Marathi Bible Reading | 10th December 2023 |Second Sunday of Advent

 आगमन काळातील दुसरा रविवार  

१० डिसेंबर  २०२३

"प्रभूचा मार्ग सिद्ध करा. त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. 

 'Prepare the way of the Lord, make his paths straight,"

शांती  (Peace ) 
तो शांती चा राजकुमार  आहे 
He is a prince of Peace 

यशया संदेष्ट्याचे भाकित आहे, की, 'घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की, अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.' रानात राजमार्ग तयार करणे हे सर्वांना पश्चातापाचे आणि समेट करण्याचे आवाहन आहे, कारण परमेश्वराचे गौरव प्रकट होणार आहे.
तारणाऱ्याला स्वीकारण्यास सर्वांनी पात्र ठरावेत म्हणून योहान बाप्तिस्ताने लोकांना त्यांच्या पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा दिला. त्याच वेळी स्वतःची ओळख करुन देताना नम्रतेने म्हटले, 'माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे.' आपण जागतिक जीवनात निरनिराळ्या मार्गाचा अवलंब करुन जीवन जगत असतो.  परमेश्वरासाठी आपल्या जीवनात आपण एक मार्ग तयार करायला हवा. कारण तोच मार्ग आपल्याला स्वर्गराज्यात घेऊन जाणारा आहे. 
✝️             

पहिले वाचन : यशया ४०:१-५,९-११ 
वाचक :  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभूचा मार्ग तयार करा."
सांत्वन करा. माझ्या लोकांचे सांत्वन करा. येरुशलेमच्या लोकांना धीर द्या. तुमच्या दुष्कर्माचे प्रायश्चित्त झाले आहे. प्रभूकडून तुमच्या सगळ्या पापांबद्दल तुम्हांला पुरेपूर शिक्षा मिळून चुकली आहे. ऐका, कुणी ओरडून सांगत आहे : "रानावनातून प्रभूसाठी रस्ता तयार करा. आमच्या देवासाठी अरण्यातून सरळ राजमार्ग बनवा. दयाखोऱ्यात भराव टाका आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी भुईसपाट करा. उंच सखल जमीन सपाट करा आणि ओबडधोबड जमीन गुळगुळीत करा, म्हणजे प्रभूचे वैभव प्रकट होईल आणि सारी मानवजात मिळून ते पाहील. ही प्रभूच्या तोंडची वाणी आहे."
हे सियोना, शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, उंच पर्वतावर चढ. हे येरुशलेमा, शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, मोठ्याने बोल. भिऊ नको. आपला आवाज चढव. यहुदाच्या नगरांना सांग : "पहा तुमचा देव, आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे बघा. त्याच्या हाती सत्ता आहे. त्याची कमाई म्हणजे त्याने मुक्त केलेले लोक तो घेऊन येत आहे. तो त्यांना देणार असलेले पारितोषिक त्याच्याबरोबर आहे. एखाद्या मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपाचा प्रतिपाळ करील. लहान कोकरांना तो वेंगेत उचलून घेईल आणि दूध पाजणाऱ्या मेंढ्यांना सांभाळून नेईल."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Isaiah 40:1-5, 9-11

Comfort, comfort my people, says your God. Speak tenderly to Jerusalem, and cry to her that her warfare is ended, that her iniquity is pardoned, that she has received from the Lord's hand double for all her sins. A voice cries: "In the wilderness prepare the way of the Lord; make straight in the desert a highway for our God. Every valley shall be lifted up, and every mountain and hill be made low, the uneven ground shall become level, and the rough places a plain. And the glory of the Lord shall be revealed, and all flesh shall see it together, for the mouth of the Lord has spoken." Go on up to a high mountain, O Zion, herald of good news; lift up your voice with strength, O Jerusalem, herald of good news; lift it up, fear not; say to the cities of Judah, "Behold your God!" Behold, the Lord God comes with might, and his arm rules for him, behold, his reward is with him, and his recompense before him. He will tend his flock like a shepherd, he will gather the lambs in his arms; he will carry them in his bosom, and gently lead those that are with young.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ८५:९अब-१०,११-१२,१३-१४

प्रतिसाद :   हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव दे.

१) प्रभुदेव काय म्हणतो ते मी ऐकेन. कारण तो आपल्या लोकांचे, आपल्या भक्तांचे क्षेमकुशल इच्छितो. त्याचे ऐश्वर्य आमच्या देशात नांदावे म्हणून त्याची भक्ती करणाऱ्यांचा उद्धार करायला तो सिद्ध असतो.

२) दया आणि निष्ठा याचा संगम झाला आहे. नीती आणि शांती यांचे मीलन झाले आहे. भूमीवर मानवी निष्ठा वर झेप घेत आहे.

३) स्वगातून देवाची न्यायपरायणता खाली डोकावत आहे, खरोखर प्रभू आमची भरभराट करील आमची जमीन आम्हाला पीकपाणी देईल नीती त्याच्या आघाडीला राहील शांती त्याच्या पावलांवर पाऊल टाकील,



Psalm 85:9ab and 10, 11-12, 13-14

Let us see, O Lord, your mercy and grant us your salvation.

I will hear what the Lord God speaks; 
he speaks of peace for his people and his faithful, 
His salvation is near for those who fear him, 
and his glory will dwell in our land.

 Merciful love and faithfulness have met; 
justice and peace have kissed. 
Faithfulness shall spring from the earth, 
and justice look down from heaven.

Also the Lord will bestow his bounty, 
and our earth shall yield its increase. 
Justice will march before him, 
and guide his steps on the way.R


दुसरे वाचन   पेत्रचे दुसरे पत्र ३:८-१४ 

वाचक :  पेत्रचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"आम्ही नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांची वाट पाहत आहोत." प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही दृष्टिआड करू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणू म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या अभिवचनाविषयी करीत नाही तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा स्फोटक आवाज करून नष्ट होईल. सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सृष्टी जळून खाक हाईल. ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहात राहा आणि प्रभूचा तो दिवस लवकर यावा म्हणून त्याची प्रतीक्षा करून धडपड करीत राहा. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टीची वाट पाहात असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक आणि निर्दोष असे शांतीमध्ये असलेले त्याला आढळावेत म्हणून होईल तितके प्रयत्न करा.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading 2 Peter 3:8-14

Do not overlook this one fact, beloved, that with the Lord one day is as a thousand years, and a thousand years as one day. The Lord is not slow to fulfil his promise as some count slowness, but is patient towards you, not wishing that any should perish, but that all should reach repentance. But the day of the Lord will come like a thief, and then the heavens will pass away with a roar, and the heavenly bodies will be burned up and dissolved, and the earth and the works that are done on it will be exposed. Since all these things are thus to be dissolved, what sort of people ought you to be in lives of holiness and godliness, waiting for and hastening the coming of the day of God, because of which the heavens will be set on fire and dissolved, and the heavenly bodies will melt as they burnt But according to his promise we are waiting for new heavens and a new earth in which righteousness dwells. Therefore, beloved, since you are waiting for these,be diligent to be found by him without spot or blemish, and at peace. 

This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा, सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. 
  आलेलुया!

Acclamation: Prepare the way of the Lord, make his paths straight: all flesh shall see the salvation of God

शुभवर्तमान मार्क १:१-८
वाचक :मार्कलिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
देवपुत्र येशू ख्रिस्त याच्या विषयीच्या शुभसंदेशाचा प्रारंभ. संदेष्टा यशया याच्या ग्रंथात लिहिले आहे "बघ, मी माझा दूत तुझ्यापुढे पाठवतो. तो तुझी वाट मोकळी करील. रानावनात कुणीतरी घोषणा करीत आहे : "प्रभूचा मार्ग सिद्ध करा. त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. त्याप्रमाणे बाप्तिस्मा करणार योहान रानावनात प्रकट झाला. पापक्षमा व्हावी म्हणून पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्या अशी घोषणा तो करीत असे. तेव्हा साऱ्या यहुदिया प्रांताचे आणि येरुशलेमचे नागरिक त्याच्याकडे लोटू लागले. ते आपली पापे पदरी घेत आणि त्याच्याकरवी यार्देन नदीत बाप्तिस्मा घेत. योहान उंटाच्या केसाचे कपडे घालीत असे आणि कमरेला चामड्याचा कमरपट्टा बांधीत असे. टोळ आणि रानमध यांवर तो निर्वाह करी. तो मोठ्याने पुकारून सांगे, "माझ्यापेक्षा समर्थ असा कुणी माझ्यानंतर येत आहे, खाली लवून त्याच्या पादत्राणांचे बंद सोडायची माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Mark 1:1-8

The beginning of the gospel of Jesus Christ, the Son of God. As it is written in Isaiah the prophet, "Behold, I send my messenger before your face, who will prepare your way, the voice of one crying in the wilderness: 'Prepare the way of the Lord, make his paths straight," John the Baptist appeared in the wilderness and proclaiming a baptism of repentance for the forgiveness of sins. And all the country of Judea and all Jerusalem were going out to him and were being baptised by him in the river Jordan, confessing their sins. Now John was clothed with camel's hair and wore a leather belt round his waist and ate locusts and wild honey. And he preached, saying, "After me comes he who is mightier than 1, the strap of whose sandals I am not worthy to stoop down and untie. I have baptised you with water, but he will baptise you with the Holy Spirit."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: "प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा." आगमन काळात आपणा सर्वाचं लक्ष अशा शब्दानी वेधून घेते. आगमन काळातील आजचा दुसरा रविवार आहे. योहान बाप्तिस्ताः अरण्यातील माणूस हे चित्र आजच्या उपासनाविधीचं केंद्रबिंदू आहे. “योहान उंटाच्या केसाचे कपडे घालीत असे आणि कमरेला चामड्याचा कंबरपट्टा बांधीत असे. टोळ आणि रानमध यांवर तो निर्वाह करीत असे.” (मार्क १:६) या वचनाद्वारे आपणास हेच सूचित होते की योहान बाप्तिस्ता हा अरण्यातील माणूस आहे. आजच्या तिन्ही वाचनातून आपणास तीन महत्त्वपूर्ण अंतर्भूत करणारी वैशिष्टे आढळतात. 
१) परमेश्वर आपल्या लोकांना वाळवंटातून बाहेर काढू इच्छितोः आजचे पहिले वाचन यशयाच्या पुस्तकातून घेतलेले आहे. यहुदी लोकांना बंदिवास म्हणून बाबिलोनमध्ये नेले आहे. तेथे संदेष्टा यशया लोकांना स्वातंत्र्य आणि नवीन जीवनाचे दर्शन देऊन त्यांचे सांत्वन करीत आहे. संदेष्टा लोकांना वचन देतो की, "हाच परमेश्वर जो वाळवंटाच्या मध्यभागीलोकांसाठी महामार्ग तयार करील. 
२) आपण आपल्या जीवनाचे नुतनीकरण करावे अशी प्रभूची इच्छा आहेः आजच्या दुसऱ्या वाचनात संत पिटर आपल्याला नवीन स्वर्ग आणि नवीन नुतनीकरण तसेच आपल्या सर्वधारणपणे जीवनाच्या नुतनीकरणासाठी आपणास जाणीव करून देत आहे. 
३) आपण देवासाठी मार्ग तयार करावा अशी देवाची इच्छा आहे: शुभवर्तमानात आपणास पापी मार्ग किंवा वाम मार्ग सोडून देवाच्या इच्छेप्रमाणे अनुसरण्यासाठी आव्हान केले जात आहे. आपण स्वतःच्या पापी जीवनाची कबुली देऊन तारणकर्त्याची आपल्याला गरज आहे. अशी शिकवणुक दिलेली आहे. एकप्रकारे आध्यात्मिक दृष्ट्या आपण जे बंदिवानात आहोत त्यांचे सांत्वन करून, पश्चात्तापाचे आवाहन केले जाते. पापाच्या अरण्यातून नवजीवनाच्या यार्देन नदीकडे येण्याचे आमंत्रण आजची उपासना आपणाला देत आहे. माझ्या वैयक्तिक जीवनात कोणत्या गोष्टीमुळे वाळवट तयार झालेले आहे ? या वाळवंटातून बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, निर्मळ हदयाने तुला आमच्या जीवनात स्वीकारण्यास आम्ही बनावेत म्हणून आम्हाला पश्चातापी अंत:करण दे, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या