Marathi Bible Reading | Saturday 16th December 2023 | Second Week of Advent

 आगमनकाळातील दुसरा सप्ताह 

शनिवार १६ डिसेंबर २०२३.

  ✝️ 

  मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल."
So also the Son of Man will certainly suffer at their hands." 

संत ऍडलेड विधवा हिचा सणं

 ✝️
पाण्याचा बात्पिस्मा देऊन योहानाने परमेश्वराचा मार्ग तयार करण्यासाठी त्या काळच्या जनतेला आवाहन केले. परंतु  कठोर अंत:करणाच्या लोकांनी त्याला ओळखले नाही.  प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा व जीवन दाता आहे. ज्याने आपल्या क्रुसावरील समर्पणाद्वारे सर्व प्रकारच्या बंधनातून आपल्याला मुक्त केले आहे. प्रभू येशू म्हणतो, 'लोकांनी त्याला ओळखले नाही.' आपण आज ह्या वचनावर चिंतन करु या.


पहिले वाचन बेन सिरा  ४८:१-४,९-११
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"एलिया पुन्हा येईल.”
एलिया भविष्यवादी अग्नीप्रमाणे उठला आणि त्याचे शब्द मशालीप्रमाणे जळत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि त्याने आपल्या आस्थेने त्यांची संख्या कमी करून घेतली. त्याच्यामुळे प्रभूने आज्ञा केली आणि आकाशाचे दरवाजे बंद झाले आणि तीन वेळा अग्नीचा वर्षावसुद्धा करून घेतला. हे एलिया, तुझ्या अद्भुत कार्यांनी तू किती महान होतास !
अग्नीच्या चक्रवातामधून, ज्वालामय अश्वाच्या रथातून तुला वर घेतले गेले. तुझ्याविषयी असे लिहिले गेले आहे की, देवाचा कोप प्रज्वलित होण्याच्या अगोदर तो शांत करण्यासाठी, मुलाचे मन पित्याकडे वळविण्यासाठी आणि याकोबची कुळे पुनः प्रस्थापित करण्यासाठी तू नेमलेल्या वेळी तयार असशील जे प्रेमाने नटवले आहेत आणि ज्यांनी तुला पाहिलेले आहे ते धन्य होत कारण आम्हीसुद्धा निश्चित जगणार आहोत.

प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Sirach 48:1-4, 9-11b

In those days: The prophet Elijah arose like a fire, and his word burned like a torch. He brought a famine upon them, and by his zeal he made them few in number. By the word of the Lord he shut up the heavens, and also three times brought down fire. How glorious you were, O Elijah, in your wondrous deeds! And who has the right to boast that which you have? You who were taken up by a whirlwind of fire in a chariot with horses of fire; you who are ready at the appointed time, it is written, to calm the wrath of God before it breaks out in fury to turn the heart of the father to the son, and to restore the tribes of Jacob. Blessed are those who saw you and those who have been fallen asleep in love.

This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र :८०:२-३,१५-१६,१८-१९
प्रतिसाद :  प्रभो, आम्हांला पूर्वस्थितीवर आण.
१) हे इस्राएल राष्ट्रांच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे.
करुबासनावर विराजमान झालेल्या परमेश्वरा,
आम्हांला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे. 
तुझा पराक्रम गाजव आणि 
आमचा उद्धार करायला धावून ये. 

२) हे सर्वसमर्थ देवा, मागे फीर, 
स्वर्गातून नजर टाकून बघ. 
या द्राक्षलतेची, आपल्या उजव्या हाताने 
लावलेल्या रोपाची काळजी घे. 

३ ) तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी 
समर्थ केलेल्या मानवावर 
तुझा वरदहस्त दे. पुन्हा काही आम्ही
 तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही. 
आम्हांला नवजीवन दे
म्हणजे आम्ही तुझ्या नामाचा धावा करू.

३) पण दुर्जनांचे ते मुळीच नाही 
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. 
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.


Psalm Psalm 80:2ac and 3b, 15-16a, 18-19

R     O God, bring us back; let your face shine on us, and we shall be saved.

O shepherd of Israel, hear us, 
enthroned on the cherubim, shine forth. 
Rouse up your might and come to save us. R

 God of hosts, turn again, we implore;
 look down from heaven and see. 
Visit this vine and protect it,
 the vine your right hand has planted. R

May your hand be on the man at your right hand,
 the son of man you have confirmed as your own. 
And we shall never forsake you again;
 give us life that we may call upon your name. R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे. 
पाहा, तो आमचे तारण करण्यास येत आहे. 
आलेलुया!

Acclamation: 
 Prepare the way of the Lord, make his paths straight and all flesh shall see the salvation of God.
.
शुभवर्तमान मत्तय १७:१०-१३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला कधीच ओळखले नाही."

पर्वतावरून खाली येत असताना शिष्यांनी येशूला विचारले, “मग एलिया यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत ?"
येशूने उत्तर दिले, "एलिया येईल आणि सारे काही स्थिरस्थावर करील, पण मी तुम्हांला सांगतो. एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले. मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल." येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहान विषयी बोलत आहे हे तेव्हा कोठे शिष्यांच्या लक्षात आले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 17:10-13

As they were coming down the mountain, the disciples asked Jesus, "Then why do the scribes say that first Elijah must come?" He answered, "Elijah does come, and he will restore all things. But I tell you that Elijah has already come, and they did not recognise him, but did to him whatever they pleased. So also the Son of Man will certainly suffer at their hands." Then the disciples understood that he was speaking to them of John the Baptist.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:"आजची दोन्ही वाचने एलिया संदेष्ट्याचा उल्लेख करतात. यहुदी समाजातील एलिया संदेष्ट्याच्या आगमनाविषयी खूप उत्सुकता होती. यहुद्यांना वाटायचे की मसिहाच्या आगमनापूर्वी एलिया येईल (मलाखी ४:५.) “तो वडिलांचे हृदय त्याच्या पुत्राकडे व पुत्राचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवील” (मलाखी ४:६) असे म्हटले आहे. गॅब्रिएल देवदूत जखऱ्याला योहान बाप्तिस्ताच्या मिशन कार्याविषयी लूकमध्ये सांगत आहे. “बापाची अंतःकरणे मुलांकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने वसामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल” (लूक १:१७). या संदर्भावरून यांच्यात बऱ्याचप्रकारे साम्य दिसते. दोघेही पश्चातापाचा उपदेश करतात आणि हृदय बदलण्याचे आवाहन करतात. दोघांचा धार्मिक नेते व नागरी राज्यकर्ते यांच्याकडून छळ झाला. ख्रिस्ती धर्मियांसाठी संत योहान बाप्तिस्ताच्या रूपात एलिया आलेला आहे. त्याने आपल्या जन्माने व दुःखसहनाने येशूच्या आगमनाची सुवार्ता घोषविली.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, अंतर्मनाने तुला ओळखण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या