Marathi Bible Reading | 25th December 2023 | Nativity of Lord Jesus

 २५ डिसेंबर २०२३ 

सोमवार 

(ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा)


जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, 

"Glory to God in the highest, and on earth peace among those with whom he is pleased!"



"शब्द मनुष्य झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली."

✝️


आपण आनंद आणि उल्हास करु या कारण आता देवाचा शोध घेण्यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही. आपले शरीर, मन, बुध्दी आणि अंत:करणाची प्रत्येक हालचाल, आपले विचार व कृती याद्वारे प्रभूचे अस्तित्व जाणण्याचा व अनुभवण्याचा प्रयत्न करु या. तो आहे, अगदी आपल्याबरोबर आणि आपल्यामध्ये आहे. आपल्या सर्वांच्या जीवनाशी तो एकरुप झाला आहे. तो आपल्या परस्परांच्या बोलण्यामध्ये आहे. तो आपल्या कामामध्ये आहे. तो आपल्याबरोबर सहभोजन करीत आहे. तो आपल्याबरोबर प्रवासात आहे. तो अनेकांमार्फत बोलत आहे. तो सर्वकाही ऐकत आहे. निरागस बालकांमध्ये तो दिसत आहे. निसर्गातील प्रत्येक हालचालीतून त्याची  चाहूल लागत आहे. तो आपल्या सुख-दुःखाशी एकरुप झाला आहे. अशा प्रकारे प्रभु येशूचे आपल्या मधीलअस्तित्व आपण अनुभवण्याचा आज प्रयत्न करु या.
आपल्याला प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा आनंद इतरांबरोबर वाटता यावा आणि त्याचे अस्तित्व अनुभवता यावे म्हणून सतत प्रयत्नशील राहू या
✝️             

मध्यरात्र- यशया ९२: २-४, ६-७, स्तोत्र ९६: १-३,११-१३, तित २:११-१४, लूक २:१-१४

पहाट- यशया ६२: ११-१२, स्तोत्र ९७:१,६,११-१२, तित ३:४-७,

लूक २:१५-२०

दिवस- यशया ५२:७-१०, स्तोत्र ९८:१-६, इब्री १:१-६, योहान १:१-१८।

पहिले वाचन : यशया ५२:७-१०

वाचक :  यशयाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"अखिल जगात देवाने केलेले तारण दिसेल."

जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनला म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत. कारण परमेश्वर सियोनला परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत. येरुशलेमच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा. सर्व मिळून गा. कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरुशलेमला उद्धारले आहे. परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे. साऱ्या सृष्टीला आमच्या देवाने केलेले तारण दिसून येईल.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Iaiah 9:1-6

The people who walked in darkness have seen a great light; those who dwelt in a land of deep darkness, on them has light shone. You have multiplied the nation; you have increased its joy; they rejoice before you as with joy at the harvest, as they are glad when they divide the spoil. For the yoke of his burden, and the staff for his shoulder, the rod of his oppressor, you have broken as on the day of Midian. For every boot of the tramping warrior in battle tumult and every garment rolled in blood will be burned as fuel for the fire. For to us a child is born, to us a son is given; and the government shall be upon his shoulder, and his name shall be called Wonderful Counsellor, Mighty God, Everlasting Father, Prince of Peace. Of the increase of his government and of peace there will be no end, on the throne of David and over his kingdom, to establish it and to uphold it with justice and with righteousness from this time forth and for evermore. The zeal of the Lord of hosts will do this.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  स्तोत्र ९६:२-५,२७.२९

प्रतिसाद : सर्व दिशांनी देवाचे तारण पाहिले आहे

१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.

२) परमेश्वराने स्वत: सिद्ध केलेले तारण प्रकट केले आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया व सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.

३)पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे. अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वराने, आनंदाने गा.

४)परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा. वीणेवर सुस्वर स्तोत्र वाजवा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा.


Psalm 96:1-2a, 2b-3, 11-12a, 12b-13

Unto us is born this day a Saviour, who is Christ the Lord.

O sing a new song to the Lord; sing to the Lord, all the earth. O sing to the Lord; bless his name. Proclaim his salvation day by day. Tell among the nations his glory, and his wonders among all the peoples.

Let the heavens rejoice and earth be glad; let the sea and all within it thunder praise Let the land and all it bears rejoice.

Then will all the trees of the wood shout for joy at the presence of the Lord, for he comes, he comes to judge the earth. He will judge the world with justice; he will govern the peoples with his truth. R



दुसरे वाचन इब्री लोकांस १:१-६ 

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

देव प्राचीन काळी अंशाअंशानी व प्रकाराप्रकारांनी व संदेष्ट्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले हे त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारसाहक्काने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले :

"तू माझा पुत्र आहेस,

आज मी तुला जन्म दिला आहे?" आणि पुन्हा "मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल ?" आणि तो पुन्हा श्रेष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो :

"देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत."

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading Titus 2:11-14

Beloved: The grace of God has appeared, bringing salvation for all people, training us to renounce ungodliness and worldly passions, and to live self-controlled, upright, and godly lives in the present age, waiting for our blessed hope, the appearing of the glory of our great God and Saviour Jesus Christ, who gave himself for us to redeem us from all lawlessness and to purify for himself a people for his own possession who are zealous for good works.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे. राष्ट्रांनो या, प्रभूला नमन करा. कारण आज जगावर महातेज पसरले आहे.
  आलेलुया!

Acclamation: 
I bring you good news of great joy: for unto us is born this day a Saviour, Christ the Lord.


शुभवर्तमान  योहान १:१-१८
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

(प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीच नाही. त्याच्याठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्रांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.) देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी श्रद्धा ठेवावी. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. (जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात  होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. आपल्या स्वकीयांकडे तो आला तरी त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा यांपासून झाला नाही, तर देवापासून झाला आणि शब्द मानव झाला, त्याने आम्हांमध्ये वस्ती केली व आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य त्यांनी परिपूर्ण होते.) त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि जाहीररीत्या म्हणतो : जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्या विषयी मी सांगितले, तो हाच आहे. कारण नियमशास्त्र मोशेद्वारे देण्यात आले होते. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 2:1-14

In those days a decree went out from Caesar Augustus that all the world should be registered. This was the first registration when Quirinius was governor of Syria. And all went to be registered, each to his own town. And Joseph also went up from Galilee, from the town of Nazareth, to Judea, to the city of David, which is called Bethlehem, becausehe was of the house and lineage of David, to be registered with Mary, his betrothed, who was with child. And while they were there, the time came for her to give birth. And she gave birth to her firstborn son and wrapped him in swaddling cloths and laid him in a manger, because there was no place for them in the inn. And in the same region there were shepherds out in the field, keeping watch over their flock by night. And an angel of the Lord appeared to them, and the glory of the Lord shone around them, and they were filled with great fear. And the angel said to them, "Fear not, for behold, I bring you good news of great joy that will be for all the people. For unto you is born this day in the city of David a Saviour, who is Christ the Lord. And this will be a sign for you: you will find a baby wrapped in swaddling cloths and lying in a manger." And suddenly there was with the angel a multitude of the heavenly host praising God and saying, "Glory to God in the highest, and on earth peace among those with whom he is pleased!"
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना चार शुभवर्तमानापैकी केवळ मत्तय व लूक या दोनच शुभवर्तमानात सापडते. दोन्ही सुवार्तीकांनी प्रभू जन्माची गोष्ट अतिशय साध्या भाषेत सांगितली आहे. योहान शुभवर्तमान हे चिन्हांचे व आध्यात्मिक स्वरूपाचे शुभवर्तमान असल्याने त्यात जरी प्रभू येशूच्या जन्माची घटना लूक व मत्तय या शुभवर्तमानासारखी नसली तरी योहान प्रतिकात्मक भाषेचा उल्लेख करीत आहे. जन्मण्यापूर्वी येशू देवासह असून साक्षात देव होता ही गोष्ट नजरेआड होता कामा नये ह्याची तो काळजी घेतो. "शब्द देह झाला व त्याने आम्हांमध्ये वस्ती केली" अशा गहन शब्दात तो प्रभूजन्माची कथा शब्दबद्ध करतो. आज तोच देवाचा शब्द प्रत्यक्ष देहधारण करून आपल्या तारणासाठी आला आहे. डोंगरावर मेंढराना घेऊन गेलेले मेंढपाळ यांना प्रकाशाच्या रूपात देवदुतांचे दर्शन घडले. कारण जन्माला आलेला प्रभू येशू हा जगाचा प्रकाश आहे. हे त्यांनी कबूल करून प्रकाशरूपी ख्रिस्ताचा स्वीकार केला. योहान आपल्या शुभवर्तमानात येशूसाठी (प्रकाश), शब्द, कृपा, सत्य, जीवन असे शब्द वापरतो तर जगासाठी अंधार, दुष्कृत्ये, स्वकीय, स्वीकार न करणे इत्यादी शब्दवापरतो. आजची वाचने पापांच्या अंधारातून येशूरूपी प्रकाशाकडे वाटचाल करण्यास खुणावत आहेत. येशू मानव बनून आपल्या जीवनाशी एकरूप झाला. अशावेळी आपण देखील त्यांच्यासारखे, निर्मळ व शांतीस्वरूप बनून देवाच्या आज्ञेत राहावे. बाळ येशूचे दर्शन सर्वप्रथम मेंढपाळांना घडले कारण त्यांनी देवदूताच्या शब्दावर विश्वास ठेवला. शांतीपुत्र प्रभू येशू आपल्यात वस्ती करतो कारण त्याने अंधारावर मात करून आपल्याला प्रकाशरूपी दिवा दिलेला आहे. ख्रिस्तजन्माने सर्व वातावरण प्रकाशित झालेले आहे. हा आनंद आपण दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू या.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वर, आमच्या तारणासाठी तू आपल्या पुत्राला आम्हामध्ये  पाठविले. त्याचे अस्तित्व आणि प्रेम अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

नाताळ  सणाच्या हार्दिक शुभेच्छा  -

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या