आगमन काळातील पहिला रविवार
३ डिसेंबर २०२३
तो अकस्मात आला तर त्याला तुम्ही झोपलेले सापडू नये म्हणून दक्ष राहा.
in the morning-lest he come suddenly and find you asleep. And what I say to you I say to all: Stay awake."
आशा (Hope )
आशेचे किरण घेऊन प्रभू येशू येत आहे
आजपासून आगमन काळाला आपण सुरुवात करीत आहोत. प्रभू ख्रिस्ताला पुन्हा एकदा नव्याने स्वीकारण्यासाठी आपण आपल्या मनाची आणिअंत:करणाची तयारी करणार आहोत. प्रभू आपले नुतनीकरण करण्यासाठी पुन्हा येत आहे. त्याच्या स्वागतासाठी आपण दक्ष व जागृत असावे म्हणून प्रभू येशू प्रवासाला निघालेल्या घर धन्याचा दृष्टांत देऊन सर्वांना जागृत राहण्याचे आवाहन करीत आहे. ह्या जगातील स्वार्थ, अहंकार, जागतिक वैभवाचा मोह अशा सर्व प्रकारच्या दुष्टाईच्या चक्रात आपण सुद्धा अडकून पडतो. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी (परोपकार, प्रेम व सेवा) बाजूला सारून आपण देवापासून बहकतो किंबहुना देवाला व त्याच्या कृपेला पारखे होतो. अशावेळी प्रभू आज ईशारा देत आहे
आपण सर्वदा सावध असावे म्हणून प्रभू आपल्याला आवाहन करीत आहे. । आपल्या सर्वांना अनंत काळच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पाचारण आहे. ह्या आगमन काळात आपल्या जीवनाचे सिंहावलोकन करु या. आणि प्रभूच्या स्वागतास तयार राहू या.
✝️
पहिले वाचन : यशया : ६३: १६ व-१७,६४: १-३,८
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. 'आमचा त्राता' हे तुझे प्राचीन काळापासून नाम आहे. हे परमेश्वरा, आम्हांला तुझ्या मार्गातून का बहकू देतोस? आम्ही तुझे भय बाळगू नये इतकी आमची मने कठोर का करतोस? तुझे सेवक, तुझे वतन झालेले वंश, यांच्याकरिता परत ये. तू आकाश छेदून खाली उतरला असतास तर तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही किंवा त्याचे नाव कानी आलेले नाही, अथवा कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. जो आवडीने धर्माचरण करतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात त्यांना तू भेट देतोस. पाहा, तू आम्हांवर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो. ह्या स्थितीत आम्ही बराच काळ आहोत तर आमचा उद्धार होईल काय? आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्ये गलिच्छ वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हाला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. तुझा धावा करणारा कोणी नाही. तुझा आश्रय घेण्यासाठी कोणी स्वत:ला जागृत करीत नाही. कारण तू आपले मुख आम्हांपासून लपविले आहेत. आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहे. तरीसुद्धा, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही माती आहोत. तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत.
First Reading : Isaiah 63:16b-17; 64:1, 3b-8
You, O Lord, are our Father, our Redeemer from of old is your
name. O Lord, why do you make us wander from your ways and harden our heart, so that we fear you not? Return for the sake of your servants, the tribes of your heritage. Oh that you would rend the heavens and come down, that the mountains might quake at your presence. You came down, the mountains quaked at your presence. From of old no one has heard or perceived by the ear, no eye has seen a God besides you, who acts for those who wait for him. You meet him who joyfully works righteousness, those who remember you in your ways. Behold, you were angry, and we sinned; in our sins we have been a long time, and shall we be saved? We have all become like one who is unclean, and all our righteous deeds are like a polluted garment. We all fade like a leaf, and our iniquities, like the wind, take us away. There is no one who calls upon your name, who rouses himself to take hold of you, for you have hidden your face from us, and have made us melt in the hand of our iniquities. But now, O Lord, you are our Father, we are the clay, and you are our potter, we are all the work of your hand.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८०:२.३,१५-१६,१८-१९
प्रतिसाद : हे समर्थ देवा, आम्हांला पूर्व स्थितीवर आण.
१) हे इस्राएल राष्ट्राच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे. करुबासनावर विराजमंजान झालेल्या परमेश्वरा, आम्हांला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे. उद्धार करायला धावून ये.
२) हे सर्वसमर्थ देवा, पुन्हा मागे फीर, स्वर्गातून नजर टाकून बघ,
या द्राक्षलतेची, आपल्या उजव्या हाताने लावलेल्या रोपांची काळजी घे.
३) तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी समर्थ केलेल्या मानवावर तुझा वरदहस्त राहू दे. पुन्हा कधी आम्ही तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही. आम्हांला नवजीवन दे
Psalm Psalm 80:2ac and 3b, 15-16, 18-19
O God, bring us back, let your face shine on us, and we shall be saved.
O shepherd of Israel, hear us,
enthroned on the cherubim, shine forth
Rouse up your might and come to save us. R
God of hosts, turn again, we implore;
look down from heaven and see.
Visit this vine and protect it,
the vine your right hand has planted,
the son of man you have claimed for yourself. R
May your hand be on the man at your right hand,
the son of man you have confirmed as your own.
And we shall never forsake you again;
give us life that we may call upon your name.R
दुसरे वाचन १करिंथकरांस :१:३-९
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
बंधुजनहो, देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हांला कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये तुम्हावर झालेल्या देवाच्या कृपेमुळे मी तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो. ती कृपा ही की, जसजशी खिस्ताविपयीची साक्ष तुम्हांमध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात आणि सर्व ज्ञानात संपन्न झाला आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानांत उणे पडला नाहीत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून शेवटपर्यंत तोच तुम्हांला दूढ राखील. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू यांच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वासपात्र आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
Second Reading 1 Corinthians 1:3-9
Brethren: Grace to you and peace from God our Father and the Lord Jesus Christ. I give thanks to my God always for you because of the grace of God that was given you in Christ Jesus, that in every way you were enriched in him in all speech and all knowledge even as the testimony about Christ was confirmed among you - so that you are not lacking in any gift, as you wait for the revealing of our Lord Jesus Christ, who will sustain you to the end, guiltless in the day of our Lord Jesus Christ. God is faithful, by whom you were called into the fellowship of his Son, Jesus Christ our Lord.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव दे. तू सिद्ध केलेले तारण आम्हाला प्रदान कर
Acclamation: Let us see, O Lord, your mercy, and grant us your salvation.
शुभवर्तमान मार्क १३:३३- ३७
वाचक :मार्कलिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सावध राहा कारण घराचा यजमान कधी येईल ती घटका तुम्हांला माहीत नाही."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला "सावध राहा, कारण ती घटका केव्हा येईल हे तुम्हाला माहीत नाही, एखादा माणूस प्रवासाला निघतो. घर सोडतेवेळी तो ते नोकराच्या ताब्यात देतो. प्रत्येकाने आपले काम करायचे असते. दारावरच्या पाहरेकऱ्याला तो दक्ष राहायची आज्ञा करतो. तसेच हे आहे. कारण घराचा यजमान संध्याकाळी येईल की मध्यरात्री येईल, पहाटे कोंबडा आरवण्याच्या वेळी येईल की सकाळी येईल, हे तुम्हाला माहीत नाही. जर तो अकस्मात आला तर त्याला तुम्ही झोपलेले सापडू नये म्हणून दक्ष राहा. मी जे तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो. दक्ष राहा.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Mark 13:33-37
At that time: Jesus said to his disciples: "Be on guard, keep awake. For you do not know when the time will come. It is like a man going on a journey, when he leaves home and puts his servants in charge, each with his work, and commands the doorkeeper to stay awake. Therefore stay awake - for you do not know when the master of the house willcome, in the evening, or at midnight, or when the cock crows, or in the morning-lest he come suddenly and find you asleep. And what I say to you I say to all: Stay awake."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजपासून आपण नवीन उपासना वर्षाला सुरुवात करीत आहोत. आगमन काळ हा येशूच्या तयारीचा काळ म्हटला जातो. आपल्या बाह्य स्वच्छतेपेक्षा आंतरिक मनाची स्वच्छता याकडे भाविकांनी लक्ष द्यावे अशी खिस्तसभेची शिकवणुक आहे. २५ डिसेंबर पूर्वी येणारे चार रविवार हे आगमन काळातील पहिला, दुसरा, तिसरा व चौथा रविवार अशा नावाने ओळखले जातात. आगमन काळाचे मुख्य दोन भाग आहेत.
१) आगमन काळातील पहिल्या रविवार पासून ते १६ डिसेंबर पर्यंतः या काळात ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या पुनरागमनाची तयारी करण्यासाठी श्रद्धावंतांना मार्गदर्शन करते.
२) १७ ते २४ डिसेंबर पर्यंतः या काळात ख्रिस्तसभा "येशूच्या पहिल्या येण्याची" स्मृती साजरी करते. आपली खिस्तसभा (आपण) सर्वजण यात्रेकरू आहे. या यात्रेमध्ये आपल्याला तीन प्रकारचे अनुभव येतात. एकाकीपणाचा, आशेचा आणि शेवटी सावधगिरीचा अनुभव येणार आहे. आपल्या अडचणीमध्ये आपल्याला नेहमी वाटते की देवाने आपल्याला सोडून दिलेले आहे. देव आपल्याला एकाकी टाकत नाही तर आपण देवाला सोडून जात असतो. इस्रायल लोकं देवाची निवडलेली प्रजा होती. त्याच्या प्रवासात त्यांच्यावर परकियांनी जेव्हा हल्ले केले तेव्हा त्यांना वाटायचे की देव आपल्याला सोडून गेलेला आहे. आपल्या जीवनातील एकाकीपणा हा निष्काळजी- पणाचा परिणाम असू शकतो. देवाने मानवाला नव्हे तर मानवाने देवाला सोडलेले असते. अशाही परिस्थितीत "दुसरे विश्व शक्य आहे" ह्या आशेने वाटचाल करीत राहायचे असते. याचा अर्थ जीवनात बेफिकीर राहायचे नाही. प्रभू कोणत्याही क्षणी येईल, तेव्हा सावध राहा व तयारी करा.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या आगमनाची तयारी करुन तुझी साक्ष जगाला देण्यास आम्ही सर्वदा तयार असावे म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या