आगमनकाळातील पहिला सप्ताह
सोमवार ४ डिसेंबर २०२३
“महाराज, आपण माझ्या छपराखाली यावे एवढी माझी योग्यता नाही.
"Lord, I am not worthy to have you come under my roof,
✝️
John of Damascus
संत जॉन दमासिन
वर्तनसाक्षी, धर्मपाल व धर्मपंडित (६५०-७५३)
आत्यंतिक तळमळीने केलेल्या प्रार्थनेविना केवळ बुद्धीच्या जोरावर केलेला विचार ही मेंदूची शुष्क करामत वा कसरत ठरते. जशी वाऱ्याने एखादी मेणबत्ती विझावी तसे नम्र, शांत अशा आत्मिक प्रार्थनेने ज्ञानाचा गर्वही नाहीसा होतो. - संत जॉन दमासिन
✝️
पहिले वाचन : यशया २ :१-५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभू सर्व राष्ट्रांना परमेश्वराच्या चिरशांतीच्या राज्यात एकत्रित करतो."
आमोजचा पुत्र यशया याला यहुदा आणि येरुशलेम याविषयी प्राप्त झालेले दृष्टान्तवचन शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा पर्वत, पर्वतांच्या शिखरांवर स्थापण्यात येईल आणि सर्व पर्वतांहून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील, देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील आणि म्हणतील, “चला, परमेश्वराने आपले मार्ग आम्हांला शिकवावेत आणि आम्ही त्याच्या मार्गाने चालावे, म्हणून आपण त्याच्या पर्वताकडे, याकोबच्या देवाच्या निवासस्थानी जाऊ या.' कारण सियोनातून धर्मशास्त्र आणि येरुशलेमातून परमेश्वराचे वचन निघेल तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील. देशोदेशीच्या लोकांचा न्याय करील आणि ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांवर तरवार उचलणार नाही. ते यापुढे युद्धकला शिकणार नाहीत. याकोबच्या घराण्या चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. मेघ आणि रात्रीसाठी प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील. त्याच्या सर्व वैभवावर छत्र असेल आणि दिवसा ऊन लागू नये, सावली मिळावी आणि वादळ आणि पाऊस यापासून रक्षण व्हावे, निवारा आणि आश्रय असावा म्हणून हा मंडप घालण्यात येईल.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 2:1-5
The word that Isaiah the son of Amoz saw concerning Judah and Jerusalem It shall come to pass in the latter days that the mountain of the house of the Lord shall be established as the highest of the mountains, and shall be lifted up above the hills; and all the nations shall flow to it, and many peoples shall come, and say: "Come, let us go up to the mountain of the Lord, to the house of the God of Jacob, that he may teach us his ways and that we may walk in his paths." For out of Zion shall go forth the law, and the word of the Lord from Jerusalem. He shall judge between the nations, and shall decide disputes for many peoples; and they shall beat their swords into ploughshares, and their spears into pruning-hooks; nation shall not lift up sword against nation, neither shall they learn war any more. O house of Jacob, come, let us walk in the light of the Lord.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२२:१-४,८-९
प्रतिसाद : चला, आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ.
१) “चला आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.
२ ) हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी
तू बांधलेली आहेस. इस्रायला घालून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नावाने
उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात.
३) माझे बंधू आणि माझे मित्र यांच्याकरिता
“तुझ्यामध्ये शांती वसो!” अशी मी प्रार्थना करीन.
परमेश्वर आमचा देव याच्या मंदिराकरिता
आणि तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.
Psalm 122:1-2, 4-5, 6-7, 8-9
. Let us go rejoicing to the house of the Lord.
I rejoiced when they said to me,
"Let us go to the house of the Lord."
And now our feet are standing
within your gates, O Jerusalem, R
Jerusalem is built as a city
bonded as one together.
It is there that the tribes go up,
the tribes of the Lord. R.
For Israel's witness it is
to praise the name of the Lord.
There were set the thrones for judgment,
the thrones of the house of David.
For the peace of Jerusalem pray,
"May they prosper, those who love you"
May peace abide in your walls,
and security be in your towers.
For the sake of my family and friends,
let me say, "Peace upon you."
For the sake of the house of the Lord, our God,
I will seek good things for you. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे समर्थ देवा, आम्हांला पूर्व स्थितीवर आण तुझी कृपादृष्टी आम्हांवर वळव म्हणजे आमचे तारण होईल.
आलेलुया!
Acclamation:
Come to save us, Lord our God, let your face shine on us, and we shall be saved
.
शुभवर्तमान मत्तय ८: ५-११
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अनेकजण स्वर्गराज्यात येतील "
येशू कफर्णहूम गावात आला, तेव्हा एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि याचना करू लागला, महाराज, माझा चाकर पक्षघाताने घरात पडून आहे आणि त्याला भयंकर वेदना होत आहेत.
येशू त्याला म्हणाला, “मी येतो आणि त्याला बरे करतो.”
पण तो शताधिपती त्याला म्हणाला, “महाराज, आपण माझ्या छपराखाली यावे एवढी माझी योग्यता नाही. आपण एक शब्द फक्त उच्चारा म्हणजे माझा चाकर बरा होईल. मी एक हुकमाचा ताबेदार आहे. माझ्या हाताखाली सेवक आहेत. एखाद्याला मी जा म्हणालो, की तो जातो; दुसऱ्याला ये म्हणालो, की तो येतो; चाकराला म्हटले, हे कर, की तो ते करतो."
हे ऐकूण येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्यामागे येणाऱ्यांना तो म्हणाला “मी तुम्हांला खरे सांगतो, एवढी जबरदस्त श्रद्धा मला इस्राएलातही आढळली नाही. मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून अनेकजण येतील आणि आब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याबरोबर स्वर्गराज्यात पंगतीला बसतील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 8:5-11
At that time: When Jesus had entered Capernaum, a centurion came forward to him, appealing to him, "Lord, my servant is lying paralysed at home, suffering terribly." And he said to him, "I will come and heal him." But the centurion replied, "Lord, I am not worthy to have you come under my roof, but only say the word, and my servant will be healed. For I too am a man under authority, with soldiers under me. And I say to one, 'Go', and he goes, and to another, 'Come, and he comes, and to my servant, 'Do this', and he does it." When Jesus heard this, he marvelled and said to those who followed him, "Truly, I tell you, with no one in Israel have I found such faith. I tell you, many will come from east and west and recline at table with Abraham, Isaac, and Jacob in the kingdom of heaven.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:"माणसाने सारे जग कमावले आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ” (मत्तय १६:२६). या अमृत वचनाने ज्यांच्या जीवनाचा कायापालट झाला तो संत म्हणजे संत फ्रान्सिस झेवियर. आपलं तन-मन सर्वकाही ऐहिक गोष्टीमध्ये गुरफुटून जागतिक सुखाच्या मागे धावणारा फ्रान्सिस मोठ्या आत्मविश्वासाने गगनाला गवसणी घालून सर्वकाही जिंकण्याच्या इरादाने कार्य करीत होता. परंतु येशूच्या या वचनाने व संत इग्नेशिअसच्या शिकवणीचा त्याच्यावर एवढा प्रभाव पडला की येशूसाठी एक एक आत्मा मिळविण्याकरिता तो तळमळू लागला. धर्मगुरू म्हणून तो भारतामध्ये स्थिरावला. धर्मशिक्षण व त्यानंतर बाप्तिस्मा घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्याकडे येऊ लागले. लोकांची तळमळ पाहून एका प्रसंगाने फ्रान्सिसने इग्नेशिअसला एक पत्र लिहून कळवळे, मला युरोपमधील युनिव्हसिर्टीमध्ये जाऊन तेथे ओरडून सांगावेसे वाटते, “अहो विज्ञानांनो, बंद करा तुमचा अभ्यास ! बाहेर पडा आणि लोकांस प्रभूची सुवार्ता सांगा. अनेक लोक येथे तुमची वाट पाहात आहेत.” प्रभूने म्हटले आहे, “पीक भरपूर आहे, परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकांसाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुला शरण येण्यास व श्रद्धेत दृढ बनण्यास मला कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या