews sent priests and Levites from Jerusalem to ask him, "Who are you?" He confessed, and did not deny, but confessed, "I am not the Christ." And they asked him, "What then? Are you Elijah?" He said, "I am not." "Are you the Prophet?" And he answered, "No." So they said to him, "Who are you? We need to give an answer to those who sent us. What do you say about yourself?" He said, "I am the voice of one crying out in the wilderness, 'Make straight the way of the Lord', as the prophet Isaiah said." (Now they hadsent from the Pharisees.) They asked him, "Then why are you baptising, if you are neither the Christ, nor Elijah, nor the Prophet?" John answered them, "I baptise with water, but among you stands one you do not know, even he who comes after me, the strap of whose sandal I am not worthy to untie." These things took place in Bethany across the Jordan, where John was baptising.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या शुभवर्तमानात "योहान बाप्तिस्ता" त्याची जीवनशैली व विनम्रवृत्ती आपल्या सर्वांच्या मनन - चिंतनासाठी उपयुक्त ठरणार आहे. यहुद्यांनी निवडक याजक व लेवी ह्यांना योहानाकडे "आपण कोण आहात?" असे विचारावयास सांगितले. योहान उत्तर देतो, "तो मी नाही.” "तो मी नाही" असे उत्तर देऊन योहान स्वतःहुन बहाणा करीत नाही. यशया संदेष्टा ४०:३ मधील वचनाचा उल्लेख करताना योहान सांगत आहे की, "अरंण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते. परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा.” योहानाने देवाला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू ठेवलेला होता. योहान बाप्तिस्ताची ओळख करून देण्यासाठी संत योहानाच्या शुभवर्तमानात एकूण तीन प्रतिमा वापरण्यात आलेल्या आहेत. 
१) अरंण्यात ओरडणाऱ्याची वाणी, 
२) चमकणारा दिवा, 
३) वराचा मित्र. या तिन्ही प्रतिमा येशूच्या जीवन व कार्याशी निगडीत आहेत. योहान वाणी असेल तर येशू देवाचा जिवंत शब्द आहे. योहान दिवा असेल तर येशू जगाचा प्रकाश आहे. योहान वराचा मित्र असेल तर येशू प्रत्यक्ष वर आहे. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात योहानाला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला तो “मी नाही” असे उत्तर देतो. कारण पुढे "मी... आहे” असे म्हणणारा येशू अवतरणार आहे. आपण देखील योहानाप्रमाणे येशूच्या स्वागतासाठी विनम्रपणे तयारी करावी.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या तारणदायी  प्रकाशात वाढत राहण्यास व तुझी साक्ष इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन,

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या