Marathi Bible Reading | Monday 11th December 2023 | Second Week of Advent

 आगमनकाळातील दुसरा सप्ताह 

सोमवार ११  डिसेंबर २०२३.

  ✝️ 
"हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे."

he said, "Man, your sins are forgiven you.


संत दमास्कस पहिले

परमगुरू, वर्तनसाक्षी (३०४-३८४) 

✝️
ग्रीस देशामध्ये प्रेषितीय कार्य करण्यासाठी एखादा धर्मगुरू पाठविण्याचे धाडस करणारे संत दमास्कस हे पहिलेच पोप होते आणि तेही कॉन्स्टेन्टिनोपलच्या पेट्रिआर्कच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या हेतूने, हेही तितके महत्त्वाचे आहे.

विधवा आणि अनाथांकडून कोणत्याही देणग्या आणि भेटवस्तू मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशी सक्त ताकीद त्यांनी आपल्या धर्मगुरूंना दिलेली होती. सर्व प्रकारची धार्मिक प्रकरणे हाताळण्याचा अधिकार पोपना असावा हेही त्यांनीच कायद्याच्या साच्यात बसविले.

त्यांच्या काळात संत जेरोम रोम शहरात आला. काही काळापर्यंत तो पोपमहाशयांचा गुप्त सेक्रेटरी होता. त्यावेळी पोपमहोदयांनी त्यांना बायबलचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले आणि बायबलचे लॅटिन भाषेत भाषांतर करण्याची परवानगीही त्यांनी संत जेरोम ह्यांना दिली.

रक्तसाक्षी संताविषयी त्यांना असलेल्या आदरभावनेतूनच त्यांनी अशा संतांची थडगी भाविकांना करमुक्त योजनेद्वारे पाहता यावी अशी व्यवस्था त्यांनी केली. अशी तीर्थक्षेत्रे त्यांनी सजविलीसुद्धा. तसेच त्या त्या रक्तसाक्षी संताविषयीची माहिती संगमरवरी लाद्यांवर कोरून त्यांनी भाविकांच्या माहितीसाठी सहज उपलब्ध केली. अनेक प्राचीन रक्तसाक्षी संतांचे जीवन चरित्र लिहिण्यासाठी ह्या माहितीचा आधार आजवर घेण्यात आलेला आहे.
रोमन मिस्साग्रंथामध्ये प्राचीन काळी खूप लांबलचक व दीर्घ उपासना समाविष्ट करण्यात आलेली होती; परंतु ह्या पोपमहाशयांनी ती थोडीशी संक्षिप्त रूपात तयार केली, ती आजतागायत वापरात आहे. त्यामुळे त्यांना रोमन मिस्साग्रंथाचे जनक किंवा उद्‌गाते म्हटले जाते. ११ डिसेंबर ३८४ साली ते मरण पावले.


पहिले वाचनयशया ३५:१-१०
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “परमेश्वर स्वत: येईल आणि तुमचा उद्धार करील. "

अरण्य आणि रुक्ष भूमीही हर्षतील. वाळवंट उल्हासेल आणि कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल. आनंदाने गाऊन ते उत्सव करील. लबानोनची शोभा त्याला मिळेल. कार्मेल आणि शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. थरथरणारे हात दृढ करा. लटपटणारे गुडघे बळकट करा, घाबऱ्या मनाच्या लोकांना म्हणा, धीर धरा. भिऊ नका. पाहा, तुमचा देव सूड घ्यायला, अनुरूप असे प्रतिफळ द्यायला येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
तेव्हा अंधाचे नेत्र उघडतील. बहिऱ्यांचे कान मोकळे होतील. लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील. मुक्याची जीभ गजर करील, कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल. तृषित भूमीच्या ठिकाणी उपळते झरे होतील. कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू आणि लव्हाळे यासहित गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल. त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्यावरून अपवित्र जन जाणार नाहीत. पण तो त्याच्यासाठी, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी ते मार्ग चुकणार नाहीत. तेथे सिंह असणार नाहीत. हिंस्र पशूचा तेथे शिरकाव होणार नाही. तेथे ते आढळणार नाहीत. पण तेथे उद्धरलेले संचार करतील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जयजयकार करीत सियोनात येतील. त्याच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद आणि हर्ष पावतील. दुःख आणि उसासे पळ काढतील.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 35:1-10:
     The wilderness and the dry land shall be glad; the desert shall rejoice and blossom like the crocus; it shall blossom abundantly and rejoice with joy and singing. The glory of Lebanon shall be given to it, the majesty of Carmel and Sharon. They shall see the glory of the Lord, the majesty of our God. Strengthen the weak hands, and make firm the feeble knees. Say to those who have an anxious heart, "Be strong; fear not! Behold, your God will come with vengeance, with the recompense of God. He will come and save you." Then the eyes of the blind shall be opened, and the ears of the deaf unstopped; then shall the lame man leap like a deer, and the tongue of the mute sing for joy. For waters break forth in the wilderness, and streams in the desert; the burning sand shall become a pool, and the thirsty ground springs of water, in the haunt of jackals, where they lie down, the grass shall become reeds and rushes. And a highway shall be there, and it shall be called the Way of Holiness; the unclean shall not pass over it. It shall belong to those who walk on the way; even if they are fools, they shall not go astray, No lion shall be there, nor shall any ravenous beast come up on it; they shall not be found there, but the redeemed shall walk there. And the ransomed of the Lord shall return and come to Sion with singing: everlasting joy shall be upon their heads; they shall obtain gladness and joy, and sorrow and sighing shall flee away.

This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र ८५ :९-१४
प्रतिसाद : पहा, आपला प्रभू परमेश्वर.

१) प्रभुदेव काय म्हणतो ते मी ऐकेन कारण 
तो आपल्या लोकांचे, आपल्या भक्तांचे क्षेमकुशल इच्छितो.
त्याचे ऐश्वर्य आमच्या देशात नांदावे, 
म्हणून त्याची भक्ती करणाऱ्यांचा
उद्धार करायला तो सिद्ध असतो.

२) दया आणि निष्ठा यांचा संगम झाला आहे. 
नीती आणि शांती यांचे मिलन झाले आहे. 
भूमीवरील मानवी निष्ठा वर झेप घेत आहे. 
स्वर्गातून देवाची न्यायपरायणता खाली डोकावीत आहे.

३) खरोखर, प्रभू आमची भरभराट करील. 
आमची जमीन आम्हाला पीकपाणी देईल.
 नीती त्याच्या आघाडीला राहील. 
शांती त्याच्या पावलांवर पाऊल टाकील.

Psalm 85:9ab and 10, 11-12, 13-14 
R Our God will come and save us!

 I will hear what the Lord God speaks; 
he speaks of peace for his people 
and his faithful. 
His salvation is near for those who fear him, 
and his glory will dwell in our land. R

 Merciful love and faithfulness have met;
 justice and peace have kissed. 
Faithfulness shall spring from the earth, 
and justice look down from heaven. 

Also the Lord will bestow his bounty,
 and our earth shall yield its increase. 
Justice will march before him, 
and guide his steps on the way. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा
 सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.
 आलेलुया!

Acclamation: 
Behold, the King will come, the Lord of earth: and he will take away the yoke of our captivity.
.

शुभवर्तमान मत्तय  ९: ३५-१०:१,६-८
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 लूक  ५:१७-२६

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. "

एके दिवशी येशू शिक्षण देत असताना गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया आणि येरुशलेम येथून आलेले . परुशी आणि शास्त्राध्यापक तेथे बसले होते आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य येशू ठायी होते. तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षघाती मनुष्याला बाजेवर आणले आणि त्याला आत नेऊन प्रभूसमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु दाटीमुळे त्यांना आत वाव मिळेना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, "हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." तेव्हा शास्त्री आणि परुशी असा विचार करू लागले की, हा दुर्भाषण करणारा कोण आहे ? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो ? येशूने त्यांचे विचार ओळखून त्यांना उत्तर दिले. "तुम्ही आपल्या मनात असले विचार का करीत आहात ? पापांची क्षमा झाली आहे किंवा उठून चाल, ह्यातून कोणते म्हणणे सोपे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “मी तुला सांगतो ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा." तेव्हा तो लागलीच त्याच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला. तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले. तो देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 5:17-26:

 On one of those days, as Jesus was teaching, Pharisees and teachers of the law were sitting there, who had come from every village of Galilee and Judea and from Jerusalem. And the power of the Lord was with him to heal. And behold, some men were bringing on a bed a man who was paralysed, and they were seeking to bring him in and lay him before Jesus, but finding no way to bring him in, because of the crowd, they went up on the roof and let him down with his bed through the tiles into the midst before Jesus. And when he saw their faith, he said, "Man, your sins are forgiven you." And the scribes and the Pharisees began to question, saying, "Who is this who speaks blasphemies? Who can forgive sins but God alone?" When Jesus perceived their thoughts, he answered then, "Why do you question in your hearts? Which is easier, to say, "Your sins are forgiven you', or to say, "Rise and walk? But that you may know that the Son of Man has authority on earth to forgive sins" - he said to the man who was paralysed - "I say to you, rise, pick up your bed and go home." And immediately he rose up before them and picked up what he had been lying on and went home, glorifying God. And amazement seized them all, and they glorified God and were filled with awe, saying, "We have seen extraordinary things today."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:आपले मानवी प्रयत्न जेव्हा असफळ ठरले तेव्हा त्यांनी पक्षघाती माणसाला दैवी सामर्थ्यशाली प्रभूकडे आणले. चार माणसांनी अथक प्रयत्न करून पक्षघाती मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केला. जमावाच्या दाटीमुळे येशूकडे पोहचण्यासाठी मानवी मार्ग असुरक्षित व अस्पष्ट झालेले होते. मात्र देवाने त्यांच्यासाठी एक मार्ग दाखविला. हिंदी भाषेत एक मुहावरा आहे. "भगवान के घर में देर है अंधेरा नही." उशीर झाला, त्रास झाला तरी चालेल परंतु आपल्या मित्राला (पक्षपाती) येशूपर्यंत घेऊन जायचेच हा निर्धार त्यांनी धरला व रोगमुक्ती मिळविण्यासाठी येशूकडे आणले. पक्षघाती माणसाला वाहून नेणाऱ्या लोकांच्या विश्वासाने प्रभू प्रभावित झाला. लोकांच्या मनात आपल्याबद्दल (येशू) काय चालले आहे हे येशूने क्षणात जाणून घेतले. पक्षघाती माणसाला वाहून नेणारी व जनसमुदाय यांनी येशूचं कार्य पाहून देवाचा गौरव केला. मात्र दुसऱ्या बाजूला शास्त्री - परुश्यांनी येशूची निंदा करण्याची थांबवली नाही. मी येशूकडे कोणत्या प्रकारच्या लोकांना घेऊन आणण्याचा प्रयत्न करतो?

प्रार्थना:हे प्रभू येशू, आमची तुझ्यावरील श्रद्धा बळकट करण्यास व पश्चात्तापी अंतःकरणाने सर्वस्वी तुला शरण येण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या